• 143
  • 1 minute read

युद्धमुक्त जगासाठी नेत्यानाहूसारख्या साम्राज्यवादी शक्तींच्या दलालांना सत्तेवरून हाकलून दिले पाहिजे……!

युद्धमुक्त जगासाठी नेत्यानाहूसारख्या साम्राज्यवादी शक्तींच्या दलालांना सत्तेवरून हाकलून दिले पाहिजे……!

जगाची विनाशाच्या दिशेने वाटचाल ....!

इस्रायलने पॅलेस्टाइनच्या भूमीवर कब्जा करून त्यांच्याच नरसंहार सुरू केला. गेल्या दोन वर्षांपासून तर युद्धाचे सर्व नियम कायदे तोडून इस्रायलने गाजा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांचा नरसंहार करून आतापर्यं ६५ हजाराच्या आसपास लोकांना मारले आहे. इथल्या नागरी सुविधा व मानवी जीवन बेचिराख करून टाकले आहे. पण याची साधी दखल ही अमेरिकेने कधी घेतली नाही. कधी संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. युद्धविराम करण्याबाबत कधी इस्त्रायलशी बोलणी सुद्धा केली नाहीत. पण                      इस्रायलने स्वतःहून इराणवर केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर इराणने ही हल्ले करून इस्रायलला बेचिराख करताच, अमेरिका युद्ध विराम विषयी बोलू लागला. इराणला धमकी देवू लागला. त्यास इराणने कसलाही प्रतिसाद दिला नाही, तेव्हा अमेरिकेने आता इराणवरच हमले सुरू आहेत. तर त्यास जशास तसे उत्तर देण्याची इराणची ही तयारी  आहे. आफ्रिका,यमन, लेबनान या राष्ट्रांनी ही अमेरिकेच्या या युद्धखोर नीतीच्या विरोधात इराणला साथ देण्याचा निर्णय घेतला असून लाल समुद्रात अमेरिकेची कोंडी करण्याची व्यूहरचना अरब देश आखत आहेत. अमेरिकेचा  पिटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानने ही अमेरिकेच्या या कृतीचा जाहीरपणे निषेध केला आहे. ती हिंमत आज ही आपल्या छप्पन इंच छातीकडे नाही. हे आपले दुर्दैव आहे.
        अमेरिकेने इराणवर केलेल्या या मिसाईल हल्ल्याचा विरोध आता अमेरिकेतील जनताच करू लागली आहे. तसेच इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायली नागरिक रस्त्यावर उतरून इराणकडे दयेची भीक मागत होते, युद्ध विराम करण्यासाठी विनंती करीत होते. त्यामुळे नेत्यानाहु चांगलेच अडचणीत आले होते. तर इस्रायल आणि हमासने एका चर्चेनंतर आपापल्या ताब्यातील नागरिकांची सुटका करायला सुरुवात केली आहे. दीड, दोन वर्षांनी मुक्त झालेले हे नागरिक शांततेचा संदेश देत आहेत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत ही इस्रायल व पॅलेस्टाईन या दोन्ही राष्ट्रातील कटूता या छोट्याशा घटनेमुळे संपताना दिसत आहे. अशा सर्व वातावरणात अमेरिकेने इस्त्रायलवर युद्धविराम करण्याबाबत दबाव आणायला हवा होता. पण त्या उलट चिथावणी दिली व आता तर स्वतःच इराणवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. हे आता नाहक युद्धात ओढले जाणाऱ्या राष्ट्रांनी व नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. युद्धमुक्त जगासाठी नेत्यानाहुसारख्या अमेरिकेच्या दलालाला सत्तेवरून हाकलून दिले पाहिजे. ज्या ज्या राष्ट्राचे प्रमुख अमेरिकेचे व ट्रम्पचे दलाल आहेत, त्यांना सत्तेवरून हाकलून देण्यातच देशहित आहे, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. नाहीतर अमेरिकेला व ट्रम्पला लहर आली की, प्रत्येक राष्ट्राचा इस्रायल होईल. हे आता समजून घेतले पाहिजे. 
             
               जगाची विनाशाच्या दिशेने वाटचाल ….!
 
        अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज व अणुबॉम्ब चाचण्या करण्याची स्पर्धा करणारे जगभरातील देश विकासाच्या नव्हेतर विनाशाच्या मार्गावरून वाटचाल करीत आहेत, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. मानवीय मूल्यांचे जतन, आग्रह आणि विकास करण्याचा अथक प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अशाच विचारांच्या शेकडो महामानवांनी अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज व अणुबॉम्ब चाचण्या करण्याच्या स्पर्धेला विनाशच म्हटले आहे. २ हजार किलो मिटरपेक्षा अधिक अंतरावरून आपले लक्ष साध्य करीत इराणची अत्याधुनिक शस्त्रे इस्रायलला बेचिराख करीत आहेत. इस्त्रायली नागरिकांनी काही दशके अथक मेहनत करून आधुनिक जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या आहेत, त्या त्या सर्व गोष्टी केवळ दोन दिवसाच्या हल्ल्यात नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे  इस्रायल नागरिक मानवी संहार थाबवा, युद्ध विराम करा, अशी दयेची भीक मागत रस्त्यावर उतरले आहेत. या नागरिकांच्या चिख अन् किंकाळ्या दगडाला ही पाझर फोडणाऱ्या अशाच आहेत. मात्र इस्रायलच्या हमल्यामुळे गाजा पट्टीत पॅलेस्टाइन नागरिक याच चिख व किंकाळ्या देत होते, तेव्हा हेच इस्त्रायली नागरिक याच रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करीत होते. याला विवेकवादी नागरिक म्हणत नाहीत. गाजा पट्टीतील नागरिकांचा नरसंहार करणाऱ्या नेत्यानहुच्या युद्धखोर भूमिकेचा विरोध करीत हे इस्त्रायली नागरिक त्याच वेळी रस्त्यावर उतरले असते, तर ही वेळ आज त्यांच्यावर आली नसती. 
           ज्या साम्राज्यवादी नितीने व अत्याधुनिक शस्त्रांनी गेल्या दोन वर्षांपासून निरापराध व निहत्ये गाजा पट्टीतील नागरिकांचा नरसंहार केला , त्याच नितीने व शस्त्रांनी इस्त्रायलला बेचिराख केले आहे. हे समजून घ्यायची हिच खरी वेळ आहे. मानवी जीवन व वसाहती अमानवीय पद्धतीने बेचिराख करणे या एकमेव उद्देशाने जगभरातील सर्वच देश अत्याधुनिक शस्त्रे व अणुबॉम्ब चाचण्या करीत आहेत. या मानवी जीवन व वसाहतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी देशाने या शस्त्र निमिती क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा वाढविली आहे. मानवी समाज आणि एकंदरच साऱ्या सृष्टीचा विनाश करण्याचे धोरण जगभरातील सत्ताधाऱ्यांचे असून ते आपल्या देशातील जनतेवर हुकूमशाही पद्धतीने सत्ता गाजवित आहेत. आपल्या देशात उत्पादित होणारी घातक शस्त्रे विकण्यासाठी ते अनेक देशांना आपापसात लढवित आहेत. त्यामुळेच युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण जगभर असून प्रत्येक देश प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष या युद्धखोरीत सामिल आहे. जे होणार नाहीत, त्यांना धमक्या दिल्या जातात. जशा डोनाल्ड ट्रम्पने आपणाला दिल्या आहेत व देत आहेत.
          जगभरात जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने तटस्थ राहणे हा मूर्खपणा आहे.. राहिला प्रश्न पॅलेस्टाईंनचा तर पॅलेस्टाइनच्या भूमीवर इस्रायलने कब्जा केलेला आहे. या पट्ट्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि नरसंहारास ही इस्त्रायलच जबाबदार आहे. आज जगभर जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन जग दोन भागात विभागले जात आहे, त्यास अमेरिकेची साम्राज्यवादी भूमिका व युद्धखोरीच जबाबदार आहे. जगभरातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात घट होत असताना हत्याऱ्यांवर अधिक खर्च केला जात आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, ती म्हणजे काही बौद्ध राष्ट्रांचा अपवाद सोडला तर जगातील सर्वच राष्ट्रे मानवी समाजाच्या विकासाशिवाय अन्य विकासावर अधिक लक्ष देत आहेत. 
             युद्धखोर राष्ट्र प्रमुख आणि त्यांनी जगभरात सुरू केलेल्या नरसंहारामुळे मानवी जीवन बेचिराख होत आहे. याच्या झळा कमी अधिक फरकाने सर्वच राष्ट्रांतील नागरिकांना बसत आहेत. अफगाणिस्तान व इराक या देशात अमेरिकेने हा अनुभव स्वतः ही घेतला आहे. तत्कालीन राष्ट्र प्रमुखांनी घेतलेल्या युद्धखोरी विरुद्ध अमेरिकेत काही प्रमाणात विरोध झाला. पण उद्रेक झाला नाही. अमेरिकेच्या विदेश निती व धोरणामुळे येथील नागरिकांना संरक्षण मिळत असल्याने ते युद्धखोर सत्ताधीशांच्या विरोधात उभे राहताना दिसत नाहीत. थोडाफार विरोध केला जातो. इराणवर केलेल्या मिसाईल हल्ल्याचा विरोध होऊ लागला आहे. पण त्या विरोधात दम नाही. मात्र या साम्राज्यवादी राष्ट्रांमधील जनता खरोखरच या युद्धखोर सत्ताधीशांच्या विरोधात उभी राहिली, तर युद्ध करण्याची अथवा युद्ध करण्याची चिथावणी देण्याची हिंमत त्यांची होणार नाही…..!
……………
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश.
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *