Back to Top

Back to Top

3 Ways Media

श्री एकविरा यात्रेनिमित्त पालखी प्रमुखांची बैठक; लोणावळा ग्रा. पोलीस ठाणेचे नियोजन, भक्तांच्या वाहनांना टोल माफ

श्री एकविरा यात्रेनिमित्त पालखी प्रमुखांची बैठक; लोणावळा ग्रा. पोलीस ठाणेचे नियोजन, भक्तांच्या वाहनांना टोल माफ

श्री एकविरा यात्रेनिमित्त पालखी प्रमुखांची बैठक; भक्तांच्या वाहनांना टोल माफ

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव कार्ला गड, लोणावळा येथील आगरी,कोळी समाजाची कुलस्वामिनी व कुलदैवत असलेल्या आई श्री एकविरा देवीचा पालखी सोहळा बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी होणार आहे. चैत्री यात्रा व पालखी सोहळा कालावधीत 
१) दिनांक : २४ मार्च २०२६ रोजी श्री कालभैरवनाथ देवाची पालखी सोहळा, देवघर 
२) दिनांक : २५ मार्च २०२६ रोजी श्री आई एकविरा देवीचा पालखी सोहळा,वेहेरगाव गड कार्ला
३) दिनांक : २६ मार्च २०२६ रोजी देवीचा तेलवान / मानपानाचा कार्यक्रम 
४) दिनांक : २ एप्रिल २०२६ रोजी श्री ढाक कालभैरव व श्री कालभैरवनाथ देवघर व श्री भैरवनाथ वेहेरगाव काठी पालखी सोहळा असे कार्यक्रम आहेत.
या पालखीला व यात्रेला महाराष्ट्रातील आगरी, कोळी,भंडारी,सि.के.पी, कराडी,कुणबी व इतर समाजातील लाखो भक्त भाविक मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई व कोकणकिनारपट्टीतील हे मूळ रहिवाशी असुन या भागातील मूळ रहिवाशी आहेत. समुद्र किनारपट्टीवर राहणारा समाजातील भाविक घाटमाथा चढून देवीच्या पालखीला व दर्शनाला येत असतात. यानिमित्त यात्रेला येणाऱ्या मानाच्या पालख्या व सर्व पालखी प्रमुखांची नियोजन बैठक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिनेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे संपन्न झाली. 
 
                 सदर बैठकीमध्ये पालखी सोहळा व यात्रेनिमित्त मा. जिल्हाधिकारी, पुणे, मा. पोलीस आयुक्त, पुणे, मा. तहसीलदार, मावळ व लोणावळा पोलीस यांनी बनविलेल्या नियम व अटी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिनेश तायडे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री. दिपकभाऊ हुलावले, श्री. एकविरा भक्त भाविक मंडळाचे अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे. पोलीस निरीक्षक सौ.विजया मेहेत्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
 *नियोजन बैठकीला पालख्यांचे प्रमुख एकत्र* 
—————————————————-
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मार्फत यात्रेनिमित्त सर्व पालखी प्रमुखांना एकत्र आणणारे आगरी समाजाचे मुंबईतील नेतृत्व व श्री एकविरा भक्त भाविक मंडळाचे अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांचा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिनेश तायडे साहेब व श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री. दिपकभाऊ हुलावले यांनी यांचा सर्व सत्कार केला त्याचबरोबर सर्व पालखी प्रमुखांचा सत्कार केला 
 
 *नियम व अटीनुसार सुलभतेने दर्शन* 
————————————————-
भाविकांच्या सहकार्यातून देवीच्या कार्ला गडावर देवीच्या आशिर्वादाने पावित्र्य व मांगल्य राखून भाविकांना सुलभतेने श्री आई एकविरा देवीचे दर्शन व्हावे म्हणून दया कालावधीत सालाबादप्रमाणे या वर्षीही गडावर शोभेची दारू व फटाके वाजवण्यास बंदी करण्यात आली आहे. येणाऱ्या सर्व पालखी मंडळानी आपल्या पालख्या दुपारी एक वाजण्याच्या अगोदर येणे आवश्यक आहे. सर्व पालख्या मंडळाची श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर कचरा, घाण करू नये व स्वच्छता राखावी. तसेच आपापसात भांडण, वाद, तंटा करून शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये. पालखी सोहळ्याला व देवीचे दर्शन घेणाऱ्या सर्व भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने आणि सुलभतेने दर्शन घ्यावे. 
 
 *देवीसाठी २५ वर्षे निस्वार्थी सेवा करणारे जयेंद्रदादा खुणे यांचा सत्कार* 
—————————————————-
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मार्फत यात्रेनिमित्त सर्व पालखी प्रमुखांना एकत्र आणणारे आगरी समाजाचे मुंबईतील नेतृत्व व श्री एकविरा भक्त भाविक मंडळाचे अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांचा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिनेश तायडे व श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दिपकभाऊ हुलावळे यांनी सर्व पालखी प्रमुख व एकविरा भक्तांच्यावतीने सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दिपकभाऊ हुलावळे,एकविरा भक्तांचे नेतृत्व करणारे आगरी समाजाचे जयेंद्र दादा खुणे, पोलीस निरीक्षक विजया मेहेत्रे मॅडम, गोपनीय अधिकारी नितीन कदम, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सागर देवकर, सहसचिव महेंद्र देशमुख,खजिनदार संजय गोविलकर,सह खजिनदार विकास पडवळ, सुप्रसिद्ध निवेदक व सूत्रसंचालक विवेक पोरजी,चौल आग्रावकर प्रतीक साळूंखे पेण पंच कमिटी कोळी समाज अध्यक्ष गणेश अवास्कर, देवीचंद कोळी, अशोक कोळी,चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट अध्यक्ष अमरेश ठाणेकर,कुणाल कोळी,विशाल डवले, रुपेश म्हात्रे,रचना चौधरी,अजय पाटील सर्व चौल आग्राव पेण, पनवेल, ठाणे, मुंबई पालखी प्रमुख, पदाधिकारी एकविरा भक्त उपस्थित होते.
 
 
 
 *भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन* 
—————————————————पायथा ते एकविरा गडावर विविध ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात येणार असून भक्त – भक्तांनी पोलीस व स्वयंसेवक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दर्शनाच्या वेळी किंवा रांगेत असताना श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांच्याशी कोणताही वाद घालू नये. तसेच कोणतीही हुल्लडबाजी करून इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. या व इतर अटी व नियमांचे सर्व पालखी प्रमुखांनी स्वागत करून सहकार्य करण्याचे व पालखी सोहळा व यात्रा आनंदात, उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने केला जाईल अशी जबाबदारी सर्व पालखी प्रमुखांनी स्वीकारली.
 
 *नियम व अटीनुसार सुलभतेने दर्शन* 
——————————————————
भाविकांच्या सहकार्यातून देवीच्या कार्ला गडावर देवीच्या आशिर्वादाने पावित्र्य व मांगल्य राखून भाविकांना सुलभतेने श्री आई एकविरा देवीचे दर्शन व्हावे म्हणून दया कालावधीत सालाबादप्रमाणे या वर्षीही गडावर शोभेची दारू व फटाके वाजवण्यास बंदी करण्यात आली आहे. येणाऱ्या सर्व पालखी मंडळानी आपल्या पालख्या दुपारी एक वाजण्याच्या अगोदर येणे आवश्यक आहे. सर्व पालख्या मंडळाची श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर कचरा, घाण करू नये व स्वच्छता राखावी. तसेच आपापसात भांडण, वाद, तंटा करून शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये. पालखी सोहळ्याला व देवीचे दर्शन घेणाऱ्या सर्व भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने आणि सुलभतेने दर्शन घ्यावे. 
 
 *जयेंद्रदादा खुणे यांच्या प्रयत्नाने भाविकांच्या वाहनांना यंदाही टोल माफ* 
————————————————-
 गेली अनेक वर्षे भक्त भाविकांसाठी टोल माफी करण्यात यावी यासाठी निस्वार्थी सेवा करणारे जयेंद्रदादा खुणे यांनी शासन स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, आय.आर.बी., एम.एस.आर.डी.सि. यांच्यासह खालापूर, वाकसई, वरसोली, इत्यादी टोलला लेखी पत्रव्यवहार करून यात्रा व पालखीसाठी येणाऱ्या भक्त भाविकांच्या वाहनांना टोल माफी करण्यात यावी म्हणून निवेदने दिलेली आहेत.
 
 *एकविरा गडावर व परिसराची विकासकामे*
———————————————-
श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री. दिपकभाऊ हुलावळे यांनी ट्रस्टच्या मार्फत पायथा ते एकविरा गडावर सुरु असलेल्या भक्तांच्या सुखसुविधेसाठी पायऱ्या, गटारे, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, भक्तांना सुलभतेने रांगेत दर्शन, यात्रेला येणाऱ्या पालख्यांना विशेष दर्शन सुविधा , गडावरील कठाडांचे बांधकाम,इत्यादी विकासकामे, सुधारणा बाबत मार्गदर्शन केले. श्री एकविरा देवस्थानच्या मार्फत सुरु असलेल्या सुखसुविधा, सुधारणा व विकासकामाबाबत सर्व आगरी कोळी समाज व एकविरा भक्तांच्यावतीने श्री. जयेंद्रदादा खुणे यांनी आभार मानले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *