महोत्सव कवितांचा आणि सन्मान सोहळ्यात प्रवीण बागडे यांचा गौरव

महोत्सव कवितांचा आणि सन्मान सोहळ्यात प्रवीण बागडे यांचा गौरव

महोत्सव कवितांचा आणि सन्मान सोहळ्यात प्रवीण बागडे यांचा गौरव

 कविता म्हणजे समाजाचे आरसेपण जपणारी सर्जनशील अभिव्यक्ती. याच विचारातून कविता म्हणजे प्रबोधन, संगमनेर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महोत्सव कवितांचा’ आणि सन्मान सोहळ्यात नागपूर येथील साहित्यिक-कवी प्रवीण बागडे तसेच प्रभाकर सोमकुवर यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा साहित्यिक आणि सांस्कृतिक सोहळा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री कचेश्वर देवस्थान मंदिर, बोटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी संगमनेर, राहुरी, पारनेर, जुन्नर, नागपूर आणि अकोला या विविध तालुक्यांमधून निवडक साहित्यिक, कवी, विचारवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
        संमेलनाचे प्रमुख पाहुणे आधुनिक गाडगेबाबा डॉ. हरिभाऊ उगले राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून कृषी उपसंचालक श्री प्रविण गवांदे यांची उपस्थिती लाभणार आहे. काव्यसंमेलनात प्रवीण बागडे हे सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या आशयपूर्ण आणि संवेदनशील कवितांचे सादरीकरण करणार आहेत. सामाजिक प्रश्नांवरील परखड मांडणी, प्रखर शब्दशैली आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन यामुळे प्रवीण बागडे यांच्या कविता वाचक-श्रोत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या सहभागामुळे ‘महोत्सव कवितांचा’ या साहित्यिक सोहळ्याची उंची अधिक वाढली असून साहित्यप्रेमी आणि रसिकांकडून त्यांच्या निवडीचे स्वागत व कौतुक होत आहे. या महोत्सवातून कवितेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करण्याचा आणि नव्या प्रतिभांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजक गौतम वाघमारे यांनी सांगितले आहे.
 

प्रवीण बागडे

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *