वास्तव जगणे

वास्तव जगणे

हे कसे दिवस
पिसाळलेल्या कुत्र्यासारखे
मनातल्या सौजन्यावर येतात
पुन्हा पुन्हा धावून
अन् आपण सभ्यपणाची 
झूल पांघरलेले कमजोर जीव
धड प्रतिकारही करू शकत नाही
 
आपणास खूप वाटते
हे जग बदलावे चुटकीसरशी
अन् सुखाच्या नद्या वाहाव्यात
आपल्या आकांक्षाच्या अंगणातून
परंतु असे कधी होतच नाही
उगवणारा प्रत्येक दिवस घेऊन येतो
उत्तरे नसलेल्या चिवट प्रश्नपत्रिका
आयुष्याची घोकंपट्टी जगणारे आपण
मग शोधतो बसतो उत्तरं केविलवाणे… 
 
हे दिवसं असेच सरकत राहतात
आपल्या मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांपुढून
आपण खूप धडपड करत असतो
एखादे तथ्याचे तारांगण पकडण्यासाठी
परंतु नेहमीच आपल्या हाती येत असतो
मिळमिळीत मिथकांचा मृत मोहेंजोदडो
 
हे दिवस कधी गुढ होत जातात
श्रावणातल्या सावल्यासारखे
अन् स्वप्न मृगजळ होऊन छळतात
पापण्यातील पावित्र्याला निरंतर
 
आता हे दिवस कधी बदलणार
याचा विचार करत न बसता 
आपण चालत राहिले पाहिजे
आपल्याला हव्या असलेल्या दिशेने
मला वाटते यालाचा म्हणता येईल
वास्तव जीवन जगणे. 
 
प्रा माधव सरकुंडे
0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *