• 14
  • 1 minute read

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

हुजरेगिरी करणाऱ्यांना प्रतिभावंत म्हणता येणार नाही !


– डॉ. प्रकाश मोगले

भाषणातील महत्त्वाचे मु‌द्दे :

* संमेलनाच्या आयोजकांनी स्पष्टपणे ‘आंबेडकरी साहित्य संमेलन’ असा शब्दप्रयोग केला आहे.
* 45 वर्षे बहिष्कृत समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचले. मूकसमाज आपल्या व्यथा बोलू लागला. यातून नव्या संस्कृतीचा नव्या साहित्याचा उदय झाला. त्याची प्रेरणा बाबासाहेबांचे विचार व कार्य होते. त्यामुळे या प्रवाहाला आंबेडकरी साहित्य म्हणणे आधिक सार्थ होईल.
* समाज, माणसे दलित असू शकतात. पण साहित्य कधीही दलित असू शकत नाही. पाणतावणे, ढसाळ, लिंबाळे आदी साहित्यिकांनी दलित साहित्य शब्दाचा आग्रह धरला. तो चुकीचा आहे.
* साहित्य व संस्कृती यांचा घनिष्ठ संबंध असतो. भारतातही दोन संस्कृती नांदत आहेत. एक ऐतखाऊंची आणि दुसरी श्रमिकांची. या दोन संस्कृतीत संघर्ष आहे. या संघर्षाच्या इतिहासाला बाबासाहेब, क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास असे संबोधतात.
* समतावादी संविधान व विषमता आधारित धर्मग्रंथ एकत्र जाऊ शकत नाहीत. समता प्रगतीचा तर विषमता राष्ट्रविघातक मार्ग असल्याने आपण कुणासाठी लिहितो व जे लिहितो ती सांस्कृतिक कृती आहे, या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे.
* प्रतिभावंतांना अवलोकन, आकलन आणि अभिव्यक्ती या तीन गोष्टींसाठी मेहनत घ्यावयाची आहे. जीवनानुभवासोबत जगातील उत्तमोत्तम साहित्याचे वाचन लेखकांनी केले पाहिजे.
* कवी, कलावंत यांनी राजकारण केले पाहिजे. सक्रिय राजकारणात नसलात तरी राजकारण समजून घेतले पाहिजे. राजकीय विचारधारा व संघटनांवर प्रतिभावंतांनी पाळत ठेवली पाहिजे.
* आपल्या समतावादी राजकारणाविरोधात काम करणाऱ्या पक्ष व संघटनांविरोधात लेखक, कवींनी आघाडी उघडली पाहिजे.
* लेखण्या मोडा तलवारी हाती घ्या ! हा विचार विधायक नाही. नवनिर्मितीचा नाही.
* देश नागविणाऱ्या ‘राजा’पुढे हुजरेगिरी करणारे प्रतिभावंत कसे असू शकतात ?
* अशा नाठाळांच्या माती काठी हाणायचे सोडून लाचार साहित्यिक दिल्लीला गेले. तिथे अहंकारी राजाने संमेलनाअध्यक्षांनाच कोपऱ्यात उभे केले. लोचट अध्यक्ष गुमान उभ्या राहिल्या !
* याच अहंकारी राजाच्या सेन्सॉर बोर्डाने ‘मी नथुराम गोडसे बोलतोय !’ या नाटकाला परवानगी दिली. पण नामदेव ढसाळांवरील सिनेमाला परवानगी नाकारली.
* फुले आंबेडकरचे नाव घेणारे पण सांस्कृतिकदृष्ट्या मरेपर्यंत हिंदूच राहणारे कधी सार्वजनिक सत्यधर्म व बुद्ध धम्माकडे वळत नाहीत. यांचे पुरोगामीत्व नीट तपासून घेतले पाहिजे.
* हिंदूंच्या दहा अवतारात बुद्ध असेल तर हिंदूंच्या देवघरात बुद्ध का नाही ? हा तारा भावाळकरांचा प्रश्न अवतार न मानणाऱ्या बुद्धालाच देवघरात बसविणारा आहे.
* गावागावात, भावाभावात, हिंदू मुस्लिमात वैरभाव शासकीय पातळीवरून निर्माण केला जात आहे. प्रेमभावना, शांतता व सलोखा यासाठी आपण लेखण्या झिजवूया.
* समारोप त्यांनी साहिर लुधियानवींच्या काव्यपंक्तींनी केला
ख़ून अपना हो या पराया हो
नस्ल-ए-आदम का ख़ून है आख़िर
जंग मशरिक़ में हो कि मग़रिब में
अम्न-ए-आलम का ख़ून है आख़िर

संकलन : किशोर मांदळे

0Shares

Related post

गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

यह सच है की….गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…..!        ये सच…
भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको, विधानसभेत मागणी

भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको, विधानसभेत मागणी

शासकीय दंत महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ.दातारकर यांना बडतर्फ करा – डॉ. नितीन राऊत भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ…
कुंभमेळा व शाही स्नान प्रथेची सुरुवातच बादशहा अकबराने केली

कुंभमेळा व शाही स्नान प्रथेची सुरुवातच बादशहा अकबराने केली

मुघल बादशहाच्या दरबारातील लाभार्थीच आज कबरी खोदण्याची भाषा करतात !           मरणकळा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *