- 36
- 1 minute read
सत्ता बदलली पाहिजे पण सत्ता केंद्र बदलायला नको ?
लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशा राजकीय घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहे. राजकारण म्हणजे नेमके काय? तर सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी आखलेले डावपेच होय. लोकशाही मध्ये सत्तेच्या डावपेचात नैतिकता फार महत्वाची असते. महाराष्ट्रातील राजकारणात ही असे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे डावपेच आपण सध्या पाहत आहोत. यात नैतिकता मात्र दिसत नाही. धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने मात्र राजकारणातील नैतिकता नावाची गोष्टच शिल्लक ठेवलेली नाही. काहीही करून सत्ता मिळवणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम ठरलेला आहे. महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगविण्याचा प्रयत्न केला जातोय. पण प्रत्यक्षात तसे आहे काय? तर याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. महाविकास आघाडीतील काँगेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटकपक्षकडे लढण्याची रणनीती अजून तयार नाही. याचे कारण दीर्घकाळ सत्तेत असलेल्या व महविकस आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँगेस पक्षातील नेत्यांना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची भीती आहे. ते भाजपशी थेट लढूच शकत नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसवर अवलंबून आहे. अशा स्थितीत जागावाटप होणे आणि काँग्रेस नेते लढण्यासाठी ठाम उभे राहणे हे कठीण आहे. याच कारणास्तव महाराष्ट्रात तिसरी राजकीय शक्ती म्हणून उभ्या राहिलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकस आघाडीला गरज आहे. पण काँग्रेसचा इतिहास पाहता त्यांनी कधीही वंचित समूहाच्या सत्तेच्या प्रवेशाला अनुकूल भूमिका घेतलेली नाही. प्रकाश आंबेडकरांच्या सत्तेच्या केंद्रस्थानी वंचित समूह आहे. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण इथल्या वंचित घटकांना सत्तेत आणणारे आहे. हा त्यांचा १९८४ पासून चा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या ४५ लाख मतांच्या जोरावर आणि त्यानंतर केलेल्या पक्ष बंधनिमुळे वंचित ची ताकत दुप्पट झालेली आहे.
आता मुद्दा आसा आहे की, माहविकास आघाडीला वांचीतची मते हवी आहेत पण त्यांचा सत्तेतील उदय नको. राजकारणातील आशा परिस्थितीमुळे काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्याची व दबाव आणण्याची जुनीच राजकीय खेळी सुरू केली आहे. धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे असे त्या दबावाचे स्वरूप आहे. या साठी काही पत्रकार आणि अराजकीय पुरोगामी म्हणविणाऱ्या लोकांना कामाला लावले आहे असे म्हणायला जागा आहे. मग अशा लोकांनी प्रकाश आंबेडकर कसे हेकेखोर आहेत, ते भाजपला मदत करतात , नेहमी आडमुठेपणा ची भूमिका घेतात असे आरोप करून वातावरण निर्माण करायला सुरुवात केली आहे. हे सर्व कशासाठी तर भाजपला सत्तेतून काढण्यासाठी या सर्व लोकांना आमचा सवाल आहे की, भाजप सत्तेतून जाईल पण प्रकाश आंबेडकरांचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्ता केंद्र बदलण्याच्या आणि वंचित समूहांना सत्तेत घेणून जाण्याच्या भूमिकेचे काय? की, तुम्हालाही वंचित समूह सत्तेत येऊ नये असे तुम्हाला वाटते. अराजकीय पुरोगामी मित्रानो आम्हाला तुमच्या भूमिकेवर शंका घ्यायची नाही. पण तुमचे वागणेच तसे आहे. समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले आणि भाजपमधील नाराज असलेले पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सरंजामदार मानसिकता असलेले नेते पक्ष प्रवेश करून आपल्या साधन संपत्ती आणि जातीच्या मेरिट वर सत्तेत बसणार नाहीत याची खात्री तुम्हाला आहे काय? याचे उत्तर तर नाही असेच असणार. मग, चाळीस वर्षांच्या राजकीय संघर्षातून उभ्या केलेल्या वंचितांच्या लढ्याचा बळी प्रकाश आंबेडकरांनी का द्यावा.
सत्ता बदलणे हा तुमचा आणि वंचित बहुजन आघाडीचा हेतू सारखाच आहे. मग या हेतुला सध्या करण्यासाठी बरोबरीचा समान कार्यक्रम आणि सत्तेतील समान भागीदारी का नसावी ? केवळ दोन जागा घ्या आणि आम्हाला मते द्या हे कसे चालेल. उद्या याच जागा काँग्रेस मधील मनाने भाजप वासी असलेले नेते पडणार नाहीत याची खात्री काय? म्हणजे वंचितांच्या एक गठ्ठा मतावर तुमचे ३० ते ३५ खासदार आणण्यात आम्हाला हशील काय ?
अशा परिस्थितीत किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील भागीदारी यावर वंचित बहुजन आघाडी सोबत सन्मानपूर्वक चर्चेसाठी तुम्ही आणि महा विकास आघाडीने वेळ खर्ची घालावा. नाही तर संधी आणि वेळ गेलेली असेल.
-प्रा. प्रमोद भुंबे