माफसू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून तसेच संचालनालय विस्तार शिक्षण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी अधिष्ठाता (निम्नशिक्षण) व विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. भूषण रामटेके, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. सी. नंदेश्वर, उपकुलसचिव डॉ. अजय गावंडे, तांत्रिक अधिकारी डॉ. महेश जावळे, डॉ. संजय गोडबोले, डॉ. गिरीधर शेंडे, डॉ. सरिपुत लांडगे, डॉ. गीतांजली धुमे, तांत्रिक अधिकारी व अध्यक्ष कास्टट्राइब माफसू एम्प्लॉईज युनियन डॉ. प्रज्ञेय ताकसांडे, सहायक नियंत्रक रामराव किर्तने, संचालक विस्तार शिक्षण यांचे स्विय सहाय्यक व उपाध्यक्ष कास्टट्राइब माफसु एम्प्लॉईज युनियन श्री प्रवीण बागडे, इंजि.आर. के. सावरकर, संतोष बन्सोड, गौरी भदोरिया, बाळू छपाणे, मिलिंद आठवले ई. उपस्थित होते.