• 31
  • 1 minute read

२०१९ प्रमाणे यावेळी ही आतंकवादी भाजपला मदत करायला देशात घुसणार…?

२०१९ प्रमाणे यावेळी ही आतंकवादी भाजपला मदत करायला देशात घुसणार…?

देशात ३०० आतंकवादी घुसणार असल्याची खबर भारत सरकारकडे नसताना व असली तरी त्याबाबत सुरक्षा यंत्रणेने जनतेला सतर्कतेचा इशारा दिलेला नसताना हे आतंकवादी घुसणार असल्याची खबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याकडे कुठून आली व त्यांना ती कोणी दिली ? याची चौकशी होणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. भारत सरकारच्या अधिकृत सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणी नड्डा यांना ताब्यात घेऊन विचारपूस करणे गरजेचे आहे. आतंकवादाने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नड्डाचे हे विधान अतिशय गंभीर आहे. हे आतंकवादी अतिशय हुशार आहेत. ५६ इंचची छाती असलेल्या मोदीच्या उरावर पुलवामा घटनेतील आतंकवादी गेली ५ वर्ष उलटून गेली तरी थयथया नाचत खुलेआम फिरत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आतंकवादी संघटन असल्याची चर्चा नेहमीच होत आली आहे. त्यामुळे जगभरातील आतंकवादी संघटनांशी संघाचे संबंध असल्याची ही चर्चा सतत होत असते. तसेच संघ व नड्डाचे ही घनिष्ट संबंध आहेत. या संबंधातून तर नड्डाला ही खबर मिळाली नाही ना ? याचा तपास करणे देश हिताचे आहे.
जगभरातील आतंकवादी संघटना या काही रिकामटेकड्या नाहीत. त्या धार्मिक आधारावर उभ्या असल्या तरी धर्माचा त्या केवळ वापर करतात. आतंकवादी संघटना म्हणजे मुस्लिम संघटना असे वातावरण देशभर निर्माण करण्याचे काम भारतीय मिडिया व संघ परिवाराने उभे केले आहे. त्यावरच भाजपचे सर्व राजकारण उभे आहे. या सर्व संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुपाऱ्या घेतात. अन् जगभरातील राज्यकर्तेच त्यांना सुपाऱ्या देतात. देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या आतंकवाद्यांना कुणी सुपारी दिली आहे का ? त्यामुळे ३०० आतंकवादी देशात घुसणार आहेत ? याचा तपास झाला पाहिजे.
देशात भाजपची सत्ता असल्यावर आतंकवादी देशात घुसणार नाहीत, असे तर होणेच नाही. मोदीला दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यात पुलवामाच्या घटनेचा रोल महत्त्वाचा राहिला आहे. एक नाही तर 40 जवानांना त्यासाठी शहादत द्यावी लागली आहे. 40 जवानांच्या पत्नींना आपले मंगळसूत्र मोदीच्या सत्तेसाठी कुर्बान करावे लागले आहे. त्यामुळे मोदीने निवडणुकीत मंगळसूत्र आणले आहे. विकासाचा मुद्दा, हिंदू – मुस्लिम, राम मंदिर हे सारे मुद्दे फेल ठरल्यावर भाजपने आता ही आतंकवाद्यांची साथ घ्यायची ठरविले आहे. अन हा मुद्दा निवडणूक प्रचारात आणून आपली औकात दाखवली आहे. भाजपचा ४०० पारचा आकडा पार करण्यासाठी 300 आतंकवादी देशात घुसणार आहेत. एक जादा नाही की एक कमी नाही. 400 पार प्रमाणे 300 चा आकडा फिक्स आहे. जणू काही या आतंकवाद्यांनी संघ व भाजपशी करार केला आहे.
महात्मा गांधी यांच्या हत्येपासूनच संघ हे आतंकवादी संघटन असल्याची चर्चा जगभर आहे. गेल्या तीन दशकात भाजपने देशभरात बॉम्बस्फोटासारख्या घटना घडवून आणल्या आहेत. संघ परिवाराशी संबंधित अनेक संघटनांची नावे ही या संदर्भात तपास यंत्रणांच्या माध्यमातून समोर आली आहेत. अतिशय कावेबाजपणे संघ व परिवाराने बॉम्बस्फोट घडवून आणले व त्यात मुस्लिम तरुणांना गुंतविले हे ही आता लपून राहिलेले नाही. हेमंत करकरे यांच्या हत्येनंतर माजी पोलिस महासंचालक एम. एस. मुश्रीफ यांनी पूराव्यासह ” हु किल्ड करकरे ‘ हे पुस्तक लिहून संघाचा असली चेहरा जगासमोर आणला आहे. त्याशिवाय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून भूमिका ही दलित, मुस्लिम विरोधी म्हणजे संघाच्या अजेंड्याला अनकुल राहिली असल्याची चर्चा सतत राहिली आहे. आज भाजपने मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याने हे सिद्ध झाले आहे. संघ, संघ परिवार, भाजप, अन् उज्ज्वल निकम, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, पुरोहित यासारखे अनेक चेहरे आतंकवादाला खतपाणी घालताना दिसतात.
त्याशिवाय देशाच्या सुरक्षा संबंधातील अनेक गुपित शेजारी राष्ट्रांना देणारे जे लोक पकडले जात आहेत. त्यांचे संबंध सरळसरळ संघाशी असल्याचे ही सिद्ध होत आहे. त्याशिवाय जगभरातील अनेक खतरनाक संघटनांशी संघाचे संबंध असल्याचे आरोप ही सबळ पूराव्यानिशी अलिकडच्या काळात होत आहेत. ते उगीचच होत नाहीत. या सर्व गोष्टी पाहिल्यावर २०१९ प्रमाणे यावेळी लोकसभा निवडणुकीत हे आतंकवादी भाजपला मदत करायला येतील, अशी उघड चर्चा देशात सुरु आहे. ही चर्चा उगीच होत नाही. हेच नड्डा यांनी ३०० आतंकवादी देशात घुसणार हे विधान करून सिद्ध केले आहे.


– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *