शौर्यदिनासाठी आंबेडकरी अनुयायांना सर्व सुविधा द्या : अजित पवार
माजी मंत्री संजय बनसोडेंनी घेतला तयारीचा आढावा
मुंबई: भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी येणार्या आंबेडकरी अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरवाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
१ जानेवारी रोजी भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी यंदा किमान वीस लाख लोक येणे अपेक्षीत असल्याने सर्व पायाभुत सुविधा मिळाव्यात तसेच यासाठी भरीव निधी प्राप्त व्हावा यासाठी आज मुंबई येथे भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अजित पवार यांची देवगीरी बंगला मुंबई येथे भेट घेतली असता पवारांनी वरील निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिले.
” भिमाकोरेगाव विजयस्तंभ स्मारकाचे कामकाज लवकर सुरु केले जाणार असुन या संदर्भात लवकरच आढावा बैठक घेण्यात येवुन योग्य त्या सुचना संबंधितांना दिल्या जातील ” असेही अजित पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
दरम्यान माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संजय बनसोडे यांनी देखील जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचेशी शौर्यदिन नियोजना संदर्भात फोनद्वारे सविस्तर चर्चा करुन योग्य त्या सुचना दिल्या आहेत. नियोजनाचे काम व प्रत्यक्ष तयारीचा आढावा घेण्यासाठी पुढिल आठवड्यात आपण स्वता विजयस्तंभ परिसराला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.