• 96
  • 1 minute read

शौर्यदिन शांततेत पार पडणार : अमितेश कुमार

शौर्यदिन शांततेत पार पडणार  : अमितेश कुमार

शौर्यदिन शांततेत पार पडणार : अमितेश कुमार

पुणे : एक जानेवारी रोजी होणारा भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा अतिशय शांततेत व सौंदार्हपूर्ण वातावरणात पार पडणार असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संयुक्त बैठकीत दिली.
        भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रम अनुषंगाने आज पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी परभणी व अन्य कोणत्याही ठिकाणच्या घटनांचा तणाव उत्सवाच्या अनुषंगाने नाही. हा उत्सव आंबेडकरी जनता अभिवादनासाठी करत आहे त्यामुळे पोलिसांनी सर्वतोपरी सहकार्य करावी अशी अपेक्षा शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी केली. 
        ” भीमा कोरेगाव शौर्यदिन अभिवादन सोहळा हा अत्यंत महत्त्वपूर्ण पण तितकाच संवेदनशील कार्यक्रम असला तरी आता या उत्सवात सर्व नागरिकांचे , स्थानिकांचे सहकार्य असल्याने कायदा सुव्यवस्थेचा कोणताही तणाव नाही तसेच सदर उत्सवात सहभागी होणाऱ्या अनुयायांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून देणे व अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे याला आम्ही प्रथम प्राधान्य दिलेले आहे. मागील वर्षी उत्सवामध्ये घडलेल्या चैन चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबतच्या खबरदारी घेण्याची व त्यासाठी विशेष पथके तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. समाज माध्यमांवर चितावणीखोर व द्वेष मूलक कमेंट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना सायबर सेल ला दिलेले आहेत व यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत अभिवादन करावे. असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
         सदर बैठकीस समन्वय समितीचे अध्यक्ष सदर बैठकीला राहुल डंबाळे , डॉ. सिद्धार्थ धेंडे  ,परशुराम वाडेकर ,  ॲड. अरविंद तायडे, बाळासाहेब जानराव , सुनीताताई वाडेकर , सुवर्णाताई डंबाळे , बापूसाहेब भोसले , यशवंत नडघम, मिलिंद आहिरे ,  साईनाथ वाळके पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते
0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *