• 301
  • 1 minute read

…रंग मंचावर जेव्हा बुद्ध,कबीर,जिजाऊ,फातिमा आणि बाबासाहेब आंबेडकर अवतरले !

…रंग मंचावर जेव्हा बुद्ध,कबीर,जिजाऊ,फातिमा आणि बाबासाहेब आंबेडकर अवतरले !

…रंग मंचावर जेव्हा बुद्ध,कबीर,जिजाऊ,फातिमा आणि बाबासाहेब आंबेडकर अवतरले !

मुंबई,दि.४ डिसेंबर ( प्रतिनिधी ) कृतघ्न आहात तुम्ही सगळे.आमच्या राजांचा पुतळा पडला आणि तुम्ही बघत बसलात.पण आम्ही नाही बघू शकत असं म्हणत जेव्हा जिजामाता शहाजी राजे उर्फ जिजाऊ माँ साहेब विजेसारख्या कडाडल्या तेव्हा सगळं सभागृह स्तब्ध झालं. जिजाऊंचं मनोगत संपलं तेव्हा लोकांना टाळ्या वाजवायचं भान उरलं नव्हतं.आणि काही क्षणानंतर सुरू झाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तुफानी जय जयकार…
             निमित्त होतं लोकांचे दोस्त संघटनेच्या दोस्त कला मंचने आयोजित केलेल्या हर सवाल का जवाब…बाबासाहेब या संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचं.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोस्त कला मंच तर्फे २ डिसेंबर रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रवि भिलाणे यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम सादर करण्यात आला.यावेळी विविध कलाप्रकरातून शिव शाहू फुले आंबेडकरी विचारधारा मांडण्यात आली.संगमनेरहून आलेल्या छाया ढगे या कार्यकर्तीने सादर केलेली जिजाऊंची व्यक्तिरेखा त्यापैकीच एक.
         कार्यक्रमाच्या सुरवातीलाच जेव्हा बुद्ध वंदना सुरू झाली,तेव्हा मंचावर बुद्ध अवतरले आणि प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करून गेले.अभिनेते गणेश टिकम यांनी बुद्ध साकारला तर प्रसिद्ध गायक  प्रितम बावडेकर प्रथम नमू गौतमा…म्हणत बुद्ध वंदना घेतली.त्यानंतर मंजुषा गोवर्धन पेशवे यांनी भीमराया घे तुला या लेकरांची वंदना म्हणत बाबासाहेबांना सुरेल अभिवादन केले.अदिती पोपट सातपुते,गजेंद्र मांजरेकर,हर्षवर्धन वर्तक या गायक मंडळींनी अर्थपूर्ण गाण्यातून आंबेडकरी विचारधारा,संविधान आणि लोकशाहीचा जागर मांडला.बाळासाहेब उमप यांनी अण्णाभाऊ साठे यांचं,जग बदल घालुनी घाव हे गीत नव्या आणि साध्या सोप्या चालीत बांधून अप्रतिम सादर केले.गणेश टिकम यांचा कबीर जेव्हा प्रेक्षकाने फिरत, कबिरा कहे ये जग अंधा म्हणू लागला तेव्हा लोक भारावले.अभिनेत्री दिपाली बडेकरने कार्यक्रमाचे थीम साँग,हर सवाल का जवाब…बाबासाहेब सादर करून कार्यक्रम क्लायमॅक्सवर नेला.लोकशाहीर संदेश गायकवाड यांनी हे गीत लिहिले आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार संजय शिंदे आणि लढाऊ कार्यकर्त्या ज्योती बडेकर यांनी केले.
           प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री छायाताई कोरेगाव,संदेश शालिनी संभाजी कर्डक,ईशान संगमनेरकर,अनंत धनसरे यांनी विद्रोही कविता सादर केल्या.तर ज्ञानेश पाटील आणि सुमेध जाधव यांनी नामदेव ढसाळ का भावले ते कवितेतून सांगितले.आर्ट डायरेक्टर राकेश सुतार आणि सचिन सुतार यांच्या विरार ग्रुपने, चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून आजतागायत सुरू असलेला घोटभर पाण्यासाठीचा संघर्ष नृत्य नाटीकेतून जीवन केला.सुतार बंधूंनी चार हजार स्क्रू वापरून तयार केलेली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लोकांची दाद मिळवून गेली.संतोष लिंबोरे पाटील यांच्या स्वरीता आर्ट ने वाद्यवृंद,ध्वनी आणि काही कलावंत ही बाजू सांभाळली.
           संगमनेरच्या ग्रामीण वस्तीतून,उपेक्षित समाजातून आलेल्या राधा चव्हाण या हरहुन्नरी कलावंत कार्यकर्तीने सावित्रीमाई फुले यांची सहकारी फातिमा शेखची व्यक्तिरेखा रंगमंचावर जिवंत केली.फातिमा बीबी कदाचित पहिल्यांदाच रंगमंचावर साकार झाल्या असाव्यात.राधाची फातिमा लोकांच्या काळजात घर करून गेली.
      यावेळी दोस्त कला मंचच्या वतीने प्रतिकूल परिस्थितीत संघर्षरत असणाऱ्या राकेश शिर्के,राजू मोरे आणि शैलजा गणपत सावंत या कार्यकर्त्या कलावंतांचा प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि स्मृती चिन्ह देऊन राजाराम खरात,काशिनाथ निकाळजे,राहुल गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सन्मान निधी पुरस्कृत करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश डोंगरे यावेळी उपस्थित होते.
            रवि भिलाणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित शेकडो लोकं,कलावंत कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे गाणं म्हणत संगीतमय आदरांजली कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली…
हर सवाल का जवाब…बाबासाहब !
हर जुल्म का हिसाब…बाबासाहब !!
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *