लोककलांच्या महासागरातुनच खरं तर सर्व कला उत्क्रांत होत गेल्या.आमच्या देशात दर १०० कि.मी.ला संस्कृतीचे मानदंड बदलत जातात. विविध भाषा, विविध प्रांत, विविध सामाजिक स्तर, विविध रूढी, विविध परंपंरा यांची सरमिसळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कोणत्याही कलेचे एकदम ढोबळ मानदंड लावून हे घाण अन् हे छान असे म्हणता येत नाही. च्यायला, मायला, आवशीचा घो, गाढव लावले, घोडा लावला हे सहजोद्गार अनेक समूहाचे आहेत.
आम्ही कायम नग्नता आणि अश्लिलता या एकच समजतो जे चूक आहे. प्राचीन भारतीय देवदेवतांचा सुक्ष्मपणे अभ्यास केला तर हे लक्षात येईल की बहूतेक प्राचीन देवतेंची नग्न शिल्पे आहेत…..…. सामान्यत: अभिनेते आपल्या करीअरची सुरूवात विशी नंतर करतात मात्र दादा वयाच्या ३९ व्या वर्षी पहिल्यांदा नायक म्हणून पडद्यावर आले. कुठलाच चेहरा नाही, शरीर म्हणजे पार यष्टी, नाडी लाेंबत असलेली चट्यापट्याची चड्डी, आईकडून कायम मुडद्या म्हणवून घेतानां दिसणारे चेहऱ्यावरचे निरागस भाव, कधीही कुठेही मातीत लोळण्यास तयार असलेला हा नायक मला आज पर्यंत कुठल्याच चित्रपटात दिसला नाही……….
खरं तर आपण वस्त्राच्या आत जितके नागडे असतो तितकेच मनाच्या आतही असतो. आपल्या अंगावर अनेक रितीरिवाजाची झूल असते. आपण बहुतेकवेळा “लोक काय म्हणतील” व “लोकानां काय वाटेल” याचाच अधिक विचार करत असतो. मनात नेमके काय विचार सुरू असतात हे फक्त त्याला स्वत:लाच माहित असतात. नैँतिकतेचे मानदंड कुणीतरी तयार करतं आणि तेच योग्य आहेत असेही भासविण्यात येतं. दादाने कुणाचीच फिकीर केली नाही. ते नेहमी- “म्हणत तुम्ही मला कोणतेही मराठी वाक्य द्या..मी म्हणून दाखविले की ते दोन अर्थी होतं…कारण तुम्हाला त्यातला दुसराच अर्थ जास्त भावतो. एक फाटका माणूस चित्रपट क्षेत्राची कोणतीच पार्श्वभूमी नसताना प्रचंड यशस्वी झाला. कुणाला असो वा नसो मला या दादाचा अभिमान आहे आणि शेवट पर्यंत राहील. आज १४ मार्च…