- 517
- 1 minute read
लढा अटीतटीचा आणि वेळ आणिबाणीची…!!
मुठभर सवर्ण सर्व सत्ता स्थानांवर घट्ट मांड मारुन बसले आहेत….!!
मुठभर सवर्णांची ही मक्तेदारी इतरांच्या लक्षात येऊ नये किंवा इतरांच्या डोळ्यात सलू नये म्हणून सवर्ण सत्तेतील काही तुकडे ओबीसी, अल्पसंख्याक, दलित,आदिवाशी वर्गातील सत्तालोलूप व्यक्ति हेरून त्यांच्या कडे फेकतं असतात….!!
वंचितांनो लक्षात घ्या एखादी खुर्ची म्हणजे सत्ता नव्हे. तो सत्तेचा तुकडा असतो….!!
सत्तेचा तुकडा चघळणाराला निर्णय घेण्याचं स्वांतत्र्य नसतं, त्याने होईल तेवढी आपली आर्थिक प्रगती करुन घ्यावी एवढीच सुट दिलेली असते….!!
सर्व जनतेसाठी समतेचे हक्क आणि अधिकार बहाल करणारे संविधान विषमतावादी मुठभर सवर्णाना मान्य नाही…!!
समतेचे अधिकार प्रदान करणारं संविधान सत्तेचे समसमान वाटप व्हावे असा आग्रह धरतो आणि सवर्णाना सत्ता केवळ आपल्या कडेच हवी आहे म्हणून सवर्णाना संविधान मान्य नाही….!!
आता सवर्णानी सर्वच सत्ता हस्तगत केली असल्याने ते संविधान बदलण्यासाठी अधीर झाले आहेत…!!
संविधान बदलण्याची भाषा करणारे म्हणजेच भाजपा किंवा (एनडीए) एका बाजूला आणि संविधान वाचवितो असे फक्त बोलणारे कुठलीच कृती न करणारे आणि घराणेशाही पोसणारे ( इंडिया) दुसऱ्या बाजूला अशा दोन धृवावर मिडियाने निवडणुका आणून ठेवल्या आहेत….!!
भाजपा, आरएसएस आणि कॉंग्रेस प्रणित इंडिया या दोघांनाही संविधान नको आहे, दोन्हीही संविधान द्रोही आहेत.संविधानाच्या चौकटीची मोडतोड करण्याची सुरुवात कॉंग्रेस पक्षानेच सुरु केली आणि त्यावर कळस भाजपा चढवतं आहे हे वास्तव आहे…!!
खरं तर बहुपक्षीय लोकशाही मध्ये निवडणूका दोन धृवावर केंद्रित होणे हे बहुपक्षीय लोकशाही साठी असंवैधानिक आहे, चुकीचे आहे….!!
गोदी मिडियाने निवडणुकीतील तिसरा पर्याय संपवला आहे ही अतिशय घातक बाब आहे….!!
छोट्या आणि प्रादेशिक पक्षांची गळचेपी झाली आहे, त्यांच्या साठी ही अखेरची घरघर तर नाही ना.? अशी शंका उपस्थित होत आहे.जे प्रादेशिक पक्ष दखलपात्र आहेत तेच तग धरून आहेत बाकीच्या सर्वांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आहे…!!
एका अर्थाने ज्या ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुहाने आपली अस्मिता जोपासतं राजकीय वलय निर्माण केलं त्या सर्वांना हद्दपार करण्याचा हा सवर्णाचा डाव आहे हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे…!!
महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तर महादेव जानकर यांचा रासप, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, कपिल पाटील यांचा जनसुराज्य पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाइं, जोगेंद्र कवाडे यांचा पिरीपा, राजेंद्र गवई यांचा रिपाइं, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष, संभाजी ब्रिगेड पक्ष,एआयएम आय एम पक्ष या सर्व पक्षांची कुठचं चर्चा नाही आणि त्यांना आघाडी किंवा युती मध्ये स्थान सुद्धा नाही…!!
एका बाजूने महायुती मध्ये भाजपा कुणालाच मोजतं नाही शिंदे आणि अजित पवार यांनाच तर बोटावर नाचवतं आहेत तर मग बिचा-या छोट्या छोट्या पक्षाचं काय.???
ते अस्वस्थ आहेत मात्र दखल घेतली जात नाही हे वास्तव आहे….!!
दुसऱ्या बाजूने कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वंचित बहुजन आघाडी ला मोजतं नाही तर मग राजू शेट्टी आणि इतरांची काय गतं आहे…???
महायुती आणि मविआ मध्ये आपापले घराणे सत्तेत कायम रहावे म्हणून चढाओढ सुरू आहे…!!
भाजपच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये तेच चेहरे, तीच घराणी काहीच बदल नाही.६० वर्षे जे कॉंग्रेस पक्षाने केले तेच भाजपा करीत आहे तसूभरही फरक नाही….!!
मविआ सुद्धा तेच करणार आहे त्यासाठी त्यांचे एका एका जागेसाठी तानातानी चालली आहे, म्हणून १५ जागेवर घोडं अडलं आहे…!!
दोन्ही बाजूंने सत्तेत कायम रहाणे एवढाचा उद्देश आहे. मात्र मविआ संविधान वाचविण्याचं नवं ढोंग रचतं आहे…!!
मविआ ला संविधान वाचवायचे असेल तर मग लिहून देण्याचं, हमी घेण्याचं, मतदारांचा विश्वास संपादन करण्याचं का टाळतं आहेत.???
वंचित बहुजन आघाडीने लेखी हमी द्या, असे म्हटल्या बरोबर मविआ ने वंचित बहुजन आघाडी सोबतं सुरू असलेल्या वाटाघाटी बंद केल्या हे कशाचे लक्षणं आहे…???
लोकशाही वाचविणे म्हणजे कॉंग्रेस पक्ष परत सत्तेत आणणे एवढाच अर्थ कॉंग्रेस पक्षाला अभिप्रेत आहे…!!
सत्ता राबविण्यासाठी आम्हाला सोईचे होईल अशी घटना बदलणे म्हणजे संविधान बचाव असा सोईचा अर्थ कॉंग्रेस पक्षाला अभिप्रेत आहे, सर्वसमावेशक संवैधानिक मुल्ये शासनात रुजविणे हे कॉंग्रेस पक्षाला अभिप्रेत नाही…!!
आणि म्हणून वेळ आणिबाणीची आणि लढा अटीतटीचा आहे, एका बाजूला स्पष्टपणे संविधान बदलतोय असा ऊघडं पवित्रा घेणारे भाजपा आरएसएस आहे तर दुस-या बाजूला सत्तेसाठी संविधानाची मोडतोड करणारे सरंजामी वृत्तीचे ढोंगी सेक्युलर, पुरोगामी आहेत….!!
अटीतटीच्या लढ्याचे सारथ्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय दक्षतेने एक एक पाऊल टाकतं आहेत…!!
सरंजामी वृत्तीच्या मविआ मधील घटक पक्षांसोबत युतीसाठी तयार जरी असलो तरी, लिहून द्या ही हमी घेण्याची आज रोजी नितांत गरज आहे हे सर्व संविधान प्रेमी जनतेने समजून घेतले पाहिजे…!!
बिहार मध्ये नितिश कुमार यांनी कितीवेळा अलटी पलटी चा गेम खेळला ते लक्षात घेतले तर शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब त्याचं वाटेने जाऊ शकतात ही शक्यता लक्षात घेऊन अंॅड.बाळासाहेब आंबेडकर हमी मागतात यात गैर काय.???
गेल्या दहा वर्षांत म्हणजे २०१४ पासून आतापर्यंत कॉंग्रेस पक्षाने आठ राज्यात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार पुरविले आहेत हे वास्तव आहे मग निवडणुकी नंतर कॉंग्रेस पक्षाचे काही खासदार भाजपला पाठिंबा देतील ही शंका घेतली तर त्यामध्ये गैर काय…????
२०२४ मध्ये संविधान वाचविण्यासाठी चा लढा अटीतटीचा आहे आणि वेळ आणिबाणीची आहे, मिडिया संभ्रम निर्माण करीत आहे म्हणून समस्त संविधानवादी जनतेने गांभीर्याने विचार करावा.मिडियाच्या भूलथापांना बळी पडू नये. दलाल वृत्तीचे पत्रकार बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत हेही लक्षात घ्यावे….!!
संविधान वाचविण्याची लढाई इमानेइतबारे लढणारे नेतृत्व म्हणून एकमेव बाळासाहेब आंबेडकर राजकीय आघाडीवर शड्डू ठोकून ऊभे ठाकले आहेत…!!
अॅड बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या घराणेशाही च्या आड येतात म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी पेड वर्कर पत्रकार कामाला लावले आहेत, मिडिया मध्ये संभ्रम निर्माण करणारे बसले आहेत, सरंजामी पक्षांना, वंचिताचा सत्तेतील वाटा द्यायचा नाही म्हणून राजकीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्ये करीत असतात…!!
या सर्व शक्यता तपासून वंचितांनी, ओबीसी, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी बांधवांनी आपलं मतं बनवावं, मिडिया मधील कुठल्याच बातमीवर लगेच विश्वास ठेऊ नये…!!
लढा अटीतटीचा आहे आपणां सर्वांना तो निकराने लढायचा आहे हेही लक्षात घ्या…!!
जयभीम.
-भास्कर भोजने.