शरद पवारांनी मोदीची तुलना रशियाचे अध्यक्ष पुतीनशी केल्यानंतर भाजपचे पित्त खवळणे साहजिकच व स्वभाविकच आहे. एकदम समर्पक शब्दात अन् चपलक उपमा देवून पवारांनी मोदीचा असली चेहरा ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत देशवाशियांच्या समोर आणला. युद्धखोर, आदमखोर, जनविरोधी, देश विरोधी अशी प्रतिमा गेल्या दशकभरात पुतीनची झाली आहे. अन् नेमकी अशीच प्रतिमा मोदीची ही जगभरात झाली आहे. त्यामुळे शरद पवार काय वावगे बोलले नाहीत. खरे तेच बोलले. राजकीय व्यवस्थेमधील विरोधकांचा स्पेस संपवून टाकला की किती ही जनविरोधी धोरणे राबविली, कायदे केले तरी आपल्या सत्तेसमोर आव्हान उभे राहत नाही, हे पुतीनला माहित होते. त्या दृष्टीने त्यानें देश चालविला आहे .मोदी ही गेली १० वर्ष हेच करीत आहे. प्रशासकीय यंत्रणा अन कायदेशीर संस्था पुतीनने ताब्यात घेतल्या आहेत. मोदीने ही इथे हेच केले आहे. २०२४ मध्येच इथे ही अन् रशियात ही निवडणुका होत आहेत. पण या निवडणुकीत पुतीनचा मुकाबला करेल, असा एक ही नेता अथवा पक्ष रशियात उरला नाही. माध्यम पुतीनची जी हुजुरी करीत आहेत. आपल्या देशात ही माध्यम दलालीच करीत आहेत.बोरिस नादेझदिन यांची प्रतिमा पुतीन विरोधक म्हणून पुर्ण रशियात आहे. मात्र रशिया – युक्रेन युध्दात त्यांनी वाताघाटींवर भर दिला होता. चर्चेतून मार्ग निघू शकतो, अशी भुमिका त्यांनी घेतली होती. खर तर युद्ध विरोधी भुमिका हिच राष्ट्रवादी भुमिका आहे. पण त्या भूमिकेला पुतीन अन् त्याच्या दलाल माध्यमांनी देश विरोधी ठरविले. अन् आता रशियन निवडणूक आयोगाने त्यांना निवडणुक लढविण्यास बंदी घातली आहे. आपल्या देशात या पेक्षा वेगळे काय होत आहे. लोकनियुक्त सरकारं पाडली जात आहेत. जन समर्थन असलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबले जात आहे. हे इतके साम्य असेल तर पवारसाहेब चुकीचे काय बोलले. खरेच बोलले ना. संसदीय व अध्यक्षीय राजकारणाचा कणा म्हणजे निवडणुका. पण पुतीन अन् मोदी हे दोघे ही या निवडणुका घेण्याच्या विरोधात आहेत. निवडणूक आयोग हा आपल्या देशात स्वायत्त आहे अन् रशियात ही. पण इथे अन् तेथे ही या आयोगाची मालकी मोदी अन् पुतिनकडे आहे. मोदी सांगेल तसे इथला आयोग काम करतो व पुतीन सांगेल तसा तिथला आयोग काम करतो. २०२४ च्या निवडणुकीनंतर पुन्हा रशियात निवडणुका होतील की नाही, अशी चर्चा आहे व आपल्या देशात ही अशीच आहे. आपण किती ही जनविरोधी असलो तरी आपल्या समोर पर्यायच नसेल तर निवडणुका सहज जिंकता येतात. चंदीगड अन् सुरतमध्ये झाले त्या पद्धतीने भाजपला इथल्या निवडणुका करायच्या आहेत. भाजप देशात तेच करीत आहे.विरोधकांना कमजोर केले जात आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात बोलणाऱ्या नेत्यांना जेलमध्ये टाकले जात आहे.देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती येथे आहे अन् तेथे ही आहे. इतकी समानता असल्यावर भाजपचे पित्त खवळायची गरज नव्हती.
– राहुल गायकवाड, ( महासचिव, समाजवादी, पार्टी महाराष्ट्र प्रदेश )