वर्षात 240 दिवस हजर न राहिल्यास उपदान (gratuity) मिळत नाही.
मी नरेंद्र महाजन भांडार अधिकारी आपणांस एक महत्वाची माहिती देऊ इच्छितो की, आपण नोकरी पुर्ण केल्या नंतर म्हणजे सेवानिवृत्त नंतर कर्मचाऱ्यांस नियमानुसार उपदान (gratuity) मिळत असते. उपदान (gratuity) कशी मिळते तिचा हिशोब कसा केला जातो या बाबत आज 90% कर्मचाऱ्यांना माहिती नाही आहे. एकाच दिवशी रुजू झालेले कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त नंतर उपदान (gratuity) वेगवेगळी का मिळते या बाबत ही बर्याच कर्मचाऱ्यांना माहित नसल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असते..
एकदा कर्मचारी एका वर्षात 240 दिवस हजर राहिला नाही तर त्या कर्मचाऱ्यांला त्या वर्षाची उपदान (gratuity) मिळत नाही.
समजा एक कर्मचाऱ्यांची सेवा कालावधी 30 वर्ष आहे व त्यातील एका वर्षात त्या कर्मचाऱ्यांची हजेरी 239 दिवसांचाच आहे तर ते वर्ष उपदान (gratuity) पकडण्यात येत नाही म्हणजे सदर कर्मचाऱ्यांस फक्त 29 वर्षाची उपदान (gratuity) मिळते…
दुसरे उदाहरण: समजा एका कर्मचाऱ्यांची सेवा कालावधी 30 वर्ष 180 दिवस असेल तर फक्त 30 वर्षाची उपदान (gratuity) मिळते.. परंतु कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी 30 वर्ष 181 दिवस असेल तर अशा कर्मचाऱ्यांस 31 वर्षाची उपदान (gratuity) मिळते…
या वरून सर्वानी एक बाब लक्षात ठेवा की 1 दिवसाने आपले उपदान (gratuity)चे किती नुकसान होते. आपण गैरहजर राहिल्यास आपलेच नुकसान होते सदर नुकसान आज लक्षात येत नसुन सेवानिवृत्त वेळी लक्षात येत असते..
मला माहित आहे की आपले सर्वाचेच पगार कमी आहेत, घरच्या जबाबदार्या फार आहेत व बहुतांश कर्मचारी लांबची राहणारी असल्याने रजेचे व गैरहजरीचे प्रमाण अधिक आहे.परंतू आपण एका वर्षात 240 दिवस हजेरीची होतील या कडे लक्ष द्या म्हणजे ते वर्ष उपदान (gratuity) पकडण्यात येईल… व सेवानिवृत्त नंतर होणारे आपले आर्थिक नुकसान होणार नाही.