शेयर बाजारातील निर्देशांक वधारलेले राहत असतील म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था खूप चांगले काम करत असली पाहिजे असे समीकरण आपल्या डोक्यात बसविले गेले आहे. ते चुकीचे आहे.
दारू पिऊन झिंगलेल्या माणसाला आपण सरळ रस्त्यावरून चालत आहोत की कड्यावर उभे आहोत याचे भान नसते.
तसेच काहीसे शेयर मार्केट निर्देशांकांचे सुरू आहे.
सामान्य नागरिक म्हणून आपण बघत होतो वाचत आहोत की जागतिक व्यापार, भूराजनैतिक संबंध, विनिमय दर आणि अर्थात अर्थव्यवस्था.. या सर्वांसमोरील आव्हाने गंभीर बनत आहेत. हे दीर्घकाळ सुरू राहू शकते.
जगातील सर्व प्रमुख शेअर निर्देशांकांना त्याची काही पडलेली दिसत नाही.
व्हॉलॅटिलिटी इंडेक्स (VIX) किंवा ज्याला भय निर्देशांक म्हणतात…. तो भारतामध्ये १०.५ म्हणजे ऐतिहासिक निचांकावर आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना भविष्याबद्दल फार भय किंवा अनिश्चितता वाटत नाहीये.
याचे खरे आर्थिक विश्लेषण असे आहे की यापैकी अनेक निर्देशांक…त्या शेअर बाजारातील संख्येनं कमी पण आकाराने महाकाय कंपन्यांच्या शेअर वर आधारित असतो.
उदा सेन्सेक्स मोठ्या ३० कंपन्यांवर तर निफ्टी ५० मोठ्या कंपन्यांवर
निर्देशांकातील या सर्व कंपन्या अजूनच मोठ्या होत आहेत भविष्यात अजून मोठ्या होणार आहे. त्याचे प्रतिबिंब सेन्सेक्स आणि निफ्टी वधारण्यामध्ये पडत आहे.
त्या देशातील एम एस एम इ किंवा शेती किंवा असंघटित क्षेत्र त्याचवेळी ( त्याचवेळी!) प्रचंड आर्थिक वाचितवस्थेतून जात असले तरी या मोठ्या कंपन्यांना म्हणून सेन्सेक्सला ओरखडा देखील उठणार नाहीये.
आपला मुद्दा वेगळा आहे. शेयर बाजारातील निर्देशांक वधारलेले राहत असतील म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था खूप चांगले काम करत असली पाहिजे असे समीकरण आपल्या डोक्यात बसविले गेले आहे. ते चुकीचे आहे.
निर्देशांक वाढत राहून त्या देशातील कोट्यावधी सामान्य नागरिकांचे दैनंदिन राहणीमान हलाखीचे असू शकते. प्रत्येकाने आपले आणि आजूबाजूच्या लोकांचे भौतिक प्रश्न कमी झाले आहेत व गंभीर बनले आहेत याची मनामध्ये नोंद घ्यावी. आणि आपले मत बनवावे