• 44
  • 1 minute read

शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण

शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण

भारतीय शेतकऱ्यांची गरिबी दैवाने नसून शेतकऱ्याला कायमस्वरूपी दारिद्र्यात ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे ! 
शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण असे ठणकावून प्रस्थापितांच्या विरोधात शेतीचे अर्थशास्त्र साध्या सरळ सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजावून सांगणारे युगात्मा शरद जोशी साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन स्थळ नाशिक येथे शेतकऱ्यांच्या वतीने शरद जोशी साहेब यांना अभिवादन करण्यात आले !
 
10 नोव्हेंबर १९८० साली शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव  कांद्याला शंभर रुपये उसाला तीनशे रुपये भाव मिळाला पाहिजे यासाठी शरद जोशी माधव खंडेराव मोरे माधवराव तात्या बोरस्ते प्रल्हाद पाटील कराड यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आणि रेल रोको आंदोलन केले होते ! 
 
१७ दिवस रेल्वे आणि महामार्ग बंद होता त्या आंदोलनाचा सरकारवर दबाव तयार होऊन सरकारने कांद्याला शंभर रुपये आणि उसाला तीनशे रुपये असा भाव दिला होता ! 
या आंदोलनाची यशोगाथा देशभर नव्हे तर जगभर पसरली होती
खेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे रेल्वे रोको आंदोलनात रत्ने आणि जाधव हे दोन शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मे झाले होते ! 1980 साला च्या आधी सरकार शेतकऱ्याकडून शेतीमाल लेव्ही भावाने खरेदी करीत होते !
 
शासनाची दडपशाही आणि पुढार्‍यांची मक्तेदारी या गोष्टीमुळे शेतकरी पुढार्‍यांना दैवता समान मानीत होते !
सरकार शेतकऱ्याच्या शेतीमालाची लूट कशी करते ! याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करून शेतीचे अर्थशास्त्र शरद जोशी साहेबांनी सहजरीत्या सोप्या भाषेत शेतकऱ्यांना पटवून सांगितले ! 
शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण सूट सबसिडीचे नाही काम आम्हाला हवे घामाचे दाम ! 
या सोप्या भाषेत १९८० पासून ते 1990 पर्यंत शरद जोशी साहेबांनी सरकारवर दबाव तंत्र आणण्यासाठी महाराष्ट्रातील ऊस कांदा कापूस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा यासाठी मोठमोठ आंदोलने केली तसेच 10 मार्च 1984 ला पंजाब आणि हरियाणा या राज्यातील शेतकऱ्यांच्या गव्हाला रास्त भाव मिळावा म्हणून चंदिगड राजभवनाला दहा दिवसांचा घेराव! 
 
कर्नाटक मधील शेतकऱ्यांच्या तंबाखूला रास्त भाव मिळावा म्हणून निपाणीला तंबाखूचे आंदोलन असे अनेक आंदोलने केली भारत देश हा भावनाप्रधान असल्यामुळे भारतीय राजकारण्यांनी ग्रामीण भागात प्रांतवाद, धर्मवाद ,जातीयवाद , असे अनेक वाद लावून शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून विभागणी केली होती !अशा अवघड परिस्थितीत शरद जोशी साहेबांनी भारत देशातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे अर्थशास्त्र समजून सांगितले आणि संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची एकजूट केली !
असा शेतकऱ्यांचा पुन्हा नेता होणे नाही ही जादू शरद जोशींनी केली ! 
भारतीय शेतकऱ्यांच्या मनाची मशागत केल्यामुळे शरद जोशी साहेब हे शेतकऱ्यांचे दैवत म्हणून संबोधले गेले  बारा डिसेंबर 2025 शरद जोशी यांच्या स्मृती दिनानिमित्त शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलन स्थळ नाशिक येथे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले !
 
भगवान बोराडे 
 
 
 
 
 
 
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *