लोकशाही ची व्याख्याच लोकशाही ही सर्व समाज्यासाठी समान न्याय ,समान वागणुक असायला पाहिजे .संविधानाचा मध्यवर्ती गाभाच हा आहे “समता ,स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व ” दुर्देवाने वारंवार या गाभ्यालाच छेद दिला जात आहे .मुळ विमुक्त भटक्या जमाती वारंवार आपल्या मागण्या प्रस्थापित वर्गाकडे करत आहेत पण तसूभरही न्याय या वर्गाला मिळाला नाही .याच संदर्भात परवा एक छोटेखानी बैठक आयोजित केली होती .यात विमुक्त भटक्या जमाती मधील कार्यकर्ते व काही जाणकार मंडळी अशी ती मनमोकळी चर्चा होती .यात पहीलीच भुमिका मांडताना विमुक्त भटक्या जमाती मधील खऱ्या राजपुत भामटा समाज्याचे डॉक्टर कैलास गौड साहेबांनी आपली भुमिका मांडताना ” विमुक्त भटक्या समाज्याला न्याय ध्यायचा असेल तर तुम्हाला सामाजिक न्यायाच्या भुमिके मधुनच न्याय दिला तरच काही तरी घडेल “” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना प्रचंड लक्ष केंद्रित केले आहे ते सामाजिक लोकशाही वर . सर्व समाज समावेशक सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक व राजकीय लोकशाही सर्व समाज्याला मिळावी हिच भुमिका मांडली आहे .संविधान निर्मिती वेळी जी चर्चा झाली .अनेक सदस्यांच्या प्रश्नांना डॉक्टर। बाबासाहेब आंबेडकरांनी जी खंबीरपणे उत्तरे दिली आहेत ती सर्वसामान्य लोकांना समजली पाहीजेत .भारत हा एक संघ राहण्यासाठी जाती विभाजन हा फार मोठा गंभीर अडथळा आहे व त्याला ” धर्मांध वर्णव्यवस्थेचे वरदान आहे .त्यामुळे जाती जाती मध्ये उच्च निचतेची खोलवर रुजलेली भावना नष्ट करणे इतके सोपे नाही .समता लोक मनाने स्विकारणार नाहीत म्हणुन ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याने बंधनकारक केली .पण राज्यकर्ते हेच प्रस्थापित वर्गातील असल्यामुळे सामाजिक न्यायाची अम्मलबजावणीच होत नाही .आज कित्येक वर्षे या पददलित वर्गाची जनगणना करा ही मागणी प्रस्थापित वर्गाने कधीच पुर्ण केली नाही .उशिरा का होईना आज कॉंग्रेस चे नेते खासदार माननीय राहुल गांधी साहेब आज जनगणना करण्यासाठी आग्रही आहेत .विशेष म्हणजे याबाबतीत झालेली चुक व विलंब या बद्दल ते दिलगिरी व्यक्त करत आहेत .वास्तविक अश्या गोष्टीत झालेली चुक मान्य करायला सुद्धा फार मोठे मन लागते व वैचारीक बैठक ही असावी लागते ती माननीय खासदार राहुल गांधी साहेब यांच्या कडे आहे हे निश्चित .आज आरक्षणा वरुन जो सामाजिक सलोखा बिघडला आहे त्याला जनगणना हेच उत्तर आहे तर नुसती जातवार जनगणना करून भागणार नाही तर स्वातंत्र्यानंतर कोणाला काय मिळाले हे ही निश्चित होईल ज्यांना काहीच मिळाले नाही जे सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक व राजकीय न्यायापासून वंचित आहेत त्या सर्व वंचित घटकांना न्याय मिळेल अर्थात त्या करिता वंचित घटकांचा ही स्वयंपुर्तीने सहभाग व सहकार्य हवे हे निश्चित