• 47
  • 1 minute read

विधानसभा निवडणुकीत आमचे 225 आमदार निवडून येतील…

विधानसभा निवडणुकीत आमचे 225 आमदार निवडून येतील…

विधानसभा निवडणुकीत आमचे 225 आमदार निवडून येतील — इतिश्री शरद चंद्र पवार.
वंचितांनो, विमुक्त भटके, आलुतेदार बलुतेदार ओबीसी अल्पसंख्याकांनो जागे व्हा..! आपण काय फक्त वोट बँक, मतदार च बनून राहणार?

विधानसभा निवडणुकीत आमचे २२५ आमदार निवडून येतील – शरदचंद्र पवार असे विधान शरदचंद्र पवार यांनी केले आणी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची आठवण झाली, लोकसभा निवडणुकीत एकुण ४८ खासदारापैकी ३१ मराठा खासदार निवडून आले आहेत. याचे मुख्य आणि महत्वाचे कारण म्हणजे या सरंजामी प्रस्थापित राजकीय पक्षांनी मुळ विमुक्त भटके, आलुतेदार बलुतेदार, मायक्रो ओबीसी व अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना तिकीट च दिले नव्हते, राखीव असलेल्या जागी एस सी/ एस टी प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देणे घटनात्मक रित्या बंधनकारक असल्याने राखीव जागेवर त्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी दिली, अन्यथा यांना देखील मतदार म्हणून च राहावे लागले असते.

गेल्या अनेक वर्षाचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता असे दिसते की अनुसूचित जाती व जमाती च्या राखीव ५४ जागा वगळता अधिकाधिक जागी केवळ प्रस्थापित राजकीय घराणेशाही तिल मराठा व्यक्ती लाच ऊमेदवारी दिली मिळते, आणि हे सर्व एक दुसऱ्या चे नातेवाईक असतात. थोडक्यात सांगायचे तर निजामी मराठ्यांनाच प्रस्थापित राजकीय पक्ष ( काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना) उमेदवारी देतात व निवडून ही आणतात, हाच गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे.

कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे प्रस्थापितांच्या हिताचे रक्षण करतात, एवढेच काय हे पक्ष विमुक्त भटके, आलुतेदार बलुतेदार मायक्रो ओबीसी, अल्पसंख्याक या बहुजन समाजातील उमेदवारांना निवडणुकीत उचित प्रतिनिधित्व सुद्धा देत नाही, महाराष्ट्रातील एकुण आमदारांकडे एक नजर टाकली तरी ते सहजपणे आपल्या लक्षात येईल, हे पक्ष केवळ मतदार म्हणून तुमचा आमचा, वंचितांचा, विमुक्त भटक्या जमाती चा, आलुतेदार बलुतेदार, मायक्रो ओबीसी, अल्पसंख्याक समुहाचा केवळ मतदार म्हणून वापर करून घेतात, त्या साठी नाना प्रकारचे षडयंत्र रचतात, वंचित बहुजनांना सत्तेच्या बाहेर ठेवतात. जेवणाच्या ताटातील लोणच्या प्रमाणे तोंडी लावायला एखाद्या बाहुल्याला संधी देतात आणि सर्व वंचित बहुजनांची मते लुटून नेतात. त्यासाठी अनेकदा पैसा,भय भिंती चा ही वापर करतात. यावेळी सुध्दा तेच केले जाईल २२५ निजामी मराठे निवडून येतील हा विश्वास असल्याने च शरदचंद्र पवार यांनी हे विधान केले आहे.

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून निजामी मराठे सत्ताधारी असुनही आज महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मराठा – ओबीसी वाद मोठ्या प्रमाणावर उफाळून आला आहे, सामाजिक बंधुभाव,सलोखा विस्कळीत झाला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे याच सत्ताधारी नेत्यांनी मराठ्यांनी रयतेच्या गरीब मराठ्यांचे शोषण केले आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, बहुसंख्य तरुण बेरोजगारी च्या जाळ्यात अडकले आहेत, रोजगार नसल्याने वैफल्यग्रस्त आहे, शेतीमालाला कायदेशीर हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत, पेपर फुटी मुळे विद्यार्थी नाराज आहेत, मुळ विमुक्त भटक्या जमाती चे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, दिवसेंदिवस त्यात अनेक समस्या ची भर पडली आहे, तरी देखील आमचे २२५ आमदार निवडून येतील! हा आत्मविश्वास कुठुन येतो?
विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी मराठा – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलाविलेल्या सर्व पक्षीय बैठकीत स्वतः शरदचंद्र पवार आणि मविआ चे नेते जाणीवपूर्वक अनुपस्थित होते हे आपण लक्षात घ्यायला हवे, आज महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली जो तमाशा या सरंजामी प्रस्थापित राजकीय घराणेशाही च्या टोळ्या नी चालवला आहे तो राज्याच्या हिताला मारक आहे.

ओबीसी – मराठा आरक्षणावर अगदी पहिल्या दिवसापासून रोखठोक व सुस्पष्ट भुमिका घेणारे अँड बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव दुरदर्शी वैचारिक दृष्टिकोन असलेले नेतृत्व आहे. ओबीसी च्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि रयतेच्या गरीब मराठ्यांचे आरक्षणाचे ताट वेगळे ही भूमिका वंचित बहुजन आघाडी ची आहे. परंतु दुर्दैवाने सांगितले पाहिजे या ज्वलंत प्रश्नांवर कांग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पक्ष केवळ राजकारण करत सत्तेची व स्वार्थाची पोळी शेकत आहेत.
वंचितांनो प्रस्थापित राजकीय घराणेशाही च्या टोळ्या चा हा डाव हाणून पाडा.
वंचितांनो, विमुक्त भटक्या नो, आलुतेदार, बलुतेदार, मायक्रो ओबीसी, अल्पसंख्याकांनो ,एस सी, एस टी आरक्षण वाद्यांनो आता तरी जागे व्हा, प्रस्थापितांच्या षडयंत्राला बळी पडु नका. आपण ही सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास, आत्मसन्मान अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकीत सर्वाधिक प्रतिनिधित्व देऊन आपल्या त निर्माण केला आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण आपले अमूल्य मत वंचित बहुजन आघाडी ला च देऊ या, सत्ताधारी बनु या, आपल्या समस्या आपणच सोडवुया.

बहुजन सारे एक होऊ !सत्ता आपल्या हाती घेऊ !!

जय भारत जय संविधान
– अंबरसिंग चव्हाण

0Shares

Related post

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले जळगांव दि.२२(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)       जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ रेल्वे…
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !        महाराजा शहाजीराजे – जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक…
अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकी व्हाइट हाऊस मध्ये दक्षिण भारतीय महिलांचा उष:काल !       डोनाल्ड ट्रम्प 47 वे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *