• 32
  • 1 minute read

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राजकीय नेत्यांना निमंत्रण

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राजकीय नेत्यांना निमंत्रण

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राजकीय नेत्यांना निमंत्रण

आरक्षण बचाव यात्रेसाठी दिले निमंत्रण

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी खा. अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आ. पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली.

ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. राष्ट्रवादीचे(शरद पवार) प्रमुख शरद पवार यांना आणि मंत्री छगन भुजबळ यांनाही ॲड. आंबेडकर यांनी निमंत्रित केले होते. ॲड. आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

२५ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे. यात्रेची सांगता औरंगाबाद येथे होईल. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे राजकारण सध्या सुरू असून, जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट्ये –

– ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे.
– Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे.
– ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे.
– SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे.
– 100 ओबीसी आमदार निवडून आणणे.
– 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी.

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *