• 234
  • 1 minute read

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविनारी काँग्रेस जात निरपेक्ष आहे काय ?

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविनारी काँग्रेस जात निरपेक्ष आहे काय ?

काँग्रेस नेहमी स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणते पण, त्यात सत्यता आहे काय? कारण त्यांनी भारतभर जतीचेच राजकारण केलं आहे. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यातील उच्च आणि धनदांडग्या जातींच्या हातात सत्ता दिली. जसे पंजाब हरियाणात जाट, उत्तर प्रदेशात ठाकूर, महाराष्ट्रात मराठा इत्यादी. स्वातंत्र्या नंतर लोकशाहीचे समजिकरण करून भारताचे सामाजिक भविष्य सुरक्षित करायचे सोडून जात आणि सत्ता याचे बंध मजबूत करण्याचे काम काँग्रेसने केले. महाराष्ट्रात तर त्यांनी कायम खालच्या जातींना उपेक्षित ठेवण्याचे काम केले. मुस्लिम समाजाला तर फक्त जातीयवादी शक्तीची भीती घालून मते मिळविण्या शिवाय काँग्रेसने काय केले ? मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही. एक उमेदवार मुस्लिम दिला पण तो प्रकाश आंबेडकर यांना पाडण्यासाठी. आताही वंचित बहुजन आघाडी ला बदनाम करण्याचे कारण काय ? तर, उपेक्षित सत्ता मिळायलाच नको. महविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतः जागा वाटण्यात धन्यता मानत होते पण, बैठकीच्या बाहेर वंचित मुळे सगळे अडले आहे असे वातावरण निर्माण करत होते. हे सगळे वंचित समूहांना सत्ता मिळू नये म्हणून चालू आहे. प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेतले आणि त्यांचे उमेदवार निवडून आले तर ते येणाऱ्या निवडणुकीत अठरा पगड जातीला उमेदवारी देतील आणि सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करतील हे सगळ्यात मोठ काँग्रेसच दुःख आहे. यांचे अर्धे नेते ई डी क्या रडारवर आहेत. ते आतून काय भूमिका घेतील याची शास्वती नाही. पण बदनाम वांचीतला करायचे. काँग्रेसच्या प्रस्तापित घराण्याच्या बाहेर सत्ता गेली नाही पाहिजे याची ते दक्षता घेत आहे. या प्रस्तापित घराण्यांनी स्वतःच्या समाजाचं भलं करता आल नाही. म्हणून जारंगे पटलासारख्या सामान्य माणसाला आंदोलन उभे करावे लागले. त्यांना समाजातील गरीब लोकांनी लाखोच्या संख्येने पाठिंबा दिला. आताही काँग्रेसचे उमेदवार पाहिले तर एकही सामान्य कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला नाही. यातून काय अधोरेख होते? मुस्लिमांना प्रतिनिधित्व नाही , दलीत, उपेक्षित लोकांना प्रतिनिधित्व नाही. यातून काय निष्कर्ष निघतो ? काँग्रेस फक्त पुरोगामी पणाचा आणि जात निरपेक्ष पणाचा आव आणून त्यांचे मते घेते. सत्ता मात्र उच्च जातीय धनदांडग्या च्या हातात देते.
आम्ही आता काँग्रेसच्या दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. आमची मते वाढवू, तुमच्या आणि संविधान विरोधी सक्तीच्या विरोधात लढू आणि जिंकू सुद्धा!

-शांताराम पंदेरे

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *