ओबीसी,एसटी,एससी समूहाने ज्यांचे जीवन सुखदायक आणि आरामदायक बनविले त्याच जातंकवादी लोकांनी ओबीसी,एसटी,एससी समूहाला बहिष्कृत करून त्यांचे हक्क आणि अधिकार हिसकावून घेतले.
हजारो वर्षापासून चालत आलेल्या जातीव्यवस्थेची फार मोठी किंमत भारतीय समाजाने चुकवली आहे, हे तुम्हाला ‘ हिंदुत्व मुक्त भारत की और ‘हे पुस्तक वाचल्यानंतर स्पष्टपणे समजून येईल.
उत्पादन करणाऱ्यांचे शिल्प, कला, कौशल्य आणि आपल्या कामाच्या प्रती इमानदारी आणि निष्ठा, स्त्री-पुरुष यांच्या सहकार्याने औषधोपचार, आरोग्याची काळजी, शेती करणे, धातू निर्मिती इत्यादींचे ज्ञान असलेल्या लोकांमुळे उच्च जातीच्या लोकांचे जीवन सुखद आणि आरामदायक बनले आहे.
परंतु याच्या मोबदल्यामध्ये त्यांना काय मिळाले ? तर त्यांचे पुन्हा जबरदस्त शोषण करून अपमानाच त्यांच्या वाट्याला आलेला आहे. याचा परिणाम असा झाला की उच्च जातीच्या लोकांनी(खरं म्हणजे यांना उच्च म्हणणे हे योग्य नाही. हे लोक अतिशय नीच विचाराचे लोक आहेत की जे मानवाला मानव समजत नाही) अधिक शोषण करायला सुरुवात केली आणि हही शोषण करणारी जमात परजीवी बनत गेली, दुसऱ्याच्या श्रमावर जगण्याची यांना सवय होत गेली.
शोषक वर्गाने किंवा या जातीयवादी लोकांनी त्यांच्या अत्याचाराला योग्य ठरविण्यासाठी खोट्या आणि काल्पनिक गोष्टीचा समाजामध्ये प्रचार केला आणि त्याला सत्य सिद्ध करण्यासाठी धर्मग्रंथांची रचना केली. जगातील इतर धर्मांनी जगातील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या धर्मशास्त्रांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपले योगदान दिले आणि येथे भारतामध्ये मात्र हिंदू धर्माच्या प्रतिगामी धर्म ग्रंथांनी समाजाच्या विकासासाठी उत्पादन करणाऱ्या लोकांना केवळ विकासापासून वंचितच केले नाही, तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांना निराश करून समाजातून बहिष्कृत केले आणि हे आज सुद्धा चालू आहे.
फरक केवळ इतकाच झालेला आहे की शोषक वर्गाने आणि परजीवी जातीयवादी जमातीने आता भांडवलशाही नवउदारीकरणाचा बुरखा ओढून घेतला आहे. यासोबतच उत्पादन करणाऱ्या ओबीसी,एसटी,एससी यांच्यामध्ये असंतोष वाढत आहे आणि ते आता प्रतिहल्ला करीत आहे.