• 36
  • 1 minute read

मानसिक ताण-तणाव वाढत असल्यास त्वरित मदत घ्या ‘टेलिमानस’ हेल्पलाइन १४४१६ नागरिकांसाठी २४×७ उपलब्ध

मानसिक ताण-तणाव वाढत असल्यास त्वरित मदत घ्या  ‘टेलिमानस’ हेल्पलाइन १४४१६ नागरिकांसाठी २४×७ उपलब्ध

मानसिक ताण-तणाव वाढत असल्यास त्वरित मदत घ्या ‘टेलिमानस’ हेल्पलाइन १४४१६ नागरिकांसाठी २४×७ उपलब्ध

दि. २५ ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) –लोक ताण-तणाव, चिंता, नैराश्य, नातेसंबंधातील समस्या, परीक्षेचा दबाव, आर्थिक तणाव किंवा स्मृतिसंबंधित अडचणी यांसारख्या भावनिक आव्हानांविषयी खुलेपणाने बोलू लागले आहेत, ही सकारात्मक बदलाची चिन्हे आहेत. मानसिक आरोग्य महत्वाचे असल्याची जाणीव वाढत असून वेळेवर मदत घेणे ही सुदृढतेकडे जाणारी महत्त्वाची पायरी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आरोग्य विभागाने नागरिकांना मानसिक आरोग्याविषयी अधिक सजग राहण्याचे आणि गरज भासल्यास तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित मदत घेतल्यास नैराश्य, भीती, ताण-तनाव यांसारख्या स्थितीवर योग्य वेळी नियंत्रण मिळवणे शक्य होते. मानसिक आरोग्य हा व्यक्तीच्या एकूण आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली ‘टेली-मानस’ टोल फ्री हेल्पलाइन १४४१६ ही मोफत सेवा सर्वसामान्यांसाठी २४×७ उपलब्ध आहे. प्रशिक्षित मानसोपचारतज्ञ व समुपदेशक या क्रमांकावर त्वरित मार्गदर्शन करून नागरिकांना मानसिक ताणातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. कोणत्याही प्रकारच्या मानसिक अस्वस्थतेसाठी ही सेवा निःसंकोचपणे वापरण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

टेली-मानसद्वारे उपलब्ध सेवा :
• मानसिक ताण-तणाव आणि चिंता
• नैराश्याची प्रारंभिक किंवा गंभीर लक्षणे
• व्यसनाधीनता समस्या
• कौटुंबिक किंवा नातेसंबंधातील तणाव
• मुलांमधील मानसिक समस्या
• परीक्षेचा ताण
• अत्याधिक विचार, भिती, अस्वस्थता
• आत्महत्येचे विचार / तातडीची भावनिक अस्थिरता
• आर्थिक किंवा वैयक्तिक तणाव
• इतर कोणत्याही प्रकारच्या मानसिक आरोग्य समस्या
कोणतीही समस्या जाणविल्यास टोल फ्री क्रमांक १४४१६ वर संपर्क साधावा.

आरोग्य विभाग, ठाणे तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना ताण-तणाव, चिंता, नैराश्य किंवा भावनिक अस्वस्थता जाणवत असल्यास मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये. मानसिक आरोग्याच्या कोणत्याही समस्यांसाठी १४४१६ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून मोफत समुपदेशन व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *