• 38
  • 1 minute read

संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास )

संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास )

भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या,
चतुर तुझा वैरी रे,
डाव त्याचे जाण गड्या…

वैरी तुझा आग लावी,
त्यात तुला झोकी गड्या,
सवे तुझ्या रडे तो ही,
खरे खोटे जाण गड्या,
रात्रच नाही, दिवसही,
वैऱ्याचा आहे गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तू ठेव गड्या…

बरी नाही उग्र भावना,
घाल तया आवर गड्या,
हाणून पाड दुष्ट डाव,
फसू नको त्यात गड्या,
नको कलह अंतरी,
शुध्द तर्क लाव गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या….

येती जाती वादळे जीवनी,
क्षणिकचे सारे गड्या,
गैर ओंजळ कुचकामी,
भले नाही त्यात गड्या,
भीम-बुध्दाचा वारस तु,
ताठ उभा रहा गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या…

कवीः प्रकाश डबरासे
(३० मे २०२४)

0Shares

Related post

…तरच महिलांचा खरा सन्मान होईल !

…तरच महिलांचा खरा सन्मान होईल !

…तरच महिलांचा खरा सन्मान होईल ! स्त्री ही देवता आहे. ती आदिमाया आहे. ती आदिशक्ती आहे.…
जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल ! जगातील 7 आश्चर्या पैकी ताजमहल हे एक आश्चर्य असून ही वास्तू…
वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *