• 42
  • 1 minute read

लोकशाहीत ओबीसींचा धर्म कोणता? पक्ष कोणता?

लोकशाहीत ओबीसींचा धर्म कोणता? पक्ष कोणता?
भारतात धार्मिक,सामाजिक,आर्थिक विषमता आहे.
त्यामुळे केवळ राजकीय निवडणुकांतून मागासवर्गीयांना न्याय मिळणे अवघड आहे.
अर्थात लोकसख्येच्या ५२ टक्के एवढ्या मोठ्या समूहाला न्याय मिळत नसेल?
 तर आपली लोकशाही अपयशी ठरतेय.
राजकारणा बरोबरच सामाजिक हक्कांची आंदोलने,धर्मचिकित्सा करून धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मिळविणे,जमीन ,जंगल, पाणी घरे, गावठाणे उद्योगाचे,व्यवसायांचे अधिकार हे भारतात समता निर्माण करून ओबीसींना अधिकार देण्यासाठी गरजेचे आहेत.
 
“आजच्या सर्वच वृत्तपत्रांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमधले ओबीसी आरक्षण बचावले “अशा आशयाच्या बातम्या छापल्या आहेत.
सोबत मां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या बातमीचे स्वागत ?अशा बातम्या आहेत.इम्पीरिकल डेटा नाही म्हणून ओबीसी आरक्षण पाकिस्तानने नाकारले का?
 
कमळात स्वतःस अडकवून घेतलेल्या भुंग्या प्रमाणे भाजपा मधील ओबीसी आमदार खासदारांनी स्थिती आहे.
या ओबीसींच्या आरक्षण हक्कांच्या बातमीचा आनंद कसा व्यक्त करायचा? 
हाही त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे.
 
कालच नवी मुंबईचे माजी युवा आमदार संदीपजी नाईक आणि पनवेल तालुक्यातील युवा आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
संदीपजी नाईक आणि प्रशांत ठाकूर हे अत्यंत अभ्यासू कर्तृत्व वान परंतु विनम्र तरुण राजकीय नेते आहेत.माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत.कायम असतील.
ओबीसी समाजाने भरपूर राजकीय अपेक्षा ठेवावी .
असे हे आगरी ओबीसी समाजातील नेतृत्व आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतील? अशी ही दोन सुंदर राजहंसाची जोडी आहे.
 
लोकनेते दि बा पाटील यांच्या ओबीसी नेतृत्वाची राजकीय परंपरा आगरी कोळी समाजाला आहे.
एवढे सारे असले तरी “ओबीसी” हा शब्द त्यांनी लावलेल्या असंख्य बॅनर वर पहायला मिळत नाही.
हे दुःख या परिसरातील या दोन युवा नेतृत्वाचे नाही.
 साऱ्या आगरी कोळी भंडारी कराडी ईस्ट इंडियन ओबीसी समाजाचे दुःख आहे.
 
ओबीसी या शब्दाचा मूळ अर्थ आहे “शूद्र”हलका,कमी प्रतीचा,गुलाम,.तो ओबीसींना प्रत्यक्षात अनुभवायला रोज येतो .
पण उघडपणे कुणी बोलू शकत नाही.
आम्ही ओबीसी समाजाचे नेतृत्व करतो. याची लाज तरुणांना वाटत असेल ?
तर ओबीसी आरक्षणाचा अर्थ कसा समजणार?
 
लोकनेते दि बा पाटील यांनी सिडको विरोधात संघर्ष करून फक्त साडे बारा टक्के जमीन वाचवली.बाकीची सिडकोने लुटली.
 म्हणून दिबांमुळे आज या आधुनिक शहरात आगरी कोळी कराडी समाजाचे अस्तित्व दिसते.
अन्यथा सिडको, सेझ प्रकल्पातून ओबीसींना पूर्णपणे हद्दपार करण्याचा डाव, महाराष्ट्रातील ब्राह्मण मराठा वैश्य राज्यकर्त्यांनी आखला होता.
यात उच्चवर्णीय राजकीय नेतृत्वाकडून होणारे ओबीसी शिरकाण थांबविणे. म्हणजे ओबीसी नेतृत्व लोकनेते दि बा पाटील यांचे ऐतिहासिक कार्य होते.
तरुणांच्या समोर हा मनुस्मृती विरोधी शूद्र ओबीसींचा संघर्ष ओबीसी विचारवंत मांडत नाहीत.
त्यामुळे आमची गुलामी संपविणारा महापुरुष आम्हास समजत नाही.
सामान्य आमदार खासदार आणि लोकनेते दि बा पाटील यांच्यातला हा फरक न समजल्यामुळे ओबीसी आरक्षण म्हणजे काय?
हे आरक्षणाने महापौर झालेल्या,पनवेल,नवी मुंबईच्या आगरी नेत्यांना अजूनही उमजलेले नाही.
नगरसेवकांचे काय घेऊन बसलात?
 
लोकनेते दि बा पाटील यांचे नवी मुंबई विमानतळास नाव देण्याचे आंदोलन म्हणजे, ओबीसी हक्कांचे आंदोलन आहे.
आगरी कोळी लोकांवर शिवसेनेने जे हिंदुत्व लादले त्यातून मुंबई ठाण्यात मराठा नेते दादागिरी करू लागले.
यातूनच एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन, लोकनेते दि बा पाटील यांचा,” ओबीसी विचार” संपविण्याचा राजकीय प्रयत्न केला.
आजच्या लोकशाहीत मागास वर्गीय हिताचा विचार हाच त्या त्या समाजाचा राजकीय अस्तित्वाचा विचार ठरतो.
शिवसेनेच्या हिंदुत्वाचे ठाणे मुंबईतील आगरी कोळी समाजाचे अस्तित्व संपवून एकनाथ शिंदे याचे क्षत्रिय मराठा वर्चस्व आणले.
 
आज नवी मुंबईतील (नगरातील)ओबीसी नेते गणेश नाईक हे वनमंत्री म्हणून (वनवासी) झाले.
तर सातारच्या वनातील एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून मुंबई ठाणे रायगड मधील आगरी कोळी ओबीसींची कोळीवाडे गावठाणे, जमिनी विकासाचे नाव सागून उध्वस्त करीत आहेत.
 
मुंबई ठाणे रायगड मधल्या अनेक ओबीसी नेतृत्वाच्या आमदार खासदारकीच्या जागा अलगदपने ब्राह्मण मराठा वैश्य लोढा गिळत सुटले आहेत.आता स्थानिक स्वराज्य संस्थेत ते आगरी कोळी ओबीसी तरुणान पक्षाची तिकिटे देतील का?
 
मनुस्मृतीने “शूद्र “निर्मिले. 
शूद्र पूर्वी राज्यकर्ते होते.
वेद उपनिषदे कथा पुराणे लिहिणाऱ्या लोकांनी आमची गुलामी लिहिली.
ब्राह्मण ब्रम्हदेवाच्या मुखातून , क्षत्रिय मराठे बाहुतून,वैश्य मांड्यातून जन्मले .
हा विषमतेचा जन्माधारित सिद्धांत आमच्या गुलामीचा सिद्धांत ज्या वैदिक हिंदू धर्माने मांडला तो आमच्यासाठी विषमता वादी हिंदू धर्म असेल? तर आज आम्हास अनुकूल आहे का?
नसेल तर?
 आमचा धर्म म्हणजे समतावादी आजचे भारतीय संविधान आहे.
हे ओबिसिनी समजून घ्यावे.
 
लोकशाहीत अनेक उच्च जातींचे राजकीय पक्ष हे स्त्री शूद्र अतिशूद्र यांची गुलामी सांगत आलेत.
 म्हणूनच मनुस्मृतीन प्रथम गुलाम केलेली , महाराष्ट्रातील कोणतीही स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री होत नाही .
आम्हा शूद्र अतिशूद्र पुरुषांची गुलामी, आमच्या स्त्रियांची गुलामी जोपर्यंत संपत नाही, 
तो पर्यंत कशी संपणार?
 
आंबेडकरी बांधवांना धार्मिक राजकीय गुलामी संपविण्याचा दीक्षांत समारंभ डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच घेतला होता.
त्यामुळे त्यांनी बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी ,रिपब्लिकन पक्ष असे अनेक पक्ष निर्माण केले.
विषमता समजून समता आणता येईल.
 अशी भूमिका घेणारा पक्ष ओबीसींकडे दिसत नाही.
यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी आरक्षण मिळूनही उच्च जातीच्या शोषणाविरुद्ध फडणवीस, पवार, शिंदे यांच्या उपस्थितीत ओबीसी उमेदवार आपल्या शोषित भाऊ बहिणी यांना आपली हजारो वर्षाची गुलामी संपवण्याचे, ज्वलंत समतावादी विचार कसे सांगू शकतील.?
कारण मनुवादी हिंदुत्व कळल्याशिवाय,
 जाळणे अवघड आहे.
कालबाह्य जुने फेकून, 
फाडून टाकल्याशिवाय या देशात ओबीसींच्या न्यायाचा समतेचा भारतीय संविधानाच्या अधिकाराचा विषय रुजणार कसा.?
 
ओबीसी तरुणांनी उच्च जातीय नेतृत्वाचे राजकीय बंध झुगारून नव्या स्वातंत्र्याचा विचार मांडण्यासाठी पुढे यावे.
राजकीय विचार मंचावरून, सर्व राजकीय पक्षांना विचारावे. ५२टक्के लोकसंख्या असलेल्या आमच्या समाजाचा सामाजिक, राजकीय ,आर्थिक, वाटा कुठे आहे?.
 
जय ओबीसी .
 
राजाराम पाटील.
उरण रायगड.
८२८६०३१४६३.
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *