पुर्वी माणस अडाणी होती पण त्यांचे लोक शिक्षण चांगले होते .अनेक मृहणी त्यांनी करुन ठेवल्या त्या आजही तंतोतंत लागू होतात .देशाला स्वातंत्र्य मिळाले लोक सु-शिक्षित झाले .आणखी एक म्हण त्याच बरोबर आठवली ” सगळी केस पिकली ! पण अक्कल नाही शिकली ” एक हैद्राबाद गॅझेट चा विषय जरांगेंनी काढला तर लगेच लोक आप आपल्या जाती त्या शोधायला लागले व त्याचाच आधार घेत बंजारा समाज्याला त्या गॅझेट च्या आधारे शेड्युल ट्राईब्ज मध्ये म्हणजे एसटी मध्ये टाका अश्या मागण्या होऊ लागल्या आहेत बर वरील चर्चेत हरिभाऊ राठोड व संदेश चव्हाण हिरिहिरीने बोलत आहेत मुळात हे दोन्हीही लोक स्वतःला विमुक्त भटक्यांचे नेते बोलुन घेतात पण यांचा हेतु फक्त बंजारा समाजाचे हित साधणे इतकेच .बर ते ही मान्य .या लोकांना देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो इतके माहित नसावे ही अतिशय गंभीर आहे .इंग्रजी राजवटीत प्रांतिक गॅझेट केवळ त्या प्रांताशी तात्पुरती परिस्थिती जाणून घेण्यासाठी होती .माझा एक अनुभव असा माळी ,धनगर ,वंजारी हे बऱ्याच वेळा ओबीसी विषयी कळवळा दाखवतात पण त्यांची निष्ठा अंतिमतः स्वजातीच्या हितासाठी केंद्रित होते .धनगर ओबीसी वर अन्याय होऊ देणार नाही म्हणतो आणी ” धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे असे आग्रही होतो तेच बंजारा समाज्यातील नेते करताना दिसतात .बोलताना विमुक्त भटक्या जमाती विषयी बोलायचे आणी तुनतुने बंजारा हिताचे वाजवायचे यातुन ओबीसी प्रवर्गातील इतर जातींनी म्हणजे माळी ,धनगर ,वंजारी वगळुन व विमुक्त भटक्या जमातींनी बंजारा वगळुन संविधानिक मार्गाने आपल्या वाट्याचा हिस्सा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा .यांच्या भरवश्यावर काहीच होणार नाही ते ओबीसी अथवा विमुक्त भटक्यांच्या नावावर तुंबड्या भरण्यासाठी तयारच आहेत प्रश्न आहे तो आम्ही सावध होण्याचा तोपर्यंत ओबीसी मधील बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी व मुळ विमुक्त भटक्या जमाती मधील बंजारा वगळुन उर्वरित 41 जातींनी आपला एल्गार पुकारणे आवश्यक आहे .:-