• 3
  • 1 minute read

रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत !

रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत !

रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत !

जेव्हा रुपयाचे अवमूल्यन होते तेव्हा काय होते ? सगळयात पहिला परिणाम म्हणजे महागाई वाढते ! समजा , एका घड्याळाची किंमत ₹100/- आहे. रुपयाचे 10% अवमूल्यन झाल्यावर त्याची किंमत ₹110/- होऊ शकते ! म्हणजे जी वस्तू आधी कमी पैशात भेटायची तीच वस्तू (चलनाचे अवमूल्यन झाल्यावर !) अधिक चलन मोजून विकत घ्यावी लागते. अर्थात , अशा अवमूल्यनाचा परिणाम केवळ घड्याळ्याच्या किंमतीवर होत नसतो तर तो बाजारातील प्रत्येक वस्तूवर होत असतो ! म्हणून रुपयाचे अवमूल्यन झाल्यावर सर्वप्रथम सामान्य जनतेच्या खिशाला झळ बसते. 
 
हा झाला थेट परिणाम ! 
 
आता अप्रत्यक्ष परिणाम बघण्यासाठी रिजर्व बॅंक ॲाफ इंडिया या केंद्रीय बॅंकेची मागील काही महिन्यांतील आकडेवारी बघू या !
 
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होते तेव्हा सर्वप्रथम रिजर्व बॅंक मार्केटमध्ये डॉलर ओतून हे अवमूल्यन थांबवण्याचा प्रयत्न करते. ‘बिझनेस स्टॅंडर्ड’ हे एक अर्थविषयक दैनिक आहे. तारीख 22 जानेवारी 2026 च्या अंकात या दैनिकाने अशी बातमी प्रसिद्ध केली आहे कि , ॲाक्टोबर 2025 पासून रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी रिजर्व बॅंकेने $45/- बिलियन एवढे डॉलर्स खर्च केले आहेत ! ऑक्टोबर 2025 ते 22 जानेवारी 2026 म्हणजे चार महिने देखील होत नाहीत ! तरीही आपण चार महिन्यांचा काळ हिशोबात घेऊ या ! 
 
रुपयाच्या अवमूल्यनाचा विपरीत परिणाम जाणून घेण्यासाठी आपण हे एकच उदाहरण पुरेसे आहे. 
आता 1 बिलियन म्हणजे 100 करोड ! 
 
या हिशोबाने $45/- बिलियन म्हणजे 
45 बिलियन डॉलर्स गुणिले 100 ! 
 
$45 X 100 = $4500/- कोटी ! 
 
आजचा डॉलरचा दर ₹91.63/- एवढा आहे. 
 
म्हणून ही किंमत रुपयात काढण्यासाठी आपणांस $4500/- कोटी या रकमेला ₹91.63/- या रकमेने गुणावे लागेल !
 
म्हणून $4500 X ₹91.63 = ₹412335/- 
         = चार लाख बारा हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये ! 
 
आता नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध ‘एम्स’ म्हणजे ‘ऑल इंडिया इन्स्टिट्युट ॲाफ मेडिकल सायन्स’ ही संस्था घ्या ! देशातील हे नामवंत सरकारी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आहे. आजारी पडल्यावर सगळे व्हीआयपी येथे उपचार घेण्यास जातात ! “विश्वगुरू” गुगल सांगतात कि , एक ‘एम्स’ स्थापन करण्यासाठी ₹800/- ते ₹1800/- एवढा खर्च येतो. सोईसाठी आपण ₹1800/- एवढा खर्च विचारात घेऊ या !
 
आता चार लाख बारा हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये या रकमेला आपण ₹1800/- कोटी या रकमेने भागू या ! 
 
4,12,335 / 1800 = 229.075 = 229 
 
अर्थ सरळ आहे !
 
रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी रिजर्व बॅंकेने मागील चार महिन्यात जेवढे डॉलर्स खर्च केले आहेत तेवढ्या डॉलर्समध्ये देशात 229 ‘एम्स’ बांधता आले असते !!
 
आता तुम्ही पुढील प्रश्न विचारू शकता —- अर्थात इच्छा असली तर !
1. देशातील हिंदूंचे आरोग्य सांभाळण्यासाठी देशातील हिंदुत्ववादी सरकार देशातील प्रत्येक राज्यात दोन दोन – तीन तीन ‘एम्स’ का बांधत नाही ? 
2. ⁠देशातील हिंदूंचे आरोग्य सांभाळण्यासाठी हिंदुत्ववादी नेते – कार्यकर्ते , देशातील प्रत्येक राज्यात दोन दोन – तीन तीन ‘एम्स’ बांधाव्यात ; यांसाठी हिंदुत्ववादी सरकारकडे आग्रह का धरीत नाहीत ?
3. ⁠देशातील हिंदूंचे आरोग्य सांभाळण्यासाठी हिंदुत्वववादी नेते – कार्यकर्ते देशातील प्रत्येक राज्यात दोन दोन – तीन तीन ‘एम्स’ बांधाव्यात यांसाठी आंदोलन का करीत नाहीत ? 
 
अर्थ सरळ आहे !
 
देशातील हिंदूंच्या आरोग्याचे ना हिंदुत्ववादी सरकारला देणेघेणे आहे ना हिंदुत्ववादी नेत्यांना ! 
देशातील हिंदूंनी रोगट राहावे , त्यांना आहेत त्यांहून अधिक कोणत्याही वैद्यकिय सोईसुविधा मिळू नयेत , यांवर हिंदुत्ववादी सरकार व हिंदुत्ववादी नेते – कार्यकर्ते यांचे एकमत आहे ! 
रुपयाच्या अवमूल्यन समजून घेण्याची ही क्षमता देशातील सर्वसामान्य हिंदूंमध्ये आली तर हिंदुत्ववादाचा हा अर्थ देशातील हिंदूंना अगदी सहजगत्या समजून येईल ! 
हीच क्षमता हिंदूंमध्ये निर्माण व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी आपले जीवन अर्पण केले !
 हीच क्षमता हिंदूंमध्ये निर्माण व्हावी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सैतानी जातीसंस्थेच्या विरोधात महायुद्ध पुकारले ! 
आणि हीच क्षमता हिंदूंमध्ये निर्माण होऊ नये म्हणून हिंदुत्ववाद्यांचा आजही केवढा आटापीटा चालला आहे !  मुस्लीम द्वेष काय , ‘हिंदू’ दलितांवरील अन्याय – अत्याचार काय , ‘हिंदू’ ओबीसींना आरक्षण नाकारणे काय , काय काय आणि काय काय !!
 
तारीख 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात (हिंदूंसह !) देशातील समस्त जनतेच्या आरोग्यासाठी काय तरतूद केली आहे , हे सर्वांना तपासून बघणे गरजेचे आहे  हिंदूंनी तर अधिक बारकाईने बघणे आवश्यक आहे ! 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक मंगल कामना !
 
 
 शुद्धोदन आहेर
0Shares

Related post

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १ ही जेन झी जेन अल्फा टाळ्या…
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत…
अपघातग्रस्त विमानाचा इतिहास चांगला नसताना ते सेवेत राहिले आणि आजची दुर्घटना घडली

अपघातग्रस्त विमानाचा इतिहास चांगला नसताना ते सेवेत राहिले आणि आजची दुर्घटना घडली

अपघातग्रस्त विमानाचा इतिहास चांगला नसताना ते सेवेत राहिले आणि आजची दुर्घटना घडली अपघात ग्रस्त learjet विमानाची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *