ॲड. अमोलदादा सावंत यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड – धुळे वकील संघात सत्कार सोहळा संपन्न

ॲड. अमोलदादा सावंत यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड – धुळे वकील संघात सत्कार सोहळा संपन्न

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी ॲड. अमोल सावंत यांची निवड

धुळे, १३ जून २०२५ –(यूबीजी विमर्श)
         संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वकिलांच्या हितासाठी झटणारे, ज्युनिअर व सिनिअर वकिलांचे खंबीर मार्गदर्शक आणि धुळे जिल्हा वकील संघाचे सन्माननीय सदस्य असलेले ॲड. अमोलदादा सावंत यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
                      सत्कार समारंभ दि. १३ जून२०२५ रोजी दुपारी २:०० वाजता जिल्हा वकील संघाच्या हॉल मध्ये पार पडला. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांचाही पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
धुळे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ, संघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील विविध वकिल बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *