• 59
  • 1 minute read

संघ व भाजपला मोदी संपवित असेल तर प्रकाश आंबेडकराला वेदना व यातना का होतात ?

संघ व भाजपला मोदी संपवित असेल तर प्रकाश आंबेडकराला वेदना व यातना का होतात ?

हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा हा मोदीचा नाही तर तो संघाचा आहे. संविधानाला विरोध हा ही मोदीचा नाहीतर संघाचा आहे. तिरंगी झेंडा अन् त्यावरील अशोक चक्राला ही विरोध मोदीचा नाहीतर संघाचा आहे. मोदी संघाचा साधा चेहरा ही नाही, आहे केवळ एक मुखवटा. तो कधी ही उतरविला जातो.२०१४ मध्ये जे षढयंत्र रचले गेले व भाजपची सत्ता या देशावर आली, ते षढयंत्र ही मोदीने रचले नव्हते, तर संघाने रचले होते. मोदी एक प्यादे म्हणून चालविण्यात आले अन् आज ही चालविले जात आहे. एक तेली समाजाचा माणूस ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा अजेंडा का म्हणून राबविल ? तो ही या व्यवस्थेचा एक बळी आहेः या साऱ्या गोष्टींचा विचार करुन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी विधाने करायला हवीत. पण देशात होत असलेली लोकसभेची ही निवडणूक संघ, भाजपसाठी ” करो अथवा मरो”ची असल्याचे त्यांनी आपल्या सर्व फौजा अन् हत्यारं बाहेर काढली आहेत. वंचित यातीलच एक फौज आहे व बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने त्यांचा एक भावनिक हत्यार म्हणून संघ या ऐतिहासिक निवडणूकीत वापर करीत आहे.
काँग्रेस अथवा राज्यातील महविकास आघाडीसोबत युती करताना ज्या अटी प्रकाश आंबेडकर यांनी सतत घातल्या त्यामध्ये संघाचा विरोध ही अट महत्त्वाची होती. २०१९ च्या निवडणुकीत हिच अट त्यांनी घातली होती. संघाच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका अन् केलेली विधाने अतिशय वादग्रस्त पण सत्य आहेत. असे असताना आज त्यांना याच संघाचा पाठिंबा का हवा आहे ? अन् संघ व भाजपला मोदी संपवित असेल तर त्याच्या यातना व वेदना प्रकाश आंबेडकरांना का होत आहेत ? हे प्रश्न विचार करायला लावतात.
विजया दशमीला संघ शस्त्रांची करीत असलेल्या पुजेवरून ही प्रकाश आंबेडकरानी सतत संघावर टीका केली आहे. आपण सत्तेवर आलो तर मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू असे ही विधान अनेक वेळा प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मग आज संघाबाबत ही सहानुभूती का ? संघाबाबतचे प्रेम इतके उतू का आलेय ?
स्वातंत्र्याच्या आंदोलनाला विरोध, हिंदुत्वाचे प्रणेते माफीवीर सावरकराचे माफीनामे, लोकशाही राज्य व्यवस्थेला संघ व एकूणच हिंदुत्ववाद्यांचा विरोध, संघाने गोडसे करवी घडवून आणलेली महात्मा गांधी यांची हत्या, संघाचा राष्ट्र ध्वजाला विरोध, संविधान व धर्म निरपेक्षतेला विरोध या साऱ्या गोष्टी आज ही संघाला राष्ट्रद्रोही ठरवतात. जीनाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्या अडवाणींना भारतरत्न पुरस्कार देणारे संघ व भाजप सरकार राष्ट्र द्रोहाच्या या आरोपापासून वाचण्यासाठीच सावरकर यांना हा पुरस्कार देवू शकले नाही. अशा संघाला मान्यता देण्याचे काम संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेच नातू करीत असतील तर ती या नातवाच्या बुध्दीची दिवाळखोरी आहे. आंबेडकरी समाज, विचार व चळवळीची नाही. हे या नातवाने, त्याच्या संघाने,भाजप व मोदीने ही लक्षात घेतले पाहिजे. हे नाटक व राजकारण सगळ्यांना समजत आहेत. जनतेला मूर्ख समजणारे तुम्ही स्वतःच मूर्ख आहात. स्वतःला एकदा तपासून पहा म्हणजे कळेल.
अलिकडे प्रकाश आंबेडकर यांना श्रद्धेय म्हटले जात आहे. ते का म्हटले जातेय कळत नाही. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ही एक त्यांची जमेची बाजू सोडली तर बाकी अनेक गोष्टी त्यांच्या विरोधात जात असून त्या सर्वांना माहित आहेत.
भाजप ही संघाची राजकीय शाखा आहे, हे संघ जाहीरपणे सांगतो. पण भाजप स्वतंत्र व स्वयंभू संघटन आहे, हे सांगायला ही भाजप विसरत नाही. पण त्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. आज संघ व भाजपच्या संबंधावर बोलून प्रकाश आंबेडकर यांनी हेचं आपल्या तोंडाने सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे ? हे वेगळे सांगायला नकोच.

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *