• 150
  • 1 minute read

माजलेली भुते…,संस्कार नसलेला बाप अन् आई !

माजलेली भुते…,संस्कार नसलेला बाप अन् आई !

पुण्यात जे काय घडल त्याची विस्तृत चर्चा माध्यमावर झाली आहे . मराठी माध्यमानी जागरूक राहून हा मुद्दा रविन्द्र धंगेकर यांनी आंदोलन केल्या नंतर मसालेदार रित्या चघळला सुद्धा .
मित्र हो यात मला एक बाब लक्षात आली की , बिल्डर लॉबी विक्रमी नफा कश्या कमावतात ? पुण्यात सुमारे ९०% इमारती ह्या आर झोन मधे आहेत . ह्या जागा बिगरशेती ही नसतात . गेल्या १० वर्षात एक ठराविक कम्युनिटी ह्या व्यवसायात आली . राजकारणी लोकांचे २ नंबर चे पैसे बिल्डर लाईन मधे कसे येतात याच्या अनेक मनोरंजक बाबी आहेत . जागेसह १२ लाख रुपये सरासरी बांधकाम येणारा फ्लॅट हा ७० लाखाला विकला जातो . सरासरी १५ लाख खर्च गृहीत धरला तर सुमारे ५० ते ६० लाख रुपये एका फ्लॅट मधे मिळतात . पुण्यात मागील ५ वर्षात प्रचंड फ्लॅट मोकळे पडून होते , ग्राहक नव्हता , पण काही ऑफर देऊन बिल्डर लॉबी ने ते विकले . बऱ्याच बिल्डिंग ह्या बिगर शेती नाहीत . खरेदी होते . कशी होते , बिल्डर यांनी खरेदी विक्री रजिस्टर अधिकारी खिश्यात बसवला आहे . कोणताही रजिस्टर अधिकारी घ्या , त्याची संपत्ती अब्जात असेल . कृत्रिम रित्या फ्लॅट च्या किमती वाढवून प्रचंड नफेखोरी अलिकडील १० वर्षात आली आहे , याला ठराविक राजकीय पक्ष जबाबदार आहेत .
गणपत गायकवाड यांचा गोळीबार याची साक्ष आहे . राज्यात आज शहरात जमिनीचे युद्ध रोजच होत आहे . यातून काही टोळ्या निर्माण झाल्यात . त्या टोळ्या उद्याच्या दृष्टीने वाईट आहे हे नक्की .
अमाप पैसा असेललं अग्रवाल राक्षस याचे ज्वलंत उदाहरण आहे . १७ वर्षाचे बाळ दूध ऐवजी दारू पिते . पब मधे एका तासात ४८ हजार रुपये बिल करते . बिना नोंदणीची गाडी रस्त्यावर खुले आम ३ महिने फिरते . बाप सांगतो पब मधे जा , दारू पी , चंगळवाद कर! किती हीन विचारचे हे कुटुंब असेल . वास्तविक ह्या कुटुंबाचे बरेच सत्य पुढे येईल . ते तपासले पाहिजे . पैशाने आम्ही पोलीस, न्याय विकत घेऊ शकतो , मग किती ही मूडदे पाडा. पोलीस पब मधून कसे हप्ते वसूल करतात याचे धंगेकर यांनी व्हिडिओच प्रसारित केले आहे . पुणे पोलीस कसे आहेत , पोलिसांचे वसुली नेटवर्क कसे आहे याची पोलखोल त्यांनी केली . ह्या संस्कारहीन कुटुंबांना पोलीस अन् न्याय व्यवस्था बळ देत असेल तर काय म्हणावे !
ही सर्व माजलेली भूत आहेत अन् आज ते आपल्या मांगुतीवर बसलेली आहेत . राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे . पैसा सर्वश्रेष्ठ ठरत आहे . पैशाची ही भुते काही करा ती आपल्या बोकांडी कायमची बसली आहेत , उतरणार नाहीच . संस्कार नसलेलं बापच जन्म घेत असतील तर त्या घरातील ही बाळ कशी निपजतील . समाजाने विचार केला पाहिजे . समाज विचार करणार नाही कारण ह्या एकतरी भूताशी समाजघटकांचा संबंध येत असतो ..
चला आपण फक्त मरण पाहत बसायचे , दोन दिवस धाय मोकळून रडायचे , राक्षसानी पोटचा गोळा मारला म्हणून श्रधांजली अर्पित करायची , मग ते प्रवरेत वाळु तस्कर यांच्या खड्यात मरो , नाही तर दारुड्या बाळाच्या कार ने मरो… लोणी खात बसणारे राजकारणी , सत्ताधारी , अधिकारी यांना काय करायचे , शेवटी तुम्हाला अन् मला वाळूच्या खड्यात किवा दारुड्याच्या गाडी खालीच मरायचे आहे…
ज्ञानेश्वर गायकर पाटील
संगमनेर

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *