• 227
  • 1 minute read

विशाळगड दंगलखोरांना राज्य सरकारचे पाठबळ

विशाळगड दंगलखोरांना राज्य सरकारचे पाठबळ

विशाळगड दंगलखोरांना राज्य सरकारचे पाठबळ
खासदार संभाजी यांना अटक करा

पुणे : विशाळगड पायथ्याजवळील गजापूर गावातील मुस्लिम समूदायाच्या घरावर तसेच मस्जिदीवर हल्ला करून दंगल माजविले प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या खासदार संभाजी यांचेसह सर्वच आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनोरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

गजापूर गावातील मुस्लिम विरोधी दंगलीचा निषेध नोंदवून विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी पुणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. सदर वेळी ‘विशाळगड येथील मुस्लिम विरोधी हल्ल्यातील सहभागी दंगेखोरांना धर्माच्या आधारवर राज्य सरकार पाठबळ देत असल्याचे जाणवत आहे. तसेच या घटनेला पाच दिवस लोटल्यानंतरसुध्दा अद्यापपर्यंत गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून दंगलग्रस्तांची भेट घेवून त्यांना दिलासा दिलेला नाही. तसेच यातील सर्वच प्रमुख आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यावरसुध्दाही अद्याप मोकळे फिरत आहेत. त्यामुळे ही दंगल सरकार पुरस्कृत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. असे मत राहुल डंबाळे यांनी व्यक्त
केले.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात १) सदर दंगलीतील सर्व दोषींविरूध्द UNLAWFUL ACTIVITY PREVISION ACT अर्थात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी. २) सदर घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या व जबाबदार असणाऱ्या राज्य सरकार व कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्यावर तात्काळ निलंबन कारवाई करून त्यांना देखील गुन्हयात आरोपी करण्यात यावे. ३) सदर घटनेत नुकसान झालेल्या घर, दुकान, वाहन व इतर स्थावर मालमत्तेची पुर्नउभारणी करण्यासाठी १०० टक्के पुर्नवसन राशी देण्यात यावेत. ४) सदर घटनेत दंगलग्रस्त ठरलेल्या प्रती व्यक्ती ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. ५) सदर घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्हयातील संशयित आरोपी असलेले निवृत्त राज्यसभा सदस्य संभाजी व त्यांच्या इतर सहकार्यावर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी. ६) सदर अनुषंगाने आपणांस आवश्यक वाटेल त्या योग्य उपाय योजना करव्यात. इत्यादी प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडाळात मिनाजताई मेमण , अल्ताफ खान , शमशुद्दिन शेख , मोसिन शेख. अक्रम सय्यद , समीर शेख , जुनेद मनियार , शहामुद्दीन शेख , अफजल पठाण , नितीन थोरात , आसिफ खान, प्रतिक डंबाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कळावे
– राहुल डंबाळे , अध्यक्ष
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनोरिटी

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *