• 27
  • 1 minute read

शाहू, फुले अन आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या शरद पवार यांना व्यवस्था व सामाजिक बदलासाठी संघर्ष करणारे लोक कार्यकर्ते का दिसत नाही?

शाहू, फुले अन आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या शरद पवार यांना व्यवस्था व सामाजिक बदलासाठी संघर्ष करणारे लोक कार्यकर्ते का दिसत नाही?

राज्याचे पुरोगामीत्व कायम राखणाऱ्या स्वपक्षातील ही पदाधिकऱ्यांना शरद पवार डावलतात का?

मुंबई :- राज्याचे पुरोगामीत्व कायम राखणाऱ्या स्वपक्षातील ही पदाधिकऱ्यांना डावलून शरद पवार यांनी महाराष्ट्रद्रोही भाजपला साथ देणाऱ्या 2 डझन उमेदवारांना आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. यामुळे धर्मनिरपेक्ष व संविधानवादी मतदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. अखेर शरद पवार आयाराम अन ते ही भाजपमधून आलेल्यांच्या भरवशावर विधानसभा निवडणूक लढावित असल्याने चित्र प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात होण्या अगोदरच निर्माण झाले आहे. तर धर्मनिरपेक्ष मतदार व मित्र पक्षांना या उमेदवारांसाठी मतं मागणे ही अवघड होऊन बसले आहे.
        स्वतःच्या पक्षात निवडणूक लढण्याची व जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार नसताना राष्ट्रवादी काँगेस व शरद पवार जागा वाटपात आडून का बसले होते. भाजपमधून येणाऱ्या आयारामला तिकीट देण्यासाठी का? अशी चर्चा आता राज्यभर अन खास करून पुरोगामी पक्षात व आंबेडकरी समाजात सुरु आहे. शाहू, फुले अन आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या शरद पवार यांना व्यवस्था व सामाजिक बदलासाठी संघर्ष करणारे लोक कार्यकर्ते का दिसत नाही? अशी ही चर्चा सध्या सुरु असून निवडणुकीचे वातावरण जसे जसे तापेल, तशी ही चर्चा जोर ही पकडेल.
          इंदापूर मतदारसंघातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बेलापूरमधून संदीप नाईक, कागलमधून समरजीत घाडगे, फलटणमधून दीपक चव्हाण, चंद्रपूरमधुन किशोर जोरगेवर व भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले आदींना शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर माळसिरस या अनुसूचित राखीव जागेवर बोगस जात प्रमाणपत्र असलेल्या उत्तम जानकर यांना उमेदवारी दिली आहे. अशा प्रकरणात न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागले, तरी उमेदवार 5 वर्षांची एक टर्म आरामात काढता येते. शरद पवार यांनीच 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. त्यांचे ही जात प्रमाणपत्र बोगस असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल ही दिला आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या जागांवर डाका टाकणे ही शरद पवार यांची जुनी सवय आहे.
      अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांच्याकडे स्वतःच्या नावाशिवाय काहीच राहिलेले नाही, हे आजचे जमिनीवरील चित्र असून त्याचमुळे आयारामवर शरद पवार यांना विसंबून राहावे लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे नाव किती ही मोठे नाव असले तरी त्यांनी केवळ सत्तेसाठीच पक्ष चालवीला. सत्ता गेली की लोक त्यांना सोडून गेले. आज ही तेच झाले आहे.
0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *