सांगायचा मुद्दा असा की दहिहंडीच्या अपघातात कधी फडणवीस, धर्माधिकारी, बापट, जोशी, अभ्यंकर, देशपांडे, कुलकर्णी, संकलेचा, बाफना, कटारिया, फिरोदिया, पूनावाला अशी नावे दिसणार नाहीत. हे तथाकथित संस्कृति रक्षण पवार, जाधव, मोहिते, कांबळे, वाघमारे यांच्याच लेकरांनी आपले हातपाय मोडून, जायबंदी होऊन किंवा मरणाला कवटाळून करावयाचे आहे ! कष्टकरी बहुजनांनो ! तुमची मुले या गावगन्ना भिक्कार पुढाऱ्यांच्या दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रातील डिजे व लेझर झगमगाटात बेधुंद नाचून आपला जीव देण्यासाठी नाहीत. यांना नगरसेवक, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी व खासदारकीणी स्वप्ने तुमच्या असा फुकटचा बळी देऊन साकारायची असतात. कधीतरी या सगळ्या आचरटपणापासून दूर होण्याची सुरूवात करा. तेव्हा कुठे दोन पिढ्यांनंतर परिस्थिती बदलेल.