• 311
  • 1 minute read

मुलुंडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कार्य भूमिपुत्र विध्यार्थ्यांना सुवर्णसंधी __ जयेंद्रदादा खुणे ( मुंबई प्रदेश आगरी सेना प्रमुख ) _________

मुलुंडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कार्य भूमिपुत्र विध्यार्थ्यांना सुवर्णसंधी __ जयेंद्रदादा खुणे ( मुंबई प्रदेश आगरी सेना प्रमुख )  _________

       मुलुंड मुंबई येथील श्रीमद् राजचंद्रजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मुंबईतील गांवठाण कोळीवाडा विकास लढ्याचे याचिकाकर्ते तथा आगरी सेना मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांना भेट देऊन पाहणी केली.प्रशिक्षणार्थी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता निमंत्रित केले असता या शासकीय संस्थेच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण हे अतुलनीय व प्रशासनीय असेच आहे. मुंबईतील भूमिपुत्र व बहुजन समाजातील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा योग्य लाभ घेऊन कुटुंब, समाज व राष्ट्राचे नाव लौकिक करण्याकरिता हि सुवर्णसंधी आहे व याकरिता आगरी सेनेच्या माध्यमातून या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रतिपादन आगरी सेना मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शनपर वक्तव्य केले.
यावेळी श्री. जयेंद्रदादा खुणे यांचा गटनिर्देशक श्री.आरिफ मुजावर
साहेब , शासकीय जनसंपर्क अधिकारी श्री.नविन भोपी सर, श्री. हिरामण चौधरी सर व समाजसेवक श्री. मनोज घरत यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

शासकीव औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, मुंबई – ८१

प्रवेशकरिता व्यवसाय निहाय उपलब्ध जगाचा तपशील
१) कम्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट २) डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर ३) विजतंत्री ४) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ५) फिटर
६) फूड अँड बेवरेज सर्व्हिस असिस्टंट ७) फूड प्रोडक्शन जनरल
८) इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स ९) यांत्रिकी उपकरण १०) यंत्र कारागीर ११) मोटार मॅकेनिक १२) यांत्रिक प्रशिक्षण व वातानुकूलीरण १३) यांत्रिक डिझेल १४) मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स १५) टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम १६) टर्नर १७) वेल्डर १८) वायरमन
या व्यवसायाचे प्रशिक्षणाचे कोर्स असून १ किंवा २ वर्ष कालावधीकरिता उपलब्ध जागांसाठी विध्यार्थ्यांना प्रशिक्षण विद्यावेतन दरमहा मिळते.

{ शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना }
शासकीय जनसंपर्क अधिकारी
शासकीय आयटीआय मुलुंड
१० वी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा निर्धारित अभ्यासक्रमानुसार व्यवसाय अभ्यासक्रमाचे एक वर्षे व दोन वर्षे कालावधीचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी गटातील कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली याचेकडून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे ( NCVT ) राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र ( NTC ) दिले जाते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण ७० % प्रात्यक्षित आणि ३० % सैद्धांतिक आधारित आहे. हे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरहि ग्राह्य धरण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर रोजगाराच्या आणि स्व – रोजगारासह उच्चशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना द्वितीय वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमामध्ये थेट प्रवेश दिला जातो.

अ { प्रवेश अर्ज सादर करताना }
१) दहावी गुणपत्रिका ( मूळ प्रत )२) शाळा सोडल्याचा दाखला ( मूळ प्रत )३) २ पासपोर्ट साईझ फोटो ४) जातीचा दाखला ५) इंटरमिजीएट ड्रॉईंग परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास ६) नॉनक्रिमिलेयर दाखला
७) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र ८) आधारकार्ड ( स्वतःचे मोबाईल नंबर सोबत लिंक / अपडेट करून घेणे )
ब ( विद्यावेतन दरमहा मिळणेकरिता आवश्यक कागदपत्रे )
१) दहावी गुणपत्रिका २)जातीचा दाखला ३) नॉनक्रिमिलेयर दाखला ४) डोमेसाईल दाखला ( महाराष्ट्र राज्याचा रहिवासी ) ५) उत्पन्नाचा दाखला ६) आधारकार्ड ७) बँक अकाउंट डिटेल्स ( स्वतःचे मोबाईल नंबर सोबत लिंक / अपडेट करून घेणे )८) इतर अनुषंगिक दाखले

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी व अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
http:/admission.dvet.govt.in
ई-मेल : iti. mulund@dvet.govt.in
दूरध्वनी : ०२२ २१६३५७३४

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *