• 230
  • 2 minutes read

अजित पवार, मुंडे अन् आठवलेंची शरद पवारांवरची टीका ही फडणवीसाची चाटूगिरी करणारी…!

अजित पवार, मुंडे अन् आठवलेंची शरद पवारांवरची टीका ही फडणवीसाची चाटूगिरी करणारी…!
बारामती लोकसभा मतदारसंघातून आपली लेक सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी ज्या अवस्थेत शरद पवार झुंज देत आहेत, ते पाहिल्यावर राज्यात व देशात त्यांनी केलेल्या राजकारणाचे विदारक चित्र असे ही असेल हे कुणालाच अपेक्षित नव्हते. अशी ही वेळ आपल्यावर येईल, हे त्यांनी स्वप्नात ही पाहिले नसेल. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करुन यश मिळविण्याचे कसब त्यांच्याकडे नक्कीच आहेत .किती ही आव्हाने असली, तरी ते ही निवडणूक जिंकतील यात शंका ही नाही. आव्हानांना सामोरे जात त्यावर विजय मिळविणे हा त्यांचा स्वभाव आहे. पण त्यांनी ज्यांना ज्यांना सत्तेच्या राजकरणात आणले. सत्तेची अन् मानाची पदे दिली, त्यांनाच पुढे करून भाजपने यावेळी पवारांना जेरीस आणले आहे. अजित पवार,धनंजय मुंडे अन रामदास आठवले हे त्याच पैकी. हे तिघे ही आज जे काही आहेत ते केवळ अन् केवळ शरद पवारांमुळेच. त्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून व फडणवीसाची चाटूगिरी करण्यासाठीं हे तिघे ही जी टीका करीत आहेत. ती शरद पवारांच्याच नाहीतर महाराष्ट्राच्या समाज मनाला ही वेदना देणारी आहे. फुले, शाहु आंबेडकर अन् छत्रपतींचा महाराष्ट्र हा असा इतका कृतघ्न नाही. जितका फडणवीसाच्या गँगने तो बनविला आहे.
रामदास आठवलेंना रस्त्यावरून उचलून संसदीय राजकारणात प्रस्तापित करण्यात पवारांचाच हात आहे. आज ते बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन सुप्रिया सुळे अन् शरद पवार यांच्या विरोधात बोलत आहेत. पण विरोधात बोलायला काहीच नसल्याने गडी चारोळ्या म्हणत फिरत आहे.  त्या जमत नसल्याने ट ला फ जोडून जोकरगिरी करीत आहे. बाकी आठवले बारामतीत शरद पवारांच्या विरोधात इतक्या खालच्या पातळीवरून प्रचार करतील, अशी अपेक्षा नसल्याने उरलीसुरली सहानुभूती ही आठवले गमावून बसले आहेत. तेच धनंजय मुंडेंचे. गोपीनाथ मुंडेंनी डस्टबिनमध्ये टाकलेला हा कचरा. पवारांनी  पक्षांतर्गत विरोधाला भीक न घालता त्याला विधापरिषदेतील विरोधी पक्ष नेता बनविले. अनेक प्रकरणातून त्याला वाचविले. आता त्याने पवारांवर टीका करावी. अन् ते ही भिकेतून मिळालेले मंत्रीपद वाचविण्यासाठी. याला काय म्हणावे. आठवले अन् मुंडेला स्वतः कडे पाहण्यासाठी वेळ असेल तर त्यांनी जरूर पाहवे. त्यांना दुसऱ्यांनी थोबाडीत मारायची गरज नाही. ते स्वतःच स्वतःच्या थोबडात मारून घेतील. इतके अनंत उपकार या दोघांवर पवारांचे आहेत. लायकी नसताना मोठी पद या दोघांना पवारांनी दिली. त्यामुळे बोलताना तारतम्य ठेवायची जबाबदारी या दोघांची होती व आहे. पण ते आपले मालक फडणवीसांना खुश करण्यासाठी हे सर्व करीत आहेत, बोलत आहेत. महाराष्ट्राने इतक्या खालच्या पातळीवरचे अन् नीच राजकारण या अगोदर कधीच पाहिले नाही. ना हे असले राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृती व स्वाभिमानाचा भाग आहे.
              राहिला प्रश्न अजित पवारांचा तर धरणात मुतणारा हा गडी. शरद पवार राजकरणात नसते तर हा बारामतीत तहसील कार्यालयात दलाली करीत फिरला असता. इतकीच त्याची काय ती लायकी.  पण उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री, जेथे मुतायचे म्हणाला त्या धरणाचा मंत्री अन् विरोधी पक्षनेते पद हे सारे केवळ शरद पवारांमुळे मिळाले. मात्र इतकी पद भुषवून ही त्याच्या बुध्दीचा विकास झाला नाही. नाक्यावरची टपोरी छाप प्रतिमाच त्यालाच खरी शोभते. अन् तो खरा तसाच आहे. कौटुंबिक लोभापायी पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले, ही त्यांची अक्षम्य चूक. त्याचीच फळे पवारसाहेब भोगत आहेत.अशा टपोरीने शरद पवार यांच्यावर तोंड सुख घ्यावे. फडणवीसाने छु म्हणताच भो sss भो भुंकावे. इतकेच काम आता त्याच्याकडे आहे. अन् महत्त्वाचे म्हणजे जितके दिवस मंत्रीपद तितके दिवस मौज करावी. सिंचन घोटाळा पाठ सोडणार नाही. फाईल कधी ही ओपन होऊ शकते. 
          असे नाही की गेल्या सहा दशकांच्या राजकरणात शरद पवारांच्या राजकारणावर टीका करणारे कुणीच नव्हते. अनेकजण होते व आज ही आहेत.पण पवारांनी राज्याच्या केलेल्या विकासामुळे त्या टीकाकारांच्या व त्यांनी केलेल्या टीकेचा निभाव कधी लागलाच नाही. त्यांनी केलेल्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा चौपदरी विकास झाला, हे खरे असले तरी त्यांच्या हातून काही गंभीर चुका ही झाल्या आहेत. पक्षफोड्या हा आरोप खरेतर फडणवीसाच्या अगोदर त्यांच्यावरच व्हायला हवा होता. पण त्यांचे कर्तुत्व अन ते करीत असलेल्या विकासाच्या राजकारणामुळे त्यांचे हे पक्षफोडे राजकारण तितके, आजच्या इतके चर्चेचा विषय कधीच ठरले नाही. गरज आहे म्हणून काँग्रेसने विरोधी पक्ष फोडले, असे चित्र ही त्यांनी कधी उभेच राहूच दिले नाही. विरोधी पक्षातील लोक अंतर्गत संघर्षाला कंटाळून सत्तेच्या हव्यासापोटी स्वतःचे पक्ष फोडून काँग्रेसमध्ये आले, असेच वातावरण निर्माण करुन त्यांनी पक्ष फोडले. ही त्याची पक्ष फोडण्या मागील खासियत नेहमीच राहिले आहे.
            विरोधासाठी विरोध हे धोरण लोकशाहीसाठी पोषक नाही, यावर विश्वास असणारा शरद पवार यांच्याशिवाय दुसरा नेता भारतीय संसदेच्या राजकरणात दुसरा कुणी हे शोधून ही सापडत नाही. त्यामुळे वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार असो की मोदींच्या. सरकारच्या चांगल्या व देश हिताच्या धोरणांना त्यांनी कुठल्याही टीकेची पर्वा न करता साथ दिली. त्याशिवाय महाराष्ट्र हे पुरोगमी राज्य असून फुले, शाहु, आंबेडकर अन् छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा या राज्याला लाभलेला आहे. त्यावरची निष्ठा शरद पवारांनी कधीच ढळू दिली नाही.
           मोदीच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात देश, संविधान, संवैधानिक संस्था अन् लोकशाही धोक्यात आली आहे, यावेळी ही आपल्या वयाची पर्वा न करता ते संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. अन् हे पहिल्यांदाच होतेय असे ही नाही. गेल्या ५ वर्षांपूर्वी भर पावसात त्यांनी भाजपच्या विरोधात केलेल्या प्रचारामुळे भाजपला किमान राज्यात तरी सत्तेपासून दूर ठेवण्याचे ऐतिहासिक काम पवारांनी केले आहे. शिवसेना – भाजपची ३ ते ४ दशकांची युती तोडून शिवसेनेला धर्मांध राजकारणाच्या गर्तेतून बाहेर काढून भाजपच्या धर्मांध व लोकशाही विरोधी राजकारणाच्या विरोधात  उभे करण्याचे ऐतिहासिक राजकारण ही पवारसाहेबांनी केले असून महाराष्ट्रावर केलेले हे त्यांचे फार मोठे उपकार आहेत. फुले, शाहु, फुले आंबेडकर व छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र हे उपकार कधीच विसरणार नाही…..!
 
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)
0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *