• 29
  • 1 minute read

वाताहत झालेले लोकं बौद्ध धर्मीय असल्यामुळे ते ब्राम्हणांच्या तिरस्कारला आणि घृणेला कारणीभूत ठरले. आणि, त्यांच्या अस्पृश्यतेचे प्रमुख कारण म्हणजे गोमांस भक्षण होय.

वाताहत झालेले लोकं बौद्ध धर्मीय असल्यामुळे ते ब्राम्हणांच्या तिरस्कारला आणि घृणेला कारणीभूत ठरले. आणि, त्यांच्या अस्पृश्यतेचे प्रमुख कारण म्हणजे गोमांस भक्षण होय.

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४० (१७ जुलै २०२४)
(वाताहत झालेले लोकं बौद्ध धर्मीय असल्यामुळे ते ब्राम्हणांच्या तिरस्कारला आणि घृणेला कारणीभूत ठरले. आणि, त्यांच्या अस्पृश्यतेचे प्रमुख कारण म्हणजे गोमांस भक्षण होय.)

विश्वातील सर्व धर्मांमध्ये काही सामान्य स्वरूपाची वैशिष्ट्ये आढळून येतात, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत आहे. या संदर्भात सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इमाईल डरखीम यांच्या धर्माच्या व्याखेचे बाबासाहेब समर्थन करतात. प्रत्येक धर्मामध्ये काही दृढ विश्वास आणि व्यावहारिक गोष्टी किंवा परंपरा असतात. डरखीमच्या मते प्रत्येक धर्मामध्ये दोन मूळ तत्वे असतात:
१. धर्माची व त्याच्या संबंधीत पवित्र वस्तूंची फारकत करता येत नाही.
२. धर्म ही एक सामूहिक बाब असून समाजापासून वेगळी करता येत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, धर्माचे पहिले मूळतत्व असे गृहीत धरून चालते की, जगातील सर्व वस्तु, मग त्या भौतिक असो वा काल्पनिक असोत, ज्या वस्तु माणसाच्या विचारांचा विषय बनू शकतील त्या सर्व दोन वर्गांमध्ये विभक्त करण्यात आल्या आहेत. त्या वर्गांसाठी ‘पवित्र आणि अपवित्र किंवा अधार्मिक असे शब्द सामान्यतः वापरण्यात येतात. धर्माचा केंद्रबिंदु असलेल्या पवित्र बाबीसंबंधीच्या नियमांचे विश्लेषण करून बाबासाहेब असे सिद्ध करतात की, ब्राम्हणांनी गाईला एक पवित्र पशू मानण्यास सुरवात केली. मग ती गाय जीवंत असो वा मृत. मृत गाईचे मास खाणे देखील पाप आहे असे त्यांनी जाहीर केले. ज्या व्यक्ति गोमांस भक्षण करतात, त्या व्यक्तींना ब्राम्हण समाजात राहण्यालायक समजत नव्हते. वाताहत झालेल्या लोकांनी ब्राम्हणांनी घालून दिलेल्या या नियमाला मानले नाही आणि त्यांनी गोमांस खाणे सुरूच ठेवले. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून त्यांना या पापाचे दोषी ठरविले. सामाजिक परंपरेनुसार त्यांना दंड देणे आवश्यक होते. ब्राम्हणांनी मृत गाईचे मास खाणाऱ्या वाताहत लोकांना दंड दिला आणि म्हणून त्यांना अस्पृश्य ठरविण्यात आले.

ज्यावेळी गाईला पवित्र पशू, प्रेम आणि पूजेचा विषय बनविला तेव्हा वाताहत झालेल्या लोकांनी गोमांस खाणे का बंद केले नाही, असा प्रश्न उपस्थित करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे देतात:

प्राचीन भारतात गाईचे मास खाणे ही गोष्ट सामान्य होती. स्थायी जमातीचे लोकं गाईचे ताजे मास खायचे. मात्र, वाताहत झालेले लोकं मृत गाईचे मास खायचे. पुढे ब्राम्हणांनी गोमांस भक्षण बंद केले. इतकेच नाहीतर गाईची पूजा करणे सुरू केले. परंतु, वाताहत झालेले लोकं असे करू शकले नाहीत. कारण, त्यांच्याजवळ उपजीविकेचे अन्य साधने नव्हती. वाताहत झालेलेल जे लोकं बौद्ध झाले होते त्यांच्याजवळ भूमी किंवा पशू देखील नव्हते की, ज्यांच्या आधारे ते आपला उदरनिर्वाह करू शकतील. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी मृत गाईचे मास खाणे बंद केले नाही. ब्राम्हण वर्ग त्यांची घृणा करायचा. परंतु, वाताहत झालेले लोकं आपल्या या गोष्टीवर दृढ राहिले तेव्हा ब्राम्हणांनी त्यांना अस्पृश्य म्हणून घोषित केले. गोमांस खाणे सुरू ठेवल्यामुळे ब्राम्हणांना बौध्दांची अधिकच घृणा वाटू लागली. त्यामुळेच या लोकांना अस्पृश्य म्हणून राहावे लागले. जर बौद्ध धर्माचे अस्तित्व नसते आणि वाताहत झालेल्या लोकांनी ब्राम्हणांची सत्ता मान्य केली असती तर प्राचीन काळात वाताहत झालेलेल लोकं अर्थातच बौद्ध लोकं हे आज अस्पृश्य नसते. आयर्लंड आणि वेल्स देशाप्रमानेच भारतातील वाताहत झालेले लोकं मुख्य समाजाबरोबर मिसळून गेले असते. या संदर्भात बाबासाहेब असे म्हणतात की, भारतात असे घडू शकले नाही, कारण बौद्ध आणि हिंदूंमधील संघर्षाने असे घडू दिले नाही. ऐतेहासिक दृष्टीकोणातून हा संघर्ष केवळ स्थायी जमाती व वाताहत झालेल्या जमातींमध्ये नव्हता, तर हा संघर्ष प्रामुख्याने बौद्ध आणि ब्राम्हणांमध्ये होता. हे दोन्ही वर्ग आपापली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करीत राहिले. अशा प्रकारे अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडून बाबासाहेब असा निष्कर्ष काढतात की, वाताहत झालेले लोकं बौद्ध धर्मीय असल्यामुळे ते ब्राम्हणांच्या तिरस्कारला आणि घृणेला कारणीभूत ठरले. आणि, त्यांच्या अस्पृश्यतेचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे गोमांस भक्षण होय.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…
एससी/एसटी आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण लाभार्थीच्या एकतेला छेद देणारे कट कारस्थान…!

एससी/एसटी आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण लाभार्थीच्या एकतेला छेद देणारे कट कारस्थान…!

         अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून हिंदू – दलित वोट बँक तयार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *