- 881
- 1 minute read
कर्ज बुडवे, लुटारू अन् भगोडे ही गुजराती व्यापारी व उद्योगपतींना बदनाम करणारी प्रतिमा नरेंद्र मोदीमुळेच…!
मोदी सत्तेवर आल्यापासुन महाराष्ट्रा विषयी सूड भावनेने काम करीत आहेत. मोका अन् संधी मिळेल तेव्हा त्यांनी मुंबई अन महाराष्ट्राच्या गौरव व अस्मितेवर हल्ला केला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून ती अर्ध्या देशाला पोसतेय, याचा गर्व व अभिमान मोदीला असायला हवा होता. पण फडणवीसासारख्या महाराष्ट्रद्रोही व फडतुसाला हाताशी धरून देशाच्या आर्थिक राजधानीचा किताब मुंबईकडून फिरावून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी सतत केला आहे. फडणवीसाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात व त्यानंतर शिंदे – फडणवीसाच्या सत्ताकाळात मुंबईस्थित अनेक उद्योग मोदी व शहाने गुजरातला नेले. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे प्रस्ताविक मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातला हालवले व यासाठी डॉ. मनमोहन सिंग सरकारने बीकेसीत राखीव ठेवलेला भूखंड बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दिला. यामुळे लाखो कोटींची गुंतवणुक व लाखो रोजगारांच्या संधीला महाराष्ट्र मुकला. तसेच मुंबई शहरातील अनेक उद्योगांची मुख्य कार्यालये ही मोदीने याच महाराष्ट्रद्रोही फडणीसाच्या मदतीने गुजरातला नेवून राज्यातील लाखो तरुणांना बेरोजगारीच्या खाईत ढकलून दिले अन हजारो कोटींचा राज्याचा महसूल बुडविला. मुंबईतील डायमंड उद्योगाने गुजरातला पलायन केल्याने राज्याच्या महसूल उत्पादनात ६०० कोटींचा घाटा झाला असून ६७ हजार कुशल कामगार बेरोजगार झाले आहेत. तर मुंबईतील रियल इस्टेटवर त्याचा परिणाम झाला.
मुंबई हे वित्तीय व औद्योगिक शहर असून हा नावलौकिक हिरावून घेऊन तो गुजरातला मिळवून देण्याचा प्रयत्न मोदीचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ घातलेली पालघर येथील मरीन अकादमी, १.६५ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रोजेक्ट,१,९०० कोटींचा बल्क ड्रग पार्क हे औषध निर्मिती प्रोजेक्ट मोदीने गुजरातला नेले. अन् हे सर्व करताना महाराष्ट्र उद्योगधंद्यासाठी असमर्थ राज्य आहे, असा प्रचार करून महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासाठी फडणवीस व त्याच्यासोबत असलेल्या महाराष्ट्र विरोधी व महाराष्ट्रद्रोही गँगचा पुरेपूर वापर करून घेतला. पोर्टचा सारा बिझिनेस मोदीने अदानीच्या माध्यमातून या अगोदरच गुजरातला नेला आहे. रेल्वे, संरक्षण विभागाचे महाराष्ट्रात होऊ घातलेले अनेक प्रोजेक्ट गुजरातला नेले. तर राज्यातील पर्यावरणाला व शेती उद्योगाला हानी पोहचविणारे अनेक प्रोजेक्ट कोकणच्या जनतेवर जाणीवपूर्वक लादले जात आहेत. येथे ही फडणवीसांची गँग मोदीला मदत करीत आहे.
मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेवर हमला करीत मोदीने गुजराती व्यापारी व उद्योगपतींना ही रस्त्यावर आणले आहे. नोट बंदी व जीएसटीच्या माध्यमातून देशातील लाखो छोटे व्यापारी व उद्योगपतींचे कंबरडे मोडले आहे. यामध्ये गुजराती व्यापारी व उद्योगपतींचा ही समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्र व मुंबईच्या विकासात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगार, कष्टकऱ्यांचा आपला घाम गाळून व रक्त आटवून मुंबईच्या वैभवात भर घातली. हे करताना महाराष्ट्रातील कामगार, कष्टकरी वर्ग अन् गुजराती व्यापारी व उद्योगपती यांच्यातील कामगार व मालक हे एकमेकांना समजून घेणाऱ्या नाते संबंधांमुळे मुंबई अन् महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या नंबर 1 वर नेहमीच राहिले. त्यामुळे राज्यातील तरुणांना रोजगार मिळाला. गेल्या 70 वर्षात फडणवीस व शिंदे सरकारचा अपवाद सोडला तर कुठल्याही सरकारने गुजराती पर राज्यातील आहेत म्हणुन त्यांच्याशी भेदभाव केला नाही. त्यांच्या उद्योग, धंद्यामध्ये अडचणी निर्माण केल्या नाहीत की त्यांची पिळवणूक केली नाही. त्यामुळे ते यशस्वी व्यापारी व उद्योगपती ठरले. ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे.
मुंबई व महाराष्ट्राने गुजराती उद्योगपती व व्यापाऱ्यांना धन व वैभव मिळवून दिले. मानसन्मान दिला जो मोदी कधीच मिळवून देवू शकत नाही. हे खरे आहे की, अदानी व अंबानी या दोन उद्योगपतींचा विकास मोदीमुळे झपाट्याने झाला आहे. पण तो काही समस्त गुजराती व्यापारी व उद्योगपतींचा विकास नाही . कर्ज बुडवे, लटारू व भगोड्या नीरव मोदी व मोहन चोकक्षी आदींनी बँकांना बुडवून विदेशात पलायन केले आहे. त्यांच्याकडून मोदीने यातील टक्केवरी हिस्सेदारी म्हणून घेतली आहे. यात मोठा घोटाळा झालेला आहे. त्यामूळेच रामाला आणणारा मोदी नीरव मोदी आणि मोहन चोकक्षी यांना देशात आणू शकत नाही. त्यांना आणले तर मोदींचे बिंग फुटेल.
गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अन् सुरत डायमंड बोर्सच्या माध्यमातून मुंबई व महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान करूनच मोदी थांबले नाहीत. त्यांनी शिंदेसारख्या गद्दाराला हाताशी धरून मुंबई महानगरपालिकेच्या 89 हजार कोटींच्या ठेवींवर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. या ठेवी आपतकालीन व्यवस्थापनासाठी राखीव निधी म्हणून ठेवल्या आहेत. शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर तोट्यातील महानगरपालिकेला शिवसेनेने प्रॉफिटमध्ये आणले. अन् त्यानंतर या आपतकालीन ठेवींची अगदीं नियोजनबध्द पद्धतीने वेगवेगळ्या तरतुदी करून हा निधी कायमस्वरूपी ठेवी म्हणून जमा केला आहे. कुठल्याही मोठ्या संकटातून मुंबई शहराला पुन्हा सावरण्याचा हेतू यामागे आहे. त्यावरच मोदी आता डोळा ठेवून आहे.
एखाद्या राज्याचा अथवा शहराचा इतका तिरस्कार करणे देशाचा पंतप्रधान म्हणुन मोदीला हे शोभत नाही. पण मोदी हे सर्व गुजरातच्या फायद्यासाठी करीत आहे, असे ही नाही. मोदीने आपल्या 20वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुजरातचा विकास केला आहे, असे ही नाही. मुंबईचा आर्थिक राजधानीचा किताब हिरावून तो गुजरातला मिळवून देण्याच्या मोदीच्या हेतूबद्दल ही शंका आहे. मोदीचा हा हेतू प्रमाणिक असता तर डायमंड व्यापारी सहा महिन्यातच मुंबईकडे परतले नसते. सुरत डायमंड बोर्स सिटी उभी करुन मोदीने येथील रियल इस्टेटच्या बिझिनेसचे बस्तान बसविले व त्यामधील आपल्या मित्रांचा फायदा करुन दिला. अन् येथे ज्या गुजराती डायमंड व्यापाऱ्यांनी केलेली गुंतवणूक ते मुंबईला परत येत असल्याने फुकटात गेली आहे. मोदीने या प्रोजेक्टच्या नावाखाली शेकडो गुजराती व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. मोदी अंबानी, अदानी शिवाय कुठल्याच गुजराती व्यापारी व उद्योगपतींचा झाला नाही अन् होणार ही नाही.! हाच मोदीचा परिवार आहे.
सर्वच गुजराती व्यापारी/ उद्योगपती लुटारू नाहीत, पण जे सापडतात, ते गुजरातीच का आहेत ? तसेच सर्वच मोदी ही चोर व बँकांचे कर्ज बुडविणारे नाहीत. पण जे सापडतात ते मोदीच का बर आहेत ? याचा आपण गंभीरपणे विचार करतो तेव्हा, ते मोदीच्या परिवारातील असल्याचे आढळून येते. थोडक्यात देशाला लुटणारा, चोर, कर्ज बुडवा परिवार मोदीने ” मोदी परिवार ” म्हणून या देशात आपल्या सत्ताकाळात उभा करून देशाची लूट केली असल्याचे आपल्या लक्षात येते. अन् हे अगदीं जाणीवपूर्वक केल्याचे ही उघड उघड दिसते. बाकी जे गुजराती मोदींच्या परिवारातील नाहीत. ते सर्व मेहनत करून देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. यामध्ये गुजराती व्यापारी व उद्योगपतींचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात तर ते स्पष्टपणे दिसते.
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र राज्य)