- 25
- 1 minute read
सिद्धार्थ गौतम बुद्धाचे पहिले गुरू आदिवासी सांख्य तत्वज्ञानी ”आलार कालाम” महान योगी होते.
आलार कलाम हे आदिवासीच्यां कालाम गणातील एक महान सांख्य तत्वज्ञानी गुरु होते. आलार कालामाच्या विद्वत्तेला अनुसरुन, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी, आपला पहिला गुरु बनवून त्याच्यांकडून योगविद्या आणि सांख्य तत्वज्ञान ग्रहण केले. अलार कलाम हे बुद्धाच्या समकालीन तत्त्वज्ञ आणि महान योगी होते. ते सांख्य तत्वज्ञांनाचे जाणकार होते. पाली ग्रंथानुसार गौतम बुद्धांचे ते पहिले गुरु होते. आलार कलाम हे कौशल जिल्ह्यात ध्यानाचार्य म्हणून प्रसिद्ध होते. सहा वर्षे त्यांच्यासोबत राहून गौतम बुद्धांनी सांख्य-मार्ग आणि समाधी-मार्गाचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यामध्ये प्राविण्य व प्राविण्य प्राप्त केले.
गौतम बुद्धाच्या काळी सांख्य तत्त्वज्ञानाचा समाजात खूप मोठा प्रभाव होता. तसाच गौतम बुद्धांवरही त्याचा प्रभाव होता. बौद्ध परंपरेनुसार, धम्मचक्कप्पवत्तन सुत्त ही बुद्धांनी ज्ञानप्राप्ती नंतर दिलेली पहिली शिकवण आहे. बौद्ध परंपरेनुसार, बॊध गया मधील नेरंजरा नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ध्यान करत असताना, बुद्धांनी आत्मज्ञान आणि मुक्ती प्राप्त केली. सिद्धार्थ गौतम तपस्वी झाल्यानंतर, ते अलार कलाम यांच्याकडे गेले, जे वॆशाली येथे एक प्रकारचे प्रारंभिक ध्यान शिकवणारे शिक्षक होते. अलार कालामने सिद्धार्थला ध्यान शिकवले, विशेषत: “शून्यतेचे क्षेत्र (आकिंकानायतन) नांवाची ध्यान अवस्थाचे शिक्षण दिले. आलार कलाम यांनी बुद्धांना केवळ सांख्य तत्त्वज्ञानच शिकवले नाही, तर त्यांना ध्यानाची तत्त्वे आणि समाधी मार्गाचेही ज्ञान दिले. सांख्य सूत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, या संपूर्ण ग्रंथात कुठेही देव किंवा दैवी शक्तीचा उल्लेख नाही. अशाचप्रकारे आजच्या आदिवासीच्या विश्वव्यापी निसर्ग तत्वज्ञानाची वॆशिष्ठे ”सांख्य” तत्वज्ञानात सापडतात.
बुद्धत्व प्राप्ती नंतर गॊतम बुद्ध, हे आलार कालाम यांना आपला पहिला शिष्य बनविण्यास यांच्याकडे गेले असता, त्यावेळी आलार कालाम यांचे निधन झाले होते. जर का आलार कालाम हे त्यावेळी जीवंत असते आणि बुद्धाकडून बोद्ध धम्माची दिक्षा घेतली असती तर, आज भारत देशातला प्रत्येक आदिवासी बॊद्धमय झाल्याचे चित्र दिसले असते.
टिप – या ठिकाणी गोंडी धर्माच्या लोकांनी जाणिव पुर्वक (गोंडी) धर्माचा पहिला धार्मिक गुरू आलर कलाम आणि कुपार लिंगोचा बारावा गुरू ठरवून आलाम कालाम यांचा उत्तराधिकारी असल्याचा खोटारडा प्रचार करीत आहे. पारी कुपर लिंगो हे गोंडी धर्माचे संस्थापक असून ते आलार कालाम यांच्या आश्रमात सोबत राहत होते असा खोटा प्रचार प्रचार करीत, आलार कालाम व पारी कुपर लिंगो हे गोंडी धर्माचे संस्थापक असल्याचा खोटा भ्रम निर्माण करीत, लिंगोला कोया पुणेम धर्माचा तत्वज्ञानी असल्याचे ठरवून कुपार लिंगोला गोंडी धर्माचे बारावे धर्मगुरू असल्याचा भ्रम पसरवित आहेत. आलार-कलाम यांनी लिंगोवादाचे तत्वज्ञान (कोया पुणेम) सांख्य तत्वज्ञानाच्या रूपाने सर्वांसमोर मांडल्याचा खोटा प्रसार प्रचार करीत, लिंगो तत्वज्ञानाचे तत्वज्ञान आर्यांनी जवळजवळ नष्ट केले होते, असा चुकिचा ईतिहास मांडण्याचा लाजिरवाणी प्रयत्न करीत आहेत. खरे तर गोंड लोकानी १९८४ मद्ये निर्माण केलेल्या गोंडी धर्माचा व आलार कालामचा काहीही संबध नाही. गोंडी धर्माला कोणतेही तत्वज्ञान नाही. पोतीनिष्ठ साहित्यातून गोंडी धर्माचा संस्थापक बनवून पारी कुपार लिंगोचे नांव दिले हे चुकिचे आहे. वास्तविकता पारी कुपार लिंगो हे दंत कथेतील एक काल्पनील पात्र आहे. आलार कालाम व त्यांच्या आश्रमाचा तथा बुद्ध धम्म आणि कुपार लिंगोचा तिळ मात्रही संबध नाही. बुद्ध काळात व पाली साहित्यात गोंड जमातीचा कोठेही उल्लेख नाही. “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या पुस्तकाचे लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी, गोंडी धर्माचे गुरु लिंगो असल्याचा कोठेही उल्लेख केला नाही. मात्र गोंडी साहित्य लिहीणारे लोक आपल्या खय्रा ईतिहासाला दडपळून इत्तर धर्माचे साहित्याची चोरी करीत, नेहमी प्रमाणे आपल्या पोतिनिष्ठ साहित्याला उजागीर करण्याचा खोटारडा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे ईतिहासाची चोरी करुन पोतिनिष्ठ गोंडी धर्माला उजागीर करण्यापेक्षा गोंड लोकानी बुद्ध धर्माचे आचारण केल्यास बरे राहील. आदिवासी वाचकानी व लेखकानी याबाबत सावध झाले पाहीजे.)
– लटारी मडावी
नागपूर