• 50
  • 1 minute read

सफाई कामगार यांचा मुख्य शत्रू हा महापालिका प्रशासन आहे.

सफाई कामगार यांचा मुख्य शत्रू हा महापालिका प्रशासन आहे.

        सफाई कामगार यांच्या मुख्य शत्रू हा महापालिका प्रशासन आहे. यामध्ये आयुक्त पासून क्लर्क पर्यंत सर्वांचा समावेश होतो. यांनी आपल्या मागील पिढीना आर्थिक बाबी मध्ये मूर्ख बनविणे, चुकीची माहिती देणे, कामात मुद्दामहून दिरंगाई करणे अशा अनेक माध्यमातून आपल्या मागील सफाई कामगार यांना आर्थिक आणि शारीरिक गुलाम बनवून ठेवले आहे. याबाबत आपण काही तक्रार केली की, ही सर्व पिलावल एकत्र येऊन सफाई कामगाराला वेगवेगळ्या मार्गातून त्रास देण्यास सुरुवात करतात. कारण की, अनेक शतकापासून यांनी आपल्याला गुलाम म्हणून गृहीत धरले आहे. यांना पूर्ण कल्पना आहे की, सफाई कामगार हा आमच्या विरोधात कुठ पर्यंत जाईल, शेवटी आमच्याकडेच याला यावे लागेल. वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकारी सुद्धा यांच्या चुकांना आणि अन्याला पाठिंशी घालतात. यांच्यावर कुठल्याही पद्धतीची करवाई होत नसल्यामुळे हे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी निर्धावले आहेत.
याबाबत ताजे उदा. १) २४० दिवस असेल, २) ५पे, ६पे, ७पे कमिशन असेल, ३) साधारण शिक्षण भत्ता असेल, ४) पी.टी केस असेल, ५) फेस्टिवल ऑलॉवन्सस, ६) कामगाराला शैक्षणिक कर्ज नाकारणे असेल, ७) घरांचे धोरण न राबविणे, ७) आरोग्य विमा, ८) बँक आणि सावकार याच्यामुळे मरेपर्यंत कर्जबाजारी राहणे, ९) शिक्षणाप्रमाणे काम न देणे (प्रमोशन) १०) बोगस आणि कामगारांना गुलाम करून ठेवणाऱ्या बायोमॅट्रिक मशीन यांच्या हजेरी मार्फत धमकावणे इ…..
यांना शिक्षित सफाई कामगार हा आपले नियमानुसार अधिकार मागत असेल, तर यांची पायाची आग मस्तकात जाते. कारण यांच्या बुद्धी चातुर्याला, अनेक वर्षाच्या दादागिरीला आणि हुकूमशाहीला कोणी तरी आव्हान देत आहे. अशी यांना भीती आणि काळजी वाटायला लागते. आपली सत्ता, अन्याय अबाधित राखण्यासाठी मग हे सर्व एकत्र येऊन अशा सफाई कामगाराला टार्गेट करून त्याचे आयुष्य कसे बरबाद करता येईल, याबाबत नियोजन, धमकी आणि चाली खेळायला सुरुवात करतात.

युनियन हा कामगार आणि प्रशासन यामधील दुवा आहे. पण हा कामगारांच्या वर्गणी च्या जीवावर बलाढय होतो. परंतु घडाळ्याच्या लंबका प्रमाणे हा सतत प्रशासनाच्या बाजूने छुकलेला असतो. यामुळे सफाई कामगार हा अजूनच बिकट परिस्थिती ढकला जातो. युनियन आणि प्रशासन हातात हात घालून त्यांच्या हक्क आणि अधिकारांचे हणन करीत असतात. हे आपण सर्वांनी कॉन्टॅ्रॅक्ट करार करताना पाहिले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यानंदा सफाई कामगारांनी युनियन च्या विरोधात तसेच त्यांच्या फसवणुकी च्या विरोधात जाहीर निषेध करण्याचे धाडस दाखविले आहे. याचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे.

बँक निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन संचालकांचा कारभार हा येणाऱ्या काळात पाहिल्यानंतर समजेल की, येरे माझ्या मागल्या…. अशी परिस्थिती होते की नाही हे पहावे लागेल.

आपण सफाई कामगारांनी यापुढे आपली लढाई ही कोणाच्या दावणीला न बांधता स्वतःहून एकत्र येऊन, आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून तसेच संविधान आणि कायदे यांची माहिती किंवा त्याच्या सहाय्याने स्वतः प्रशासनाशी दोन हात करून संघर्ष करायला हवा. यासाठी शिक्षित कामगार यांनी पुढे यावे अथवा तरुण कामगारांनी किंवा जमत असेल तर सर्वच कामगारांनी निदान कायद्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली पाहिजे. किती ही संकट आली तरी आपली कायद्याची पदवीका मिळवली पाहिजे. आपला खरा शत्रू ओळखून त्यावर तुटून पडले पाहिजे. हे करीत असताना तुम्हांला प्रशासन, युनियन याकडून त्रास होण्याची दाट शक्यता आहे. परंतु एकदा का प्रशासनाला तुमच्या बुद्धी चे चातुर्य समजले की, तुम्हांला तुमच्या अधिकार / हक्कापासून कोणीही “मायचा लाल” वंचित ठेवू शकत नाही. ज्या प्रकारे माझी दखल / तक्रार ही लेखी स्वरूपात पहिल्यांदा सफाई कामगारांच्या इतिहासात घेण्यात आली आहे. माझी गुलामीतून सुटका करून घेयायची, तसेच येणाऱ्या माझ्या पिढिंची गुलामतुन सुटका करायची असेल, तर मला बौद्धीक संघर्ष हा करावाच लागेल. याशिवाय माझ्याकडे अन्य कुठलाच मार्ग नाही.
जरी माझ्यावर उद्या कारवाई झाली तरी मी माझ्या भाकरीची सोय ही माझ्या शिक्षण आणि डिग्र्यांच्या माध्यमातून करून ठेवली आहे. परंतु जे अधिकारी या कारवाई मध्ये सामील असतील ते नक्कीच धुतलेल्या तांदळासारखे नाहीत. जाताना ३ ते ४ अधिकऱ्यांना सोबत घेऊन जाण्याचा मी चंगच बांधलेला आहे. जो संघर्ष करतो, त्यालाच विजय प्राप्त होतो. त्याचीच गुलामीतून सुटका होते. हे प्रामुख्याने लक्षात घ्या.
आपल्या हक्क अधिकाराची लढाई ही पूर्वी पासून महात्मा बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहुजी महाराज आणि जागतिक विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून लढली गेली आहे. आज ही ती सुरूच आहे. आज सफाई कामगार हा अनुसूचित जाती मध्ये अनुसूचित आहे. त्यामुळे आपल्यांना अशा महापुरुषांनाचा वारसा लाभला आहे. तसेच आपल्या मागे आहे. या सर्व व्यक्तीचे विचार हे आपल्यासाठी अमर आहेत… आणि राहतील……✊

आपला सफाई कामगार,
सुनिल यादव

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *