- 49
- 3 minutes read
सिंधू संस्क्रुतीचे लोक आर्यपुर्व आदिवासी लोक होत
आर्याचे शत्रु दास,दश्यु आणि आदिवासी !
सिंधु संस्क्रुतीच्यां उत्खननात सापडलेल्या खापरावरील चित्रावरुन आणि अवशेषावरून, आर्यचे शत्रु हे दास, दस्यु लोक म्हणजे (आताचे बुद्धि़ष्ठ लोक ) आणि (पण, पणी, पणका, परधान (पणधान) लोक म्हणजे आताचे , अ आदिवासी लोक होत.
सिंधू लोकांची संस्कृती श्रेष्ठ असल्या कारणामुळे आर्यनी आपले वेद आणि यज्ञ पद्धती वॆगेरे आपल्या पुरतेच सिमीत ठेवले होते. त्यामुळे, इतरेजनांत (आर्यच्या व्यतिरीक्त ईतरात) सिंधू संस्कृती ही कायम राहिली. सबब, अलीकडील आर्यची संस्कृती (हिंदुची सनातन संस्क्रुती) ही तर संमिश्र संस्कृतीचा भाग बनला आहे. अशा प्रकारे भारतीय इतिहासाचा पहिला बिंदू हा सिंधू संस्कृती आणि शेवटचा बिंदू म्हणजे, प्रचलित हिंदू (सनातन) संस्कृती असे स्पष्ट दोन भाग पडतात. या बाबीला सोडून दिले तर, भारताचा इतिहास परिपूर्ण होऊच शकत नाही. या दोन बिंदूतील अज्ञात काळ (Dark Period) हा बराच मोठा आहे.
ज्या प्रमाणे आर्य व त्यांचे शत्रु ही दोन वेगवेगळी टोके होती, तशीच आर्य धर्माच्या आणि त्यांच्या शत्रुच्या धर्माचा (सिंधु लोकांची संस्क्रुती) दोन टोके होती. अशा या धर्माच्या आणि संस्कृतीच्या, अत्यंत दोन टोकाच्या
पंरस्पर विरुद्धच्या भुमीका होत्या.
दुसरे असे की, आर्य आणि आर्यपूर्व (सिंधुतील) लोकांच्या धर्मातला मुख्य फरक म्हणजे, आर्य लोक यज्ञाने ईंद्रादि देवांना संतुष्ट करीत होते, तर त्यांचे शत्रू लोक (सिंधु संस्क्रुतील लोक) लिंग पुजक होते. आर्य पूर्व लोक (सिंधुतील लोक) लिंगाच्या मूर्तीची आणि नग्न देवतेच्या मूर्तीची पूजा करीत होते. त्यामुळे आर्य लोक लिंग पूजेला हिन समजत होते. आर्यव्दारा
आपल्या शत्रुंचा शिश्नदेव म्हणजेच लिंगपुजेला हीनत्वदर्शक नावांने संबोधित होत होते.
सिंधु संस्क्रुतीतील लिंग पूजकाच्या अनुशंघाने पूजा केले जात असणारे वृषभ (Bull) आणि बोकड (Got) यांना वीर्य सिंचनाचे श्रेष्ठ प्रतीक मानल्या जाऊन, त्याला लिंगपूजेचा भाग म्हणून, पिंपळादी वृक्ष (Bodhi Tree) व मातृ स्वरूपात नद्याची (Rivers) ईत्यादीना “निसर्ग” म्हणून, पूज्यनिय माणित होते. तर आर्य लोक सिंधु संस्क्रुतीच्या लिंग पुजनाला विरोध करीत होते. सिंधुच्या उत्खननातून उपलब्ध झालेल्या, खापराच्या मुद्रांवर नग्न देवतांच्या, वृषभाच्या, नद्यांच्या आणि पिंपळा सारख्या वृक्षाच्या प्रतिमा आहेत. त्या वरून सिंधु संस्कृतील लोक लिंग पुजक होते. ते लिंग पुजेच्या अनुशंघाने वृषभ, बोकड, पिंपळ वृक्ष आणि नद्यांची पूजा करीत होते, हे निर्विवाद सत्य आहे [प्रुष्ठ क्र. १०८- प्र.रा.दे.]
सिंधु संस्क्रुतीच्या उत्खननात आर्य वंशाची सांगळे सापडले नाहीत—
पुरातन व मानवशास्त्र खात्यांव्दारा केलेल्या मृत शरिराच्या तपासणीमद्ये हडप्पा व मोहेंजोदारो या दोन्ही शहरात, आर्य पूर्व लोक लिंगाच्या मूर्तीची आणि नग्न देवतेच्या मूर्तीची पूजा करीत होते. या तपासणीमद्ये असेही निष्कर्श समोर आले आहे की, त्यात आर्य सोडून, सर्व मानववंशाची मृतशरीरे उपलब्ध झाली. (प्रुष्ठ. १२ प्र.रा. दे.) म्हणजेच सिंधु संस्क्रुतीमद्ये आर्य लोक नव्हतेच. कारण उत्खननात आर्य वंशाच्या (Nordics) मानंवाची म्रुत शरीरे सापडलीच नाहीत. (Nordics means North Germanic peoples)
तर, सिंधु संस्क्रुतीच्या
उत्खननात सापडलेल्या खापरावर, चित्रित वृक्ष व धान, उखळ, नावं, प्राणी म्हणजे गाय, बैल, वृषभ, शेळ्या, मेंढ्या, पशु, आणि संपत्ती होती. हत्ती, उंट, गेंडा, कुत्रा, हरीण, यांचे सांगडे होते. त्यात मोर, चिमण्या, पक्षी होते. मात्र, यात घोडा सापडला नाही.
हे सर्व प्राणी, पक्षी, व्रुक्षवेली, आदिवासी संस्क्रुती आणि बॊद्धकालीन संस्क्रुती मधिल गण पध्दतीवर आधारीत असलेल्या गणाचे टोटम होते. उदा -सिद्धार्थ गॊतम बुद्धाला “गॊ” म्हटले जात. ”गॊ” चा अर्थ म्हणजे “नंदी” किंव्हा ‘बॆल’ असा होतो. तर आदिवासीच्या बोलीत बैलाला “कोदा’ म्हणजे म्हणतात. “कोदा” हे आडनांव आदिवासीतील कोडापे, सहा देवे, गणाच्या लोकांचे टोटेम आहे. दुसरी बाब, सिंधुच्या उत्खननात, बकरी व शेळ्या मेंढ्या सापडल्या. आदिवासी बोलीत, बकरीला ‘हर्रे’ कुमरे व हेट्टी कुमरे म्हणजेच आदिवासीतील पाँच देवे व सहा देवे ”कुमरे” लोकांचे, टोटेम “बकरा” होय. उत्खननातील खापरावरील चित्रात जे काही प्राणी, व्रुक्ष सापडले आहेत, ते बुद्धकालीन टोटेम आणि आजचे आदिवासीतील टोटेम यांची सांस्क्रुतीक तत्वनारुपे एकच असल्याचे स्पष्ट होते.
मात्र, हिंदु्ची देव व देवता सारखी सिंधू संस्कृतीत देव व देवाची मंदीरे सापडले नाहीत. सिंधू उत्खननात हिंदुचे देवळे, देवाचे ओठे, देवाच्या मूर्ती अथवा देवळाचे भग्नावशेष
यापैकी काहीही उपलब्ध झाले नाही. जर सिंधु संस्क्रुतीत हिंदु सारख्या देव, देवता व त्याची देवळे असते, तर त्याचे अवषेश नक्कीच सापडले असते. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीतील लोक मूर्तिपूजक असल्याबाबत, वरील बाबी अथवा त्याचे अवशेष उत्खननात सापडणे अगदी स्वाभाविक होते, परंतु ते नसल्यामुळेच सापडत नाही. [प्रुष्ठ क्र. १६६ प्र.रा. देशमुख] यावरून असे सिद्ध होते की, सिंधु संस्क्रुतीतील लोकांचा आणि आर्य हिंदु लोकाचा या दोहॊमद्ये संस्क्रुतीशी काहीही संबध येत नाही.
आदिवासी लोकाच्या
डोक्यावरील सिंगे आणि देव व देवाची पूजा आर्चा—
उत्खलनात मिळालेल्या सिंधू मुद्रांवर त्यांच्या देवाच्या प्रतिमा सापडल्या असून, त्यात स्त्री, पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या देवता आहे. त्या देवता नग्न असून त्याच्या डोक्यावर शिंगे आहेत. सिंधु संस्क्रुतीचे लोक, हे लिंग आणि योनीचे पूजक असून त्याच्या लिंग आणि योनीच्या आकाराच्या पूज्य वस्तू उत्खनित झाल्या आहेत. [प्रुष्ठ क्र. १८]
सिंधू संस्क्रुतीतील लोक हे व्रुषभाचे पूजक असून, पिंपळादी वृक्ष व इतरही पूज्य वस्तूची पूजा करीत होते. [प्रुष्ठ.क्र. ८] आदिवासी संस्क्रुतीतील टोटेम व गण पद्धतीत प्राणी व व्रुक्षाच्या नांवाने आदिवासीच्या गणातील टोटेमाची आजही पुजा होते, अशा टोटेमाची नांवे, हे सर्वच आदिवासीनी अशी आडनावे स्व-टोटेम म्हणून धारण केलेली दिसते. हे टोटेम, म्हणजॆ
आदिवासी लोक, व्रुक्षाची व प्राण्याची आजही पुजा करतात. करतात. उदा- आदिवासीतील कुमरे लोकांचे पाँच देवे व सहा देवे असतात. त्यां लोकाचे टोटेम- हर्रेकुमरे.व ”हेट्टी कुमरे” म्हणजेच बकरा होते. ते आपले टोटम म्हणून बकरीचीच पुजा करतात. तर पेंदाम या सहा देवे लोकाचे टोटेम पद्दी (Pig) म्हणजे डुक्कर होते. हे लोक नारायण देव म्हणून डुक्कराची पूजा करतात. तर नॆताम चार देवे लोकाचे टोटम “नॆ” (Dog) म्हणजे कुत्रा असून, ते कुत्राची पूजा करतात. तर ताराम आदिवासी लोकाचे टोटेम हे तर्रास म्हणजे साप ( Snake) असून हे लोक सापाची (नागपंचमी) पूजा करतात. मडावी लोंकाचे टोटेम ”मरा” म्हणजे “सालव्रुक्ष” (The Passion Tree) असून ते सालव्रुक्षाची पुजा करतात. तर उईके सहादेवे लोक ईरुक म्हणजे मोहाचे झाड. (The Passion Tree) हे लोक मोहाच्या झाडाची पूजा करतात. (वरील शब्द प्रयोग आदिवासी बोलीतील आहे.) अशाच प्रकारे सिधार्थ गॊतम बुद्धाच्या काळातही आदिवासी सारखीच टोटेम व गण पद्धती होती. उदा. गॊतम बुद्धाचा प्रथम गुरु ”आलाम कालाम” आदिवासी होता. या नावातील टोटेम म्हणजे ”अलार” या शब्दाचा अर्थ उली म्हणजे उंदीर (Mouse) होतो. सात देवे आलाम आडनांवाचे लोक आजही हयात आहेत. आलाम म्हणजे उल्ली अर्थात “उंदिर”, हे त्यांचे टोटेम होते. तसेच कालाम म्हणजे लाकडाचे खोड होते, आदिवासी लोक उंदिर व लाकडाच्या खोडाची आपले टोटेम म्हणून पूजा करतात.
तर बुद्धाचे नांव गॊतम. “गॊ” (Bull) म्हणजे नंदी किंव्हा बॆल असा होतो. आदिवासीतील कोडापे लोक नंदीला आपले टोटेम मानून पूजा करतात. तर बुद्धाची माता ”महामायास” ज्या साल व्रुक्षाखाली प्रसुती वेदना झाल्या, आणि त्याच सालई झाडाखाली बुद्धाचा जन्म झाला. त्या सालईच्या झाडाला “मरा” अर्थात (शाल मरा) सालई व्रुक्ष असे म्हटल्या जाते. या व्रुक्षाला आपले टोटेम म्हणून आदिवासी लोकव्दारे आजही पूजा केली जाते. तर, आदिवासीतील सात देवे मडावी लोक आपले टोटेम म्हणून सालई व्रुक्षाची पूजा आजही करतात.
यावरून असे सिद्ध होते की, सिंधु संस्क्रुतीच्या उत्खननात सापडलेले, एक सिंगाचा बॆल, कुत्रा, साप, बोकड, सालई व पिंपळ व्रुक्ष (म्हणजे बोधी व्रुक्ष) हे सर्व बुद्ध संस्क्रुती आणि आदिवासीच्या निसर्ग संस्क्रुतीतील टोटेमाशी अतुट जुडलेले नाते आहे. अशा प्रकारे सिंधु संस्क्रुती, बुद्ध संस्क्रुती आणि आदिवासी संस्क्रुती, या संस्क्रुती एकाच कळीच्या सांस्क्रुतीक प्रक्रियावर आधारित आहे, हे सिद्ध होते.
काही मुद्रांवर तीन तोंड व डोक्यावर शिंगे असलेलया नग्न देवाच्या मूर्ती उपलब्ध झाल्या आहे. [प्रुष्ठ. क्र. १९] ज्या लोकात फार प्राचीन संस्कृती आहे, अशा आदिवासी लोकांच्या देवाच्या डोक्यावर शिंगे आहेत. तसेच आदिवासीच्या
मुखियाला व देवीच्या पुजाऱ्याला शिंगे बांधावी लागत असे. शिंगे बांधल्या शिवाय, त्यांना सामाजीक संस्कार करने, पूजाआर्चा करणे वर्ज होते. बस्तर मधील गोंड, कोरकू, बैगा, माडिया आदिवासी लोक आपल्या डोक्यावर बायसनाची सिंगे बाधून पुजा व न्युत्य करतात. तर बस्तरला लागून असलेल्या ओरिसातील इतर लोकांत देवांना आणि श्रेष्ठ माणसांना शिंगे असतात.
लिंग पुजा का ?
”लिंग पूजा” हे एक प्राथमिक माणसाचे व जगाचे कोडे आहे. आपणास दिसणाय्रा विश्वाचा उगम कसा झाला? त्याचा विस्तार कसा होतो? ह्याचे उत्तर शोधून काढणाऱ्या प्राथमिक मनांला स्तिमित करणारी, म्हणजे सर्वात महत्वाची प्रजनन क्रिया दिसली. पाऊस येताच सस्य आणि तृणाची बीजे अंकुरित होतात, वाढतात आणि पुन्हा पाहिल्या सारखेच दाणे निर्माण होतात. लहानश्या बीजा पासून मोठा वृक्ष होतो, फुलतो, फलतो, आणि पुन्हा बीज निर्माण करतो. पुढे असे बीज अंकुरीत करीत, ते विश्वाच्या विस्ताराचे कार्य करीत वृद्ध होतात आणि मरतात. ह्या पर्वाचा अर्थ प्रजनन हे जगाच्या विस्ताराचे कारण आहे. प्राणी श्रुष्टी आणि आई-बापा पासून निर्माण होते, त्या प्रमाणेच या समस्त विश्वाचे कोणीही आई-बाप असले पाहिजे आणि त्यांच्यापासून विश्व निर्माण झाले पाहीजे, अशी लिंग पूजेच्या मुळाशी संकल्पना आहे. [प्रुष्ठ क्र. १७१ प्र.रा.देशमुख]
अशा प्रकारे जगातील खालील १५ देशात आजही लिंगाची व नग्न देवताची पूजा केली जाते.
(१) कानमारा मत्सुरी – कावासाकी, जपान. (२) चाओ मॅ टुपटिम मंदिर – बँकॉक, थायलंड (३) जेजू लव्हलँड – जेजू बेट, दक्षिण कोरिया
(४) भूतान फिलिक म्युरल्स – थिम्फू,भूतान ,(५) आइसलँडिक फालोलॉजिकल म्युझियम – हॅसावॅक, आइसलँड ,
(६) खार्कोरिन रॉक – एर्डेन झु मठ, मंगोलिया
(७) खजुराहो स्मारकांचा गट – मध्य प्रदेश, भारत
(८) हॅनेन मत्सुरी – कोमाकी, जपान
(९) सेर्ने अब्बास राक्षस – डोर्सेट, इंग्लंड
(१०). बोरानी उत्सव – टर्नावोस, ग्रीस
(११) सेक्सचे संग्रहालय – न्यूयॉर्क शहर, यूएसए
(१२) फ्रा नांग केव्ह – क्रबी प्रांत, थायलंड
(१३) खालिद नबी स्मशानभूमी – गोलेस्तान प्रांत, इराण
(१४) मारा कॅनन प्रजनन मंदिर – तवरायमा, जपान
(१५) हेसिंदांग पार्क – सिननम, दक्षिण कोरिया
(Ref-https://www.scoopwhoop.com/entertainment/places-where-penis-is-
worshipped/)
सिंधु संस्क्रुतीतील लोक आर्याचे शत्रू—
मॅक्डोनेलचे वैदिक रीडर भारतीय विद्यापीठात पाठ्य पुस्तक आहे, त्यात आर्याच्या शत्रूनां ”रानटी” [Aboriginal] या एकाच शब्दात वर्णन केले आहे. वेद हे प्राकृतिक चमत्काराचे वर्णन आहे, असे मानल्या पासून, वेदाचे अर्थ लावण्यात जी अडचण निर्माण होते, आर्याचे संघर्ष रानटी लोकांशी झाले आहे, म्हणण्याने बिलकुल कमी होत नाही. [प्रुष्ठ क्र. २८ प्र.रा. देशमुख]
प्राकृतिक पद्धतीने वादाचे अर्थ लावणारे आर्याचे शत्रू म्हणून वर्णनिलेले शत्रू कोणीतरी काल्पनिक अतिमानव मानतात, तर आर्याचे संघर्ष रानटी लोकांशी (आदिवासी लोका सोबत) झाले, असे मानणारे विद्वान दस्यु म्हणजे कोणी तरी रानटी लोक असावे असे मानतात. [प्रुष्ठ क्र.२८ प्र.रा. दे.] अशा प्रकारे दास, दस्यू म्हणून वर्णन केले असलेले आर्याचे शत्रु म्हणजेच सिंधू संस्कृतीतील लोक आहेत. अशा प्रकारे आर्याचे शत्रू हे सिन्धु संस्कृतीचे लोक होत. या बदल कोणत्याही प्रकारचा संशय उरत नाही. आर्यानी आपल्या शत्रूसोबत संघर्ष करून त्यांची घरे जाळली, त्यांच्या कत्तली उडविल्या, त्यांना देशोधडीस लावले, असे वर्णन ऋग्वेदात आहे. हीच गोष्ट हरप्पा व मोहेंजोदारो येथील उत्खननातून सिद्ध होते. सिंधू संस्कृतीतील लोक हेच प्राथमिक आर्याचे शत्रू असून, आर्याचे ऋग्वेदात वर्णन हे दाखवून दिले आहे. [प्रुष्ठ क्र. ४६ प्र.रा.दे.]
आर्यानी सप्तसिंधूच्या प्रदेशात प्रवेश केल्यानतर तेथे त्यांचे दास, आणि दश्यु नावांनी संबोधिलेल्या लोकांशी दीर्घकाळ संघर्ष झाले. हे लोक आर्यापेक्षा जास्त सुसंकृत होते. परंतु स्वभावाने शांत, भित्रे व युद्ध कौशल्यात व शास्त्रे तयार करण्याचे कामात बरेच मागासलेले असल्यामुळे, आर्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही व त्यांची समृद्ध शहराची संस्कृती धुळीस लावली. [प्रुष्ठ क्र.५९]
आर्याच्या शत्रुंना ऋग्वेदात दास, दश्यू, वृत्र, मृघ्रवाच, म्रूघ्र, पनी, अव्रत, अयाजवण अयज्वन, अत्तुन्वत, शिश्नदेवा, मुरा, मूरदेवा , यातुयांना, यातव इत्यादी अर्थात तुच्छता दर्शक नावांनी संबोधिले आहे. [प्रुष्ठ.क्र. ५९प्र.रा.दे.] दास, दस्यु हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आर्याचे शत्रू निदर्शक असून त्यात कोणताही दुसरा अर्थ अभिप्रेत नाही. ऋचा १०-९९-६ मध्ये आर्यपूर्व लोकांच्या तीन तोंडाच्या शिंगे धारण करणाऱ्या देवाला दास संबोधीले आहे.
ऋग्वेदातील वर्णनावरून आणि सिंधू उत्खननातील स्वतंत्र पुराव्यावरून ऋग्वेदातील आर्याचे शत्रू आणि सिंधु संस्कृतील लोक एकाच मानववंशाचे असून ते रंगरूपाने अगदी सामान होते. हे निश्चित सिद्ध होते.
सिंधू संस्कृतीने महत्व
सिन्धु संस्कृती भारतीय इतिहासाशी जोडलीच नाही तर, ती भारताच्या भूमीवर उत्खनित झालेली, परंतु येथील लोकांशी संबंधित नसलेली एक विस्मृत झालेली मृत संस्कृती म्हणून राहील आणि कालांतराने ती नष्ट होईल. प्रचलित असलेली हिंदू संस्कृती ही संमिश्र संस्कृती असून, तीत सिंधु संस्कृतीचे प्राचर्य आहे. सिंधू संस्कृती ऋग्वेदाशी जोडून संमिश्र संस्कृती कशी निर्माण झाली, हे दाखविले नाही तर, प्रचलित हिंदू समाजातील अनेक महत्वाच्या चालीरीतीचे, समाज रचनेचे, भाषेचे, समाजाच्या आचाराचे-विचारांचे, देव-धर्माचे, कुळं-बुळचाराचे अर्थ लागणार नाही. आपण स्नान करून गंध का लावतो, आपल्यात अस्पृश्यतता का आहे, जातीभेद कसे झाले, चातुवर्ण्य का आहे? इत्यादी अनेक महत्वाच्या गोष्टीचे अर्थ लागणार नाही. सिंधू संस्कृतीमूळे आपले सर्व सांस्कृतीक जीवन प्रकाशित झाले आहे.
आर्याची संस्कृती जगातील इतर संस्कृतीच्या मानाने फार अलीकडची आहे, असे पाश्चिमात्यांचे म्हणणे आहे. सिंधू संस्कृती आर्यपूर्व असून ती जगातील इतर प्राचीन संस्कृती पेक्षाही प्राचीन असण्याचा संभव आहे. ही प्राचीन संस्कृती जर भारतीय इतिहासाला जोडली नाही, तर भारतीय संस्कृतीचा बहुमान वंचित होईल. [प्रुष्ठ क्र. ४०]
पन, पनी, पणकालोक
सरस्वतीच्या तीरावर पनीची वस्ती असल्याचा ऋचांतून उल्लेख आहे. सरस्वती त्या काळी फार महत्वाची नदी होती. पनी व्यापारी, आपला व्यापार सरस्वतीतून लांबवर करीत होते. दास आणि दस्यु यांच्या खालोखाल आर्याच्या शत्रूचा निदर्शक पनी हा शब्द आहे. पनीबद्धल ऋचातून जी माहिती मिळते ती अशी, पनी ”पूर” नावाच्या मजबूत तटबंदीच्या शहरात राहत असून ते धन, धान्य, गायी, सोने, रूपे, मौल्यवान दगड इत्यादींच्या अगणित संपत्तीने व विकासाच्या आणि उपभोगाच्या वस्तूंनी ते समृद्ध होते.
“कुवय” नावांच्या पनी राजांच्या निवासस्थानाचे वर्णन ऋचा १-१०४-४ मद्ये आहे. [६२] दास, दश्यू, पनी इत्यादी भारतातील आर्याचे शत्रू व सिंधू नदीच्या खोऱ्यात ज्यांची संस्कृती उपलब्ध झाली ते सिंधु संस्कृतील लोक एकच होत. असा निष्कर्ष ईतिहास संशोधक एँड. प्र.रा. देशमुख यवतमाळ यांनी आपल्या पुस्तकात मांडला आहे.
आर्याचे शत्रु, पण, पणका, पणी, परधान, पाटाळी होत. पणीचा यज्ञाला विरोध होता. दुसरी गोष्ट, पणि यज्ञ न करणारे, हवणासाठी अग्नी न पेटविणारे, आर्याच्या देवावर श्रद्धा नसलेले आर्यापेक्षा सर्वस्वी वेगळे लोक होते. ऋचावरून दिसणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पणि हे सर्वच प्रातांत होते. सिंधू संस्क्रुतीतील पणीचा मुख्य नायक बुब्रू होता. ज्याचा मुखवटा सिंधू संस्क्रुतीच्या उत्खननात सापडला. ऋचा ३१-३२-व ३३ मध्ये आजारांनी दान करणाऱ्या ”बुब्रू” नावांच्या पनीची स्तुती आहे.
अधिबुब्रु: पाणिना वर्षीष्ठे मू र्षन्नस्थात!
उरू; कक्षो न गाड़या: [६-४५-३१]
अर्थ – गंगेच्या उन्नत तटकाप्रमाणे ”बुब्रु” पानीचा शिरोमणी आहे, वरील ऋचावरून अत्यंत महत्वाची माहिती मिळते.
”बुब्रू,” नांवाचा श्रेष्ठ पनी व्यापारी हजारांनी द्रव्य मिळविणारा आणि हजारांनी दान करणारा पनी श्रेष्ठ होता. तो मुरा, मुरास , माडिया [मुरा म्हणजे माडीया आणि कुवय म्हणजे कोयताड] या लोकाचा शिरोमणी होता. ऋचातुन आर्याच्या शत्रुंना मुरा ३-४३-६ आणि ८-२१-१५ असेही संबोधिले आहे. मुरा या शब्दाचा अर्थ सायणाचार्यानें ”मूढा” असा दिला आहे. दास आणि दस्यु ह्या शब्दामागे मुरा हा शब्द देखील आर्याच्या शत्रुवाचक अनार्य दर्शक शब्द आहे. मौर्य वंशाचे नांव मुरा नावाच्या स्त्री नावावरून पडले असा समज आहे.
प्राणी व वृक्ष
शिंगे असलेले बैल, बोकड, व ईतर पिंपळ, सिंह, खापराच्या मुद्रांवर नग्न देवतांची वृषभ, बोकड, नद्यां, आणि पिंपळा सारख्या प्रतिमा आहेत. या व्रुक्ष वट प्राण्याची आर्याचे शत्रू सर्वांची पूजा करीत होते निर्वाद आहे. यांची आदिवासी संस्क्रुतीत टोटेम म्हणून आजही पूजा होते.
पृथ्वी आणि वृषभाची पूजा—
सिंधू संस्कृतीत अथवा प्रचलित हिंदू देवात पृथ्वी नावाची प्रमुख देवता नाही. सिंधू संस्कृतीमध्ये पृथ्वी देवतेचे देवळे आढळत नाहीत. पृथ्वी देवतेची स्वतंत्र आणि मोठ्या प्रमाणावर पूजा देखील होत नाही. पूजेच्या प्रारंभी पृथ्वीची पूजा करण्याचा विधी आहे, परंतू तो पूजेचा एक भाग आहे. पृथ्वी देवतेच्या प्राचीन मूर्ती उपलब्ध आहेत. त्यावरून प्राचीन काळी पृथ्वीची स्वतंत्र देवता म्हणून, पूजा होत असावी हे सिद्ध होते. विदर्भात माहूरघरी येथे पृथ्वी देवतेचे प्राचीन मंदिर उपलब्ध आहे. ही मूर्ती बसलेल्या आसनात असून ती नग्न आहे. ह्या मूर्तीचे छायाचित्र आणि वर्णन यवतमाळ येथील शारदाश्रमाच्या प्रथम वार्षिक अंकात दिले आहे. ही मूर्ती सिंधू संस्कृतीच्या उत्खननात उपलब्ध झालेल्या खापराच्या मुद्रेवरील मूर्तीसारखी आहे.
आज जरी पृथ्वी महत्वाची देवता मानली जात नसली तरी सिंधू संस्कृतीतील ती एक प्रमुख देवता होती. हरप्पा व मोहेंजोदारो येथे उत्खननात सापडलेल्या खापराच्या मुद्रांवर हे पृथ्वी देवतेचे चित्र आहे. त्यापैकी एका मुद्रेवर एका बाजूने डोके खाली व पाय वर आणि एकमेकां पासून अलग असलेले नग्न देवतेचे चित्र आहे. तिच्या गर्भाशयातून झाड निघालेले आहे. त्यामुळे हे चित्र पृथ्वी देवतेचेच आहे असे निश्चित अनुमान काढता येते.
आदिवासी संस्क्रुतीमद्ये पृथ्वी प्रमुख देवता आहे. ती देवता प्राचीनकाळी भारता पुरतीच सीमित नव्हती तर ती मध्य आशियातही असल्याची शक्यता आहे. बोगझकुई येथे ई. स. पूर्व १४ व्या शतकातील हिट्ट हिट्टईट [Hittait] आणि गिट्टाणी आणि मिट्टनी या दोन लोकांमध्ये झालेला तहनामा उपलब्ध झाला आहे. त्यातील गिट्टाणी आणि मिट्टनी ही नावे अनुक्रमे पृथ्वी दर्शक ”सीत्ता” आणि मातृदर्शक ”माता” या शब्दाची रूपे आहेत
जगातील आदिवासी लोक माता प्रुथ्वीची आजही पूजा करतात–
अलिकडेच जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाव्दारा “माता प्रथ्वी” च्या अधिकाराचे संरक्षण करणारा जाहीरनामा मंजूर केला गेला आहे. माता पृथ्वी हा सूर्या पासूनचा तिसरा ग्रह आहे आणि सात अब्जाहून अधिक लोकांचे निवासस्थान आहे. पृथ्वी ही जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे. झाडे,आणि अन्न वाढवण्यासाठी आपण त्यावर अवलंबून असतो. जेव्हा आपण ग्रहाचा नाश करतो, तेव्हा आपण पर्यावरण, आपले आरोग्य आणि आपल्याला जगण्यास मदत करणाऱ्या इतर गोष्टींचा नाश करू लागतो.
पृथ्वी मातेच्या हक्कांचा जाहिरनामा संयुक्त राष्ट्रव्दारा घोषित केला आहे, त्यात म्हटले आहे की, मला आणि सर्व प्राण्यांना जन्मजात हक्क आहेत, जीवन, अस्तित्व, आदर आणि सातत्य स्व-नियमन करणारे आणि परस्परसंबंधित प्राणी म्हणून त्यांची ओळख आणि अखंडता राखणे. पाणी, शुद्ध हवा, आरोग्य आणि दूषिततेपासून मुक्त राहण्यासाठी. अशा प्रकारे या घोषणाप्रमाणे जगातील सर्वच मुळनिवासी आदिवासी लोक माता प्रुथ्वीची आपली आई म्हणून पूजा करतात.
(भाग-२)
आदिवासी निसर्ग संस्क्रुतीचे तत्वज्ञान—
-लटारी मडावी
(नागपूर)
संदर्भ —
१) सिंधु संस्क्रुती ऋग्वेद हिंदु संस्क्रुती — प्र. रा. देशमुख (यवतमाळ)
२) बंडखोरीचे तत्वज्ञान
(मराठी भांषातरीत)
३) The Rebel –
(Albert Camuc)
४) Mother Earth Law (UNO Declaration)
५) मुळरहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात-
६) ईंटरनेटवर प्रदिद्ध झालेले विविध लेख