• 132
  • 1 minute read

वंचित बिचारी पूजा खेडकर व प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा (खे)खोडकर परिवार…!

वंचित बिचारी पूजा खेडकर व प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा (खे)खोडकर परिवार…!

वंचित बिचारी पूजा खेडकर व प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा(खे)खोडकर परिवार…!

          गोपीनाथ मुंडे परिवाराशी घनिष्ठ संबंध असणारे व लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत भाजपमध्ये सक्रिय असलेले माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर अचानक वंचितची उमेदवारी मिळवून अहमदनगर येथून लोकसभेची निवडणूक कशी काय लढवितात ? यावर वंचित बहुजन आघाडीत अंतर्गत चर्चा होऊ शकते का ? झाली आहे का ? वंचितच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात तेवढे स्वातंत्र्य आहे का ? भाजपशी या ना त्या, कुठल्या तरी नात्याने संबंध असणाऱ्यांच वंचितची उमेदवारी कशी काय मिळते ? असे काही ठळक प्रश्न वंचित बहुजन आघाडीबाबत राज्यातील राजकारणात चर्चीले जात आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार जाहीर होत असताना ही आणखी एक चर्चा होती की, वंचितचे उमेदवार ” सागर ” या सरकारी बंगल्यावरूनच साधन, सामुग्रीसह वंचितला पुरविले जात आहेत. हा सागर बंगला कुणाचे निवासस्थान आहे ? हे थोडे बाजूला राहू देत.ते साऱ्यांना माहित आहेच. पण आंबेडकरी विचाराच्या समाजकारण व राजकारणात शील म्हणजे चरित्रला अतिशय महत्व आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आपले स्वतःचे आत्मचिंतन करावे. मग ते कुणी ही असोत.
          महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्या सर्वच्या सर्व लढवून वंचितला एका ही ठिकाणी विजय मिळाला नसला तरी सुद्धा, तसेच लोकसभेच्या 48 पैकी काही अपवाद सोडला तर सर्वच्या सर्व जागा लढवून एक ही जागा जिंकता आली नसली तरी राज्याच्या राजकारणात वंचित इतकी चर्चा दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षाची होत नाही. मोदींच्या गोदी मिडियाचे बाळासाहेब आंबेडकर हिरो आहेत.ना वंचित इतका दबदबा अन्य कुठल्या राजकीय पक्षाचा आहे. संबंधित लोकसभा अथवा विधानसभा मतदारसंघात वंचितचा उमेदवार कसा निवडून येईल, अशी चर्चा एकाही मतदारसंघात होत नाही की,होताना दिसत ही नाही. पण वंचितच्या उमेदवाराचा फटका इंडिया / मविआ आघाडीला कसा बसेल व संविधान विरोधी असलेल्या भाजपला कसा फायदा होईल ? याची चर्चा मात्र सर्वत्र सुरु असते. याचे कारण आहे ते म्हणजे केवळ कुणाला तरी पाडण्यासाठी व कुणाला तरी जिंकून देण्यासाठी वंचित निवडणूक रिंगणात उतरते. अन निकालावरून ते स्पष्ट ही झाले आहे. फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडविणाऱ्या शक्तींना सत्तेवर जाण्यापासून रोखण्याचा वंचितचा हा सतत प्रयत्न राहिला आहे. निवडूण न येणारे पण इंडिया अथवा मविआचा उमेदवार पडेल इतकी मतं घेणारा उमेदवार वंचित मैदानात उतरविते. अन विशेष म्हणजे या उमेदवारांचा व वंचित समाज घटकांचा तसा संबंध ही कधी आलेला दिसत नाही, असेच चेहरे वंचितकडून निवडणुकीच्या मैदानात उतरतात. अन कार्यकर्ते बिचारे उपाशी तापाशी प्रचाराला लागतात.
         वंचितचे उमेदवार बघूयात……… अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप खेडकर यांचे वार्षिक उपन्न 1 कोटी रुपये इतके आहे. त्यांची एकूण संपत्ती 100 कोटी आहे. 110 एकर शेत जमिनीचे ते मालक आहेत. राज्यातील विविध शहरात त्यांच्या नावावर 7 फ्लॅट आहेत. 1 लाख फूट क्षेत्रफळ असलेले 6 गाळे त्यांच्याकडे आहेत. बायको मनोरमा खेडकर त्याही कोटींच्या धनी आहेत. भाजपच्या सरपंच आहेत. त्यांच्याकडे बंदूकीचा परवाना आहे. पंकजा मुंडे यांना 13 लाख रुपयांचे दान या परिवाराने दिले आहे, मुलगी वाम मार्गाने आयएएस बनली आहे, मुलगा विदेशात शिक्षण घेत आहे, अन प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीतील या अशा वंचित परिवाराकडे ऑडीसारख्या चार गाड्या आहेत. संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा देणारा, हा दिलीप खेडकर व त्यांचा परिवार वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने वंचित आहे. हेच फार भयानक आहे.
         पूजा व मनोरमा खेडकर या कोट्याधीश पण वंचित महिलांवर विविध आरोपाखाली आता पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पण वंचित आघाडी, प्रकाश आंबेडकर अन अंधभक्त कार्यकर्ते यावर बोलायला तयार नाहीत. बरं हे काही अपवादात्मक एकच उदाहरण नाही. पुण्यातील वसंत मोरे निवडणुकीपुरते वंचित झाले होते. शिरूरमध्ये अटल गुन्हेगार व भाजपचे पदाधिकारी कोण बांदल ते भाजपच्या डायरेक्ट वर्तुळातील आहेत, त्याला उमेदवारी जाहीर झाली. जागृत जनतेने त्याचे बिंग फोडले. खूप नामुष्की झाली. त्यानंतर त्यांचे तिकीट कापले. पण अटल गुन्हेगार बांदल ही वंचित होण्यासाठी तयार झाला होता. लातूरमध्ये माजी सनदी अधिकारी नरसिंहराव क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार ) उमेदवारी दिली नाही. ते लगेच वंचित झाले. लढले, पडले अन निवडणूक संपताच त्यांनी करोडोच्या दोन गाड्या खरेदी केल्या. दुसरे पंजाबराव डक. परभणीतील वंचितचे उमेदवार. ओबीसीच्या ताटातील आरक्षण दादागिरी करुन पळवू पाहणाऱ्या मनोज जरांगेचे साथीदार. मराठा आंदोलनाच्या काळात ते ओबीसीना धमक्या देत फिरले. ओबीसी नेत्यांना गावाबंदी करून कायदा हातात घेतला. ते ही वंचित झाले. रमाबाई कॉलनी हत्याकांड, भोतमांगे हत्याकांड, कोपर्डी व जवखेडा आदी प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेत दलितांवर अन्याय करणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम हेही प्रकाश आंबेडकर यांना वंचितच वाटत होते. असे आयात केलेले अनेक माजोरी उमेदवार वंचितचे होते. निवडणुका लढविण्यासाठी तात्पुरते ते वंचित होतात.निवडणुका संपताच ते जेथून आले हॊते तेथे पून्हा सुखरूपपणे निघून जातात. कारण त्यांच्या मालकांचा कार्यभार पार पडलेला असतो. कार्य सफल झालेले असते.
        देशात अन राज्यात ही युती अन आघाड्यांचे राजकारण हे अपरिहार्य झाले आहे. कुठल्याच राजकीय पक्षात एकटे लढण्याची हिंमत नाही. भाजप व मोदींचेच उदाहरण घ्या. अनेक ” म ” ची पावर त्यांच्याकडे आहेत. म म्हणजे…. मनी आहे, मसल आहे, मॅन आहे, मशीन आहे, त्याच बरोबर मुसलमान आहे, मशीद आहे, मदरसा आहे, मटण आहे. इतकेच काय ईडी, सीबीआय ही आहे, असे असताना सत्ता मिळविण्यासाठी त्यांना 38 पक्षांना सोबत घ्यावे लागत आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. यातील काहीच सोबत नसताना सत्ताधारी बनण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार अन ते ही सर्वच्या सर्व मतदारसंघात उतरणे येड्यागबळ्याचे काम नाही. ते उरतात. लढतात. ज्यांना पाडायचे त्यांना पाडतात. आपले किती वाटोळे झाले याचा विचार ते करीत नाहीत. हे काम खूप हिंमतीचे व निगरगठ्ठ लोकच करू शकतात.
        बाकी इतकेच की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात…..” मी खूप शिकलो आहे, अनेक पदव्या माझ्याकडे आहेत. म्हणून माझा सर्वत्र दबदबा आहे, असे नाहीतर तर माझ्याकडे शील आहे. माझे चारित्र्य स्वच्छ आहे म्हणून माझा दबदबा आहे. शील, चरित्र्य अन चारित्र्याला महत्त्व देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व प्रकारच्या अन सर्वच क्षेत्रातील चळवळीने किमान यांच्या तरी विचार करायला हवा.
…………………………

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश.)

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *