• 56
  • 1 minute read

ही माणसे आपली नाहीतच – – –

ही माणसे आपली नाहीतच – – –

"भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यांच्यातील संघर्षाशिवाय दुसरे तिसरे काही नाही."

            आमच्या बालपनात भाषा रचना नावाचे एक कथानक रूपात पुस्तक ॲडीशनल येत असे . तो क्रमिक पुस्तकाचा भाग नव्हता . त्यात बऱ्याच कथानक रूपात गोष्टी होत्या . मोठ्या प्रमाणात मनुवादी विचारांच्या ‘ काही धर्मान्ध तर काही काल्पनिक असत . ग . वि . हिवसे यांचे संपादन होते .
त्यात एक कथा होती . कदाचित आपण वाचली असेलही ‘ पन पुन्हा तीला रिपीट करू – – –
एका विहरित गंगदत्त नावाचा बेडुक राहात असे . त्याच्या सोबत इतर परिवार सुद्धा रहात असत . काही कारणास्तव गंगदत्त चे इतर बेडकांशी जमेना .
तेव्हा तो वर विहरीच्या तोंडीवर गेला . वर त्याला एक साप दिसला . सापाने गंगदत्त ला भक्ष करण्याचे विचार असतांना ‘ गंगदत्त म्हनाला तुला शिकार पाहिजे असेल तर दररोज तुला शिकार मिळत जाईल . मला खाऊ नकोस . माझ्या सोबत विहरीत दडुन रहा ‘ मी एक एक बेडकांना फसवुन तुझ्या कडे आनत जाईल . तेव्हा तुला खादय मिळेल . ठरल्या प्रमाणे गंगदत्त दररोज एका बेडकाला फसवुन सापा कडे आनायचा , साप चुपचाप बेडकाला गटकावत असे . असे बरेच दिवस झाले . शेवटी विहरीतील बेडकं संपून गेली . गंगदत्त चा असणारा परिवार सुद्धा सापाचे भक्ष ठरला . शेवटी सापा ला खाण्यास काहीच शिल्लक राहीले नाही . तो गंगदत्त त्ना म्हनाला ” आता मला खाण्यासाठी काहीच शिल्लक नाही ‘ तु माझी खूप सेवा केलास , पण माझा नाईलाज आहे , भुख महत्वाची आहे त्या मुळ मी तुला सुद्धा खात आहे ” . म्हनुन गंगदत्त ला सुद्धा खाऊन टाकले .
 
     या मधुन तात्पर्य काय समजते .
१) साप हा आपला शत्रु असतो .
२ ) त्याचे कार्य फक्त भक्षासाठी असते .
3 ) तो आपल्याला सुरक्षा देतो ‘ असे आमीश दाखवतो .
४ ) ज्याला आमिश दाखवतो तो सुद्धा त्याचाच शत्रु असतो व त्याचे भक्ष असतो .
५) सर्व संपल्या वर शेवटी तो जो त्याच्या सोबत असतो त्याला ही संपवतो .
 
    मुख्य विषयाकडे वळुया
    
 ५ ‘ ६ दिवसां पूर्वी जोगेंद्र कवाडे यांच्या मुलानी श्री गोलवलकर या कट्टर हिंदुत्ववादी , मनुस्मृती वादी व्यक्ती  जाहीर शुभेच्छा फुले शाहु बाबासाहेब यांचे फोटोसह प्रकाशित केल्या . या वर बऱ्याच निशेध चर्चा रंगल्या . 
 
 या अगोदर सुद्धा  श्री आठवले नावाचे गृहस्थ बाबासाहेबांचे नाव घेऊन वर्तमान मनुस्मृती वादी व्यवस्थापकाला मदत करण्या साठी एकजिव झालेले आहेत .
 
 असे लोकं स्वार्था साठी ‘ काहीतरी मिळवण्या साठी त्यांच्या विचारांवर कार्य करतात .
याचा उद्देश हा सामाजिक विचारांना गिळंकृत करणाऱ्या विचारधारे सोबत कार्य करतांना 
त्यांची परिस्थिती सुद्धा गंगदत्ता प्रमाणेच असते .
असे गंगंदत्त समाजा मध्ये ठिकठिकाणी निर्माण आहेत .
या पासुन समाजाने सावधपणे वागणे कधीही चांगले राहील .
बाबासाहेब आंबेडकर अशा मनुवादी विचारधारेला मदत करणाऱ्यांना ” खुसमस्करे ” म्हनत असत . कांशिराम साहेब यांनाच ” चमचे ‘ दलाल ‘ पिछलग्गु ” ‘ असे म्हनतात .
 
 विरोधी विचारधारेला मदत करणारे लोकं किंवा विरोधी विचारधारा आपल्याला मदत करते ती का ? करते याबद्दल सुद्धा सावधानता  समाजानी बाळगावी .
 ” The History of India is nothing but the mortal conflict between buddiSam against Brahamnisam . ” अर्थात भारताचा इतिहास हा बुद्धीज्म विरुद्ध ब्राम्हनिजम चा जिवघेणा संघर्ष आहे . ( Read Revolutio and Canter Revolution )
 
     जे लोक आपले आहेत हे जर आपण समजतो हा गैरसमज आहे . हे लोक त्यांच्या साठी काम करतात . ते समाजातील गंगदत्त आहेत . 
ते आपले लोकं नाहीत
याची जानिव प्रत्येकाला असावी असे वाटते .
 
राजकिय साक्षरता महत्वाची असते , कोण केव्हा कुठे आपणाला / समाजाला डुबवु शकतो या बद्दल जागृत असावे .
 
    नागरिक जागृत अभियान
चालवुन समाज बुद्धीजिवी साक्षर व्हावा , असेच वाटते .
 
       संजय वाळके
एम . ए . ( आंबेडकर थॉट )
नेट (बुध्दीज्म ‘ जैन ‘ थॉट्स and पिस स्टडीज )
        ब्रम्हपुरी
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *