स्टॉक मार्केट खरे कसे काम करते?”

स्टॉक मार्केट खरे कसे काम करते?”

स्टॉक मार्केट खरे कसे काम करते?”

“सेन्सेक्स / निफ्टी ऐतिहासिक उंचीवर पोचले” या बातमीवर माझा एक मित्र अपेक्षेप्रमाणे उद्गारला

 “सगळी सट्टेबाजी आहे, आणि त्याच्या हेडलाईन्स बातम्या बनत आहेत हे वाईट आहे”
 
मी त्याला विचारले की कोण आहेत हे सट्टेबाज , तुला काय वाटते ? तो थोडा गडबडला 
 
मी त्याला अजून खोदून विचारले की हींदी चित्रपटातील नाईट क्लब मधे सिगारचा धूर सोडत सोडत कॅबरे पहात जुगार खेळणारे ? कोणी मटका किंग ? पत्याच्या अड्यावर दीवस रात्र पडलेले लोक, गॉगल घालून घोडांच्या रेस वर पैसे लावणारे ? दलाल स्ट्रीटवरील ब्रोकर ? कोण आहेत जे स्टॉक मार्केटमध्ये सट्टा खेळतात. 
 
मग मी त्याला समजावून सांगितले तुझ्या माझ्या , देशातील नागरिकांच्या बचती एकत्र करून, वापरून, मध्यमवर्गीय घरातील उच्चशिक्षित मुलांना ट्रेन करून वित्तीय क्षेत्रातील ही सट्टेबाजी चालते
आपण आपल्या बचती बँकामध्ये ठेवतो , त्यातील काही भाग इतरांना शेयर्स खरेदी करण्यासाठी बँका कर्जरूपाने देतात, आपल्या म्युच्युअल फंडातील बचती तर मोठ्याप्रमाणावर स्टॉक मार्केटमध्ये जतात, त्याशिवाय विमा , पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड देखील सरकराने घालून दिलेल्या मर्यादेत गुंतवणूक करतात. कही वर्षापूर्वी मुंबई, अहमदाबाद अशा मोजक्या शहरांमध्ये हे होते. आज देशातील शेकडो मध्यम, लहान शहरात स्टॉक मार्केट पोचले आहे. 
 
दोन बदललेल्या मोठ्या गोष्टी नोंदवल्या पाहिजेत 
 
एक) देशातील दहा टक्के कुटुंबांची श्रीमंती वेगाने वाढत आहे. मिळणाऱ्या पैशाचा ते घेऊन घेऊन उपभोग घेणार तरी किती ? त्यामुळे त्यांचा अतिरिक्त पैसा स्टॉक मार्केट मध्ये येत असतो. संपत्ती / इन्कमचे जेवढे केंद्रीकरण होईल तेवढे स्टॉक मार्केटला उधाण येईल 
 
दोन) वित्त क्षेत्राच्या जागतिकीकरणानंतर आता फक्त भारतात तयार झालेल्या बचती स्टॉक मार्केटमध्ये येत नाही. विकसित देशातील भांडवल देखील येते. 
 
वॉल स्ट्रीटपासून ते आपल्या बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील इमारती मधे उच्चशिक्षित, अनुभवी तरुण दररोज कोटांवधी रुपयांची उलाढाल करतात. जगभर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील, वित्तीय क्षेत्रावर परिणाम करू शकणाऱ्या घटनांचा मागोवा ठेवतात 
 
वित्तक्षेत्रातील सट्टेबाज म्हणजे तुमच्या आमच्या घरातील, नात्यातील, मित्रपरिवारातील उच शिक्षण घेतलेले कोट्यवधी रुपयांचे विविध फंड सांभाळणारे फंड मॅनेजर्स आहेत 
 
या घटनांत अर्थात दलीतकांड, वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना,शेतकॅयांच्या /गरीबांच्या आत्महत्या या घटना मोडत नाहीत. कारण या घटना वित्तीय क्षेत्रावर ओरखडा देखील उमटवू शकत नाहीत. 
 
सट्टेबाजी हि त्या तरुण प्रोफेशनल्सची प्रवृत्ती नसून त्यांच्यावर ज्या भांडवलाला “मॅनेज” करण्याची “व्यवस्थापन करण्याची” जबाबदारी टाकलेली असते त्या भांडवलाची अंगीभूत प्रवृत्ती आहे. 
 
एखादा आपल्यातील सदशील चारित्र्याचा, रॅडिकल लेफ्टिष्ट जरी त्यांच्या जागेवर बसवला तरी त्याला सट्टेबाजीच करावी लागेल किंवा नोकरी सोडावी लागेल.
 
व्यक्तींना लेबले लावायची सवय बदलून सिस्टिम , प्रणाली समजून घेवूया. 
 
सर्वात महत्त्वाचे. जुगाराच्या अड्ड्यावर जुगाऱ्यांनी एकमेकांचा खून केला तरी आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. पण स्टॉक मार्केटवर काहीही झाले तर आपल्यावर परिणाम होणार. कारण ती लोक आपल्या बचती वापरून सट्टा खेळतात. 
 
संजीव चांदोरकर 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *