• 29
  • 1 minute read

संविधान दिनाच्या निमित्ताने

संविधान दिनाच्या निमित्ताने

आजच्या गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेत जातीय सलोखा आवश्यक!

घटनेच्या ओनाम्यात / प्रीऍम्बल मध्ये त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वांमध्ये (डिरेकटीव्ह प्रिंसिपल्स) आहेत अनेक मूल्यांचा समावेश आहे ; लोककल्याण , आर्थिक विषमता कमी करणे , स्त्री पुरुष समानता , धार्मिक / जातीय सलोखा इत्यादी

घटनेतच मूल्यांचा समावेश केलेला असल्यामुळे ती पाळणे भारतीय नागरिकांवर बंधनकारक असतीलच ; पण हि खूपच शुष्क, कायद्याची भाषा झाली ;

संविधानिक मूल्यांची उपयुक्तता फक्त वंचित राहिलेल्या/ नागरिकांच्या विशिष्ट गटाला नाही तर ती सर्वांना आहे , तुम्हाला देखील आहे. हे असे दाखवून दिले तर फक्त मानवतावादी मूल्यांसाठी नाही तर त्याच्या राजकीय स्वीकारार्हतेचा पाया अधिक व्यापक होऊ शकतो

दोनच उदाहरणे पुरेशी आहेत
______

आर्थिक विषमता कमी करणे

आर्थिक विषमता कमी झाल्यामुळे आर्थिक पिरॅमिडच्या खालच्या पायऱ्यांवर असणाऱ्यांना लाभ होईल ; मग मी मध्यम / उच्च मध्यम / श्रीमंत गटात मोडतो , हे माझ्यावर अतिरिक्त कर बसवणार , मग मी कशाला त्याला पाठिंबा देऊ ?

पण डाव्या नाही मुखप्रवाहातील साहित्य आणि आकडेवारीवरून हे दाखवता येईल कि कमी संख्येने असणाऱ्या वर्गाच्या मिळकती वाढत राहिल्या तर

मिळकतीच्या प्रमाणात या वर्गाचा उपभोग वाढू शकत नाही ,
देशांतर्गत बाजारपेठेच्या पाया संकुचित राहतो
जीडीपी वाढ होत नाही, गुंतवणुकी / एकूणच रोजगारावर परिणाम होतो

दुसऱ्या बाजूला श्रीमंतांकडे गेलेला पैसा सट्टेबाजीकडे वळतो ; त्यांची अतिरिक्त जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढते ; त्यातून शेअर मार्केट / रियल इस्टेट मधील सट्टेबाजी वाढते , वित्तीय अस्थिरता वाढते

आर्थिक विषमता कमी करणे फक्त गरिबांच्या हिताचे नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन हिताचे आहे अशा मांडणीचे अपील अधिक व्यापक असेल

__________

जातीय / धार्मिक सलोखा

अर्थव्यवस्था एक असंख्य / अगणित चाकात चाके असणारे अक्राळविक्राळ यंत्र आहे ; एक चाक दुसऱ्या चाकाच्या दातातून सुटले तर इतर चाकांच्या गती मंदावते / थांबते ; वस्तुमाल सेवेची उपलब्धता / गुणवत्ता / उत्पदकता / उत्पादन खर्च यावर परिणाम होतो

सरार्स आवाहने केली जातात ; एखादी जात / एखादा धर्म / विशिष्ट व्यक्ती / धंदेवाल्यांकडून माल / सेवा घेऊ नका ; यातून स्थानिक अर्थव्यवस्थांवर दूरगामी परिणाम होतो , वस्तुमाल / सेवा / मानवी श्रम / भांडवल / कच्चा माल यांचे गतीचक्र तुटते/ मंदावते

ज्याठिकाणी दंगली / तणावग्रस्त परिस्थिती तयार होते तेथे स्थानिक अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम झाला आणि जेथे जातीय / धार्मिक सलोखा आहे तेथे आर्थिक व्यवहार कसे आहेत या बद्दल सर्वे करून त्याची तुलनात्मक आकडेवारी समोर आणली पाहिजे

आजच्या गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेत जातीय / धार्मिक सलोखा कसा सर्वांच्या हिताचा आहे हे दाखवून दिले तर त्याचे अपील अधिक व्यापक असेल
______

एका बाजूला आपली मूल्यात्मक मांडणी सुरूच ठेवतांना , त्यांच्या अंगणात , त्यांच्या बॅट / बॉलने, त्यांच्या परिभाषेत बोलता आले पाहिजे

संजीव चांदोरकर (२६ नोव्हेंबर २०२५) जुन्या पोस्टवर आधारित

Add Your Heading

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *