• 146
  • 1 minute read

४-जून-ची मतमोजणी डोंबिवलीत वाहतुकीत होणार हे बदल

४-जून-ची मतमोजणी डोंबिवलीत वाहतुकीत होणार हे बदल

येत्या-दि:-०४-जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. कल्याण लोकसभेची मतमोजणी डोंबिवलीच्या वै. ह.भ. प.सावळाराम महाराज क्रिडा संकुल परिसरात होणार आहे.या पार्श्वभमीवर-दि:-०४-जून २०२४-रोजी डोंबिवलीतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत पहाटे ०५:००वाजल्या पासून रात्री-०८:००वाजेपर्यंत हे बदल राहतील अशी माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

असे आहेत हे डोंबिवलीतील वाहतूक बदल…

प्रवेश बंद -१)
डोंबिवली स्टेशन,चार रस्ता,टिळक चौक शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम हॉस्पिटल,डोंबिवली पूर्व येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने शिवम हॉस्पिटल येवून उजवीकडे वळून जिमखाना रोड,सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद-२)
सुयोग रिजन्सी अनंतम, पेंढारकर कॉलेज मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर.आर.हॉस्पिटल, डोंबिवली पूर्व येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
ही वाहने आर.आर. हॉस्पिटल येथून डावीकडे वळून कावेरी चौक, एम.आय.डी.सी.मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद-३)
खंबाळपाडा रोड-९०-फुट रस्ता,ठाकुर्ली रोडकडून घारडा सर्कलकडे तसेच विको नाकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग खंबाळपाडा रोड-९०-फुट रस्ता, ठाकुर्ली रोड कडून येणारी वाहने खंबाळपाडा रोड टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद-४)
आजदे गाव आणि आजदे पाडा कमान येथून घरडा सर्कल मार्गे बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना घरडा सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
आजदेगाव आणि आजदे पाडा कमान येथून बाहेर पडणारी वाहने डावीकडे वळून शिवम हॉस्पिटलमार्गे इच्छित स्थळी जातील,

प्रवेश बंद-५)
विको नाका pकडून बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हॉटेल मनिष गार्डन येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
विको नाकाकडून येणारी वाहने हॉटेल मनिष गार्डन येथून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना दि:-०४-०६-२०२४-रोजी सकाळी-०५:००ते रात्रौ २०:००वाजेपावेतो अंमलात राहणार असून ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका,ग्रीन कॉरीडोर,ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *