- 39
- 1 minute read
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खुले पत्र
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 41
२६ नोव्हेंबर " संविधान दिना"निमित्त आपणासाठी हे खुले पत्र.....
प्रति,
मा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ / संघ परिवार
भारतीय जनता पार्टी,
प्रमख्य, पदाधिकारी,
लोक प्रतिनिधी आणि अंधभक्त
संपूर्ण देश, संपर्ण महाराष्ट्र .
मुबई…..
सविनय जयभीम, जय संविधान, जय महाराष्ट्र
२६ नोव्हेंबर ” संविधान दिना”निमित्त आपणासाठी हे खुले पत्र……
पत्रास कारण की……..
आपला राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी आणि आपली मातृ, पितृ संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ परिवारातील अन्य संस्था संविधान व लोकशाही विरोधी असल्याचे अनेक घटनांवरून अनेक वेळा स्पष्ट झालेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विनायक दामोदर सावरकर आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभेने तर संविधान निर्मितीच्या कार्याला पहिल्या दिवसांपासून विरोध केलेला आहे. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही विरोध केलेला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी, बलराज मुधोक, दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाने ही संविधान निर्मितीच्या कार्याला व प्रत्यक्ष संविधानाला विरोध केल्याचे स्पष्ट पुरावे आणि घटना साक्षी देत उभ्या आहेत. आपली मातृ पितृ संस्था असलेला संघ तर आज ही संविधान मानायला तयार नाही. संवैधानिक चौकटीत तो नोंदणीकृत ही नाही. हे कृत्य देशविरोधी आहे. संविधान व लोकशाही विरोधी आहे. आज आपल्या देशात जे जे संविधान विरोधी ते ते सर्व देश विरोधी व देशद्रोही कृत्य आहे. यात काही शंका नाही. हे आपल्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्यासाठी हे खुले पत्र.

भारत हे राष्ट्र सार्वभौम, समाजवादी व धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. यास ही संघ, संघ परिवार, भाजपचा विरोध आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोलवलकर यांच्या ” बंच ऑफ थॉट ” ( BANCH OF THOUGHT ) मधील विचारावर संघ चालत असल्याने मनुस्मृतीलाच संघ विधान मानत आहे. ही कृती ही लोकशाही व संविधान विरोधी आहे. त्यामुळे लोक, संस्था, राजकीय पक्ष, संघटना संविधान व लोकशाही राज्य व्यवस्थेला मानत नाहीत, ते सर्व देशविरोधी व देशद्रोहीच आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. संघ सामाजिक संघटन असल्याचा दावा करतो. पण लोकशाही व संविधानाच्या कुठल्याच चौकटी संघ मानत नाही. साधी नोंदणी करायला ही तयार नाही. हे आपल्याला माहित असेलच. आपला राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी याच संघाची राजकीय शाखा आहे, हे ही आपणाला माहित असेल असे समजायला हरकत नाही. भाजप लोकशाही व संविधानाला मानतो की नाही, हे आपल्याला चांगलेच माहित आहे. बाकी जनतेला तर माहित आहेच की, संविधानाच्या सार्वभौम, समाजवाद व धर्म निरपेक्षता या मुख्य गाभ्यालाच आपल्या सर्वांचा विरोध आहे.
आपला राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीची देशातील निवडणूक आयोगाकडे संविधानाच्या चौकटीत नोंदणी झालेली आहे. आपण त्या नोंदणी कृत पक्षाचे पदाधिकारी आहात. नगरसेवक/ आमदार/ खासदार आहात. त्यामुळे सार्वभौम, समाजवादी व धर्मनिरपेक्षता यासह संविधान स्वीकारणे आपले कर्तव्य आहे. तसेच नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्री म्हणून आपण संविधानाच्या चौकटीत शपथ ही घेतली आहे. त्यामुळे आपण संविधानाचे रक्षक आणि संरक्षक बनले पाहिजे व संविधान न मानणाऱ्या शक्तींच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, ही आपल्याकडून अपेक्षा आहे….! पण आपण स्वतःच संविधान व लोकशाहीच्या विरोधात उभे आहात.
संविधानाचे शिल्पकार, निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर ये महापरिनिर्वाण दिनी आपण बाबरी मशीद शहीद केली. हा हल्ला एका मशिदीवरील नव्हता व नाहीतर तर तो संविधानाच्या शिल्पकारावरील हल्ला होता व आहे. त्याशिवाय २६ / ११ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी मुंबईत अतिरेकी हल्ला होतो. व त्यानंतर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येवू लागला आहे. तुमची ही नीच कृत्य समजून येत आहेत. पण लक्षात ठेवा या देशातील प्रत्येक माणूस अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज, संविधान व लोकशाही राज्य व्यवस्थेवर निष्ठा ठेवून आहे. त्यामुळे अंतिमतः तुमचा पराभव अटल आहे. हा तुम्ही डेमेज करू शकता. जे आज करीत आहात. डॉ. आंबेडकर, त्यांच्या संविधान व लोकशाही विरोधी लढणे म्हणजे शंभर टक्के हार. मग हरणारी लढाई का लढता. याचा विचार संविधान दिनानिमित्त करा.
२६ जानेवारी १९५० रोजी या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधान लागू करण्यात आल्याने हा दिवस प्रजासत्ताक दिन आहे. या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता आलेली आहे. तर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान पूर्णतः स्वीकारून त्यास मान्यता मिळाल्याने २६ नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिना निमित्ताने या पत्रासह संविधानाच्या परिशिष्ठाची प्रत प्रत्यक्ष भेटून अथवा अन्य मार्गाने आपल्या पर्यंत पाठवित आहोत. तसेच आपण संविधानाच्या बाजूने म्हणजे देशासोबत उभे राहवे, ही अपेक्षा ही आहेच….! आता आपण ठरवायचे आहे की, संविधानासोबत उभे राहून राष्ट्रभक्त बनायचे की, संविधानाला विरोध करून राष्ट्रद्रोही बनायचे. इतिहास दोन्ही बाजूच्या नोंदी ठेवतो. अन माफ ही करीत नाही. हे ही आवर्जून सांगतो.
धन्यवाद…….!
………………………… ……………
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश.
0Shares