• 81
  • 1 minute read

समाजवादी पार्टी, महार मा. आ. अबु आसिम आझमी यांचा दि. ५ ऑगस्ट रोजी गजापूर विशाळगड दौरा – प्रताप होगाडे

समाजवादी पार्टी, महार मा. आ. अबु आसिम आझमी यांचा  दि. ५ ऑगस्ट रोजी गजापूर विशाळगड दौरा – प्रताप होगाडे

समाजवादी पार्टी, महार मा. आ. अबु आसिम आझमी यांचा
दि. ५ ऑगस्ट रोजी गजापूर विशाळगड दौरा – प्रताप होगाडे

कोल्हापूर दि. २५ – “समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. आ. अबू असिम आझमी हे सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून ते गजापूर, मुसलमानवाडी व विशाळगड येथील दंगल ग्रस्त पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. सोमवारी सकाळी ठीक १० वाजता ते सर्किट हाऊस, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथून निघतील. दुपारी ठीक १२ वाजता गजापूर, विशाळगड या सर्व ठिकाणी जातील. त्या ठिकाणी संबंधित पीडितांची भेट घेतील व समक्ष माहिती घेतील. स्थानिक परिस्थिती व वस्तुस्थितीची पाहणी करून ते दुपारी ४ वाजेपर्यंत परत कोल्हापूर येथे येतील. कोल्हापूरमध्ये शेतकरी कामगार पक्ष कार्यालय, शिवाजी स्टेडियम समोर, टेंबे रोड येथे त्यांची दुपारी ठीक ४ वाजता पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ते परत मुंबईस रवाना होतील.” अशी माहिती प्रताप होगाडे कार्याध्यक्ष समाजवादी पार्टी महाराष्ट्र यांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.

समाजवादी पार्टीच्या या शिष्टमंडळामध्ये प्रदेश अध्यक्ष मा. आ. अबू असिम आझमी यांच्याबरोबर या दौऱ्यामध्ये कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, प्रधान महासचिव परवेझ सिद्दीकी, महासचिव शिवाजीराव परुळेकर, महासचिव अनिस अहमद, कोल्हापूर शहर अध्यक्ष मधुकर पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष नितीन मिरजकर, भारत पाटील, अली इनामदार, तारीक खान, बी. डी. यादव, शाकीर तांबोळी, नुरुल हक, खुशनूर लाला, जहीर खान, हारून रशीद इत्यादी पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत. अशीही माहिती प्रताप होगाडे यांनी दिली आहे.

0Shares

Related post

…तरच महिलांचा खरा सन्मान होईल !

…तरच महिलांचा खरा सन्मान होईल !

…तरच महिलांचा खरा सन्मान होईल ! स्त्री ही देवता आहे. ती आदिमाया आहे. ती आदिशक्ती आहे.…
जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल ! जगातील 7 आश्चर्या पैकी ताजमहल हे एक आश्चर्य असून ही वास्तू…
वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *