- 56
- 1 minute read
२ मार्च २०२४ रोजी उल्हासनगर मध्ये झालेल्या “निर्भय बनो” सभेचा इतिवृत्तांत…
सर्वप्रथम एक गोष्ट नीटपणे सर्वांना कळावी की या सभेचे आयोजक महाविकास आघाडी आणि घटक पक्ष नव्हते.
तर,
ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मा. श्यामदादा गायकवाड यांनी स्थापन केलेल्या सकल भारतीय समाज नावाच्या अराजकीय संगठनेच्या च्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित केला होता.
असे असले तरी या आयोजनात एक कोर कमिटी स्थापन केली होती ज्यात अनेक समविचारी पक्ष संगठना यांना निमंत्रण होते.
कोर कमिटी च्या ३ बैठका झाल्या.
आयोजन समिती पुढीलप्रमाणे होती….
मा. श्यामदादा गायकवाड, महेन्द्र अशोक पंडागळे आणि डॉ. संपत सपकाळ हे सकल भारतीय समाजाचे प्रतिनिधी म्हनून काम पहात होते.
याच सोबत (उ बा ठा गटाचे) राजेश वानखेडे, संदेश सपकाळ, डॉ. जानू मानकर होतें.
काँग्रेस पक्ष आणि त्यांचें मुख्य प्रतिनिधी म्हणून रोहित चंद्रकांत साळवे आणि किशोर धडके होतें.
वंचित बहुजन आघाडी सुद्धा या प्रक्रियेत सहभागी होती याची नोंद घ्यावी,
वंचित चे ठाणे जिल्हा नेते मा. सारंग थोरात साहेब सुद्धा या आयोजन समिती मध्ये होतें.
तसेच ज्येष्ठ पत्रकार मा. किरण सोनवणे हे निखिल वागळे सर आणि माध्यमे यांच्याशी संपर्क करत कोर कमिटी मध्ये होतें.
सभेच्या परवानगी ची जवाबदारी सकल भारतीय समाज म्हणून समन्वयक या नात्याने महेंद्र अशोक पंडागळे म्हणजे माझ्याकडे होती. त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि इतर बाबी मी काटेकोरपणे पार पाडल्या.
सोबतच परवानगी माझ्या नावाने असल्याने त्याची कायदेशीर जवाबदारी सुद्धा माझ्यावरच होती.
यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे निखिल वागळे सरांची सुरक्षा त्याची जबाबदारी संदेश सपकाळ, प्रशांत पवार, अजय जाधव आणि विशाल सोनवणे यांनी पद्धतशीर पार पाडली. इतकंच नाही तर त्यांनी वागळे सरांना सभेच्या ठिकाणी आणले आणि पुन्हा मध्यरात्री घरी सोडवले सुद्धा.
बाकीच्या काळात,
सकल भारतीय समाजाची टीम, सोबत संदेश सपकाळ, अजय जाधव, प्रशांत पवार आणि विशाल सोनवणे यांनी बरीच मेहनत घेतली.
निर्भय बनो सभेच्यासाठी १०,००० पत्रके आणि ५० फ्लेक्स छापले होते.
बाकी सहयोगी पक्षांनी आपापल्या पक्षांचे फ्लेक्स छापून लावले होते.
मा. राजेश वानखेडे यांनी तक्षशिला विद्यालयाचे मैदान आणि कार्यालय निःशुल्क दिले.
तसेच राजेश वानखेडे यांच्यामुळे शाळेच्या १००० विद्यार्थ्यांना पत्रक देता आली जेणेकरून विद्यार्थ्यांच्या घरोघरी पत्रके पोहोचली.
याच सोबत तक्षशिला विद्यालयाचे आखरीखत सवाखंडे सरांचे ह्या सर्व कामात अतीशय मोलाचे योगदान मिळाले हे सुद्धा नमूद केलेच पाहिजे.
प्रशांत पवार यांनी नालंदा शाळेच्या २०० विद्यार्थांना पत्रके दिली.
डॉ. संपत सपकाळ आणि महेंद्र पंडागळे यांनी ज्ञानदीप विद्यालयात ३०० पत्रके दिली.
श्याम दादांचे सहकारी जगन्नाथ ओगले काका, रमेश पळसपगार, विवेक गंगावणे, सागर रोकडे आणि चंद्रशेखर पंडागळे, विवेक ससाणे, अजय जाधव (भीमशक्ती), प्रवीण जावळे, गौतम नरवाडे, गणेश भोसले, अशोक कांबळे, तुषार जावळे यांनी संपुर्ण अंबरनाथ, बदलापूर, नेवाली परिसर येथे महत्वाच्या व्यक्तींना पत्रके आणि मोक्याच्या ठिकाणी फ्लेक्स लावले.
आम्हीं व्यक्तिशः २०० लोकांना वयक्तिक भेटुन निमंत्रणे दिली.
शेवटचे तीन दिवस सर्वांनी पडेल ते काम करून सभा यशस्वी केली.
श्यामदादा आणीं इतर सर्वांनी व्यक्तिशः अनेकांना भेटुन, कॉल करून सभेचे निरोप दिले.
हे सगळ सांगण्याचा उद्देश इतकाच की,
काहीं लोक बोलत आहेतः की,
मी हे केल, मी ते केल, हे सगळ माझ्याच मुळे झालं, आणि मीच आयोजक होतो, माझ्याच मार्गदर्शनाखाली सभा पार पडली.
अश्या चमकेश आणि नक्ली लोकांना आपण नेमक ओळखावं आणि खर कामं कोणी केलं हे आपल्याला कळाव म्हणून ही पोस्ट लिहिली आहे.
बाकि,
या सभेसाठी सकल भारतीय समाजाच्या वतीने लोकांना आर्थिक मदत करावी म्हणून कोणतेही आवाहन कऱण्यात आले नव्हते याची नोंद घ्यावी.
आणि असं काही आपल्याला कळलं असेल किँवा आपण असं काही आर्थिक सहयोग सकल भारतीय समाज्याच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त (श्यामदादा, महेन्द्र पंडागळे, डॉ. संपत सपकाळ) कोणाला दिलं असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबर वर अवश्य संपर्क साधावा हि विनंती.
पुनः एकदा ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार आपण सर्वांनी या देशहिताच्या कामात आपले सहयोग दिले त्याबद्द्ल आपले मनापासून आभारी आहोत. आता खरी लढाई सुरू झाली आहे.
महेंद्र अशोक पंडागळे
समन्वयक
सकल भारतीय समाज
जिल्हा ठाणे.