• 103
  • 1 minute read

मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या महिलांना पोलिसांची मारहाण

मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या महिलांना पोलिसांची मारहाण

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विधानाविरोधात मोर्चा काढताना घटना!

मुंबई : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज करण्यात आल्याची गंभीर घटना आज घडली.

या आंदोलनात सहभागी झालेल्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.

तसेच राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रुपवते यांच्यासोबतही पोलिसांनी धक्काबुक्की केलीआहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीकडूनच स्त्रीविरोधी वक्तव्य होणे अत्यंत लज्जास्पद असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि लैंगिक असमानतेविरोधात आवाज उठवणाऱ्या या आंदोलनात पोलिसांनी केलेली ही कारवाई लोकशाहीवरील आघात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारकडे तीव्र निषेध नोंदवत पोलिसांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच रुपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांना महिला आयोगाच्या पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारच्या पोलिसांकरवी केलेल्या मारहाणीवरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *