• 190
  • 1 minute read

संविधानाचे संरक्षण सध्याचे सर्वात महत्वाचे आव्हान भाग २ हिंदू (?) राष्ट्राचे ढोंग.

संविधानाचे संरक्षण सध्याचे सर्वात महत्वाचे आव्हान भाग २ हिंदू (?) राष्ट्राचे ढोंग.

सर्व नागरिकांना संविधानामध्ये काय आहे हे सुद्धा माहित पाहिजे.उद्देश्यपत्रिकेत या सर्व तरतुदी मागेअसलेली मूल्ये आहेत.हा आमच्या हक्कांचा,आशा आकांक्षा यांचा जाहीरनामा आहे. आम्हाला कसे राज्य पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या तत्वाने गेले पाहिजे हे असून याला कायदयाचे रूप कोणी केव्हा दिले आणि केव्हपासून ते अस्तित्वत आले हे नमूद असून संविधान तयार झाल्यानंतर डॉ आंबेडकरांनी ते घटना समिती समोर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सादर केले.तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो. नि आपले संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अस्तित्वात आले हे नमूद केले असून हा दिवस आपण गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो.त्या दिवसापासून आपण आपले प्रजासत्ताक अस्तित्वात आणले. त्या आधी आपल्याकडे ब्रिटिश संसदेने आपल्यासाठी मान्य केलेल्या कायद्याने राज्यकारभार चालविला होता..ते रद्द झाले आणि संविधानातील कायदे अस्तित्वात आले.या कायद्यामध्ये आपले सर्व नागरिकांचे म्हणजे आम्हा भारतीयांचे मूलभूत हक्क सुरक्षित केले आहेत.सर्व नागरिकांना ते माहित असले पाहिजेत कारण त्यावरच आपले जीवन अवलंबून आहे हे नीट लक्षात ठेवा.ब्रिटिश येण्याआधी भारत एक राष्ट्र नसून अनेक संस्थांनामध्ये विभागलेले होते.तेथे त्यात्या राज्याचे आणि धर्म रूढी परंपरा या अलिखित कायद्याप्रमाणे वापरले जात होते.
स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला संविधान तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती.संविधान समितीच्या कामकाजात संघ आणि हिंदूवादी संघटनांनी भाग घेतला नव्हता,एवढेच नाही तर ते ब्रिटिश राजवटीचे समर्थक असून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही.तेच आज संविधानाचा वापर करून सत्तेवर आहेत.त्याच्या मुळेच आपले संविधानच धोक्यात आले आहे.त्यांनी संविधानाला विरोध करताना ते पाश्च्यात तत्वावर आधारित आहे असे विधान केले असले तरी नेहमीप्रमाणे अंतरंग ना दाखविण्यासाठी केलेली धूळफेक आहे.त्यांना संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेतील”आम्ही भारतीय”हे शब्द प्रयोगच मान्य नव्हते आणि आजही नाही कारण त्यांना हिंदूंचे राज्य ते सुद्धा देवाच्या नावाने चालवावयाचे आहे.आणि आज ते याच दिशेने चालले आहेत असून संविधानाची बरीच मोडतोड केली असून पूर्ण सत्ता मिळवून ती रद्द करून हिंदू धर्मावर आधारित करावयाची आहे.बऱ्याच लोकांना यात काय चुकीचे आहे असे वाटेल परंतु सर्व गोष्टी नीट डोळसपणे जाणून घ्या. या हिंदूवादी संघटनांनी स्वातंत्र्याला विरोध केला आणि आता मात्र त्यांना हिंदुराष्ट्र पाहिजे?यातले वास्तव असे आहे कि त्यांना हिंदू धर्म नको मनुस्मृतीवर आधारित हिंदू कायदे पाहिजेत.ते पुरोहित वर्ण वर्चस्वावर आधारित असून इतर सर्व हिंदू समाजाला शूद्र मानणारे आहेत.त्याना आपले श्रेष्ठत्व सोडवायचे नाही.ब्रिटिश राजवटीने सुरुवातीला सतीच्या बंदी सारखे कायदे केले हे त्यांना आजही रुचले नाही.१८५७ च्या बंडा नंतर राणीच्या जाहीरनाम्यात आपण धर्मात हस्तक्षेप करणार नाही असे आश्वासन दिले होते आणि ते पाळले होते.म्हणूनच त्यांना ब्रिटिश राजवट प्रिय होती हे वास्तव आजपर्यंत हिंदू पासून लपवून ठेवलेले असून तिकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुस्लिम ख्रिश्चन द्वेष आणून हिंदू समाजाचे लक्ष तिकडे वेधले हे मूर्ख हिंदूंच्या लक्षात येत नाही.त्यांना फक्त त्यांचे श्रेष्ठत्वच प्रिय आहे बाकी देश,देशभक्ती याच्याशी फारसे देणेघेणे नाही. नाहीतर कुरुलकर सारख्या पाकिस्तानला गुपिते विकणाऱ्या देशद्रोहाला फासी दिली असती.पण तो पडला संघाचा कार्यकर्ता. अशी बरीच उदाहरणे आहेत.त्यांनी आजपर्यंत हिंदू राष्ट्र बनविताना त्यासाठी हिंदू याचा अर्थ त्यांच्या सोयीने घेतला असून त्यांच्या सर्व साहित्यात मनुस्मृतीवर आणि रूढी परंपरा देवदेवता या वरआधारित धर्म असाच ते गृहीत धरतात. म्हणजे त्यांच्या हिंदू राष्ट्रात पुरोहित वर्ग म्हणजे जन्माने ज्यांना श्रेष्ठत्व मिळाले आहे ते सोडून आपण सर्व शूद्र ठरणार आहोत.आणि काल्पनिक महाकाव्ये,तसेच काल्पनिक पौराणिक कथांमधून आलेले देवदेवता मानाव्या लागतील.मला त्यांचे विश्लेषण करावयाचे नाही कि त्यावर टीका करावयाची नाही.परंतु ज्याला धर्माचे काम म्हणून आपण मंदिरात जातो तेथील सर्व देवता या काल्पनिक महाकाव्य आणि काल्पनिक पौराणिक कथांमधून घेतलेले आहे.त्यांच्यात पुरोहित वर्ग प्राण घालतात यावर आज सुद्धा”विश्वास”ठेवला जातो. संविधानात राज्याच्या मार्गदर्शक तत्वात राज्याने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असे नमूद केले आहे .हे सुद्धा त्यांच्या या तत्वाच्या विरोधात जाते.त्यांना शिक्षणात सुद्धा पुराणा वर आधारित विज्ञानालाच स्थान द्यायचे आहे.हे सर्व तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही त्यांचे पाठीराखे बना. पण हे ना जाणता आंधळेपणाने भक्त बनू नका.
त्यांचा संविधानातील धर्मनिरपेक्षता या तत्वाचा खूप राग आणि विरोध आहे. पण तो जाहीर करण्याऐवजी या शब्दाचा अर्थच बदलून सान्गतात.ही त्यांची नेहमीची पद्धत.ते धर्मनिरपेक्षता म्हणजे निधर्मी राज्य,धर्माला विरोध अशी मांडणी करतात. हे खरे नाही कारण आपल्या संविधानात प्रत्येक नागरिकांना धर्म आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य दिलेले आहे.म्हणजे कोणत्याही धर्माला विरोध नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा कोणताही धर्म असणार नसून व्यक्तीचा असेल. याचा सोपा अर्थ राज्यसत्तेवर असताताना त्यांनी कोणत्यातरी एका धर्मा प्रमाणे राज्य करावयाचे नाही असा होतो.इथे त्यांची अडचण होते ती म्हणजे त्यांना आम्हाला शूद्र बनविणाऱ्या मनुस्मृती प्रमाणे राज्य चालवायचे आहे.हिंदूवादी हिंदू राष्ट्र हा शब्द प्रयोग करतात.प्रत्यक्षात त्यांना सनातन हिंदू धर्मावर आधारित राष्ट्र असेच म्हणावयाचे.स्वतःला पुरोगामी,गांधीवादी ठरवून घेणारे विचारवंत सुद्धा या शब्दात जाणीवपूर्वक घोळ घालून संघाच्या विचाराचे अप्रत्यक्ष समर्थनच करीत असतात.हिंदू हा शब्द प्रदेशवाचक असून त्यांचा मूळ अर्थ सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक असा आहे. हे नाव आपल्याला परकीयांनी दिले आहे.हिंदुस्तान हा शब्द प्रयोग सुद्धा.जसे तुर्क लोक राहतात ते तुर्कस्तान,अरब लोक राहतात ते अरबस्तान तसेच हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहतात तो हिंदुस्थान.फारसी भाषेत स या शब्द ऐवजी ह शब्द वापरतात म्हणून सिंधू चा हिंदू असा अपभ्रंश झाला.या शब्द प्रयोगात हिंदू धर्माचा समावेश नाही.डॉ राधाकृष्णन सारख्या विचारवंतांनी हिंदू हा धर्म नसून जीवन जगण्याची पद्धत आहे, असे म्हटले आहे. म्हणजे हिंदू हा धर्म नाही हे नक्की.या साठीच अलीकडे संघ आणि भाजप सनातन हिंदू धर्म असा शब्द प्रयोग करताना आढळतात.या ठिकाणी त्यांना मनुस्मृतीवर आधारित सनातन हिंदू धर्म असाच आहे.वास्तविक भारतामध्ये बौद्ध,जैन,लिंगायत,असे अनेक धर्म निर्माण झालेले असून आणि पंथसुद्धा अस्तित्वात आले. हिंदू वादी आणि हिंदुराष्ट्राचा आग्रह धरणाराना हे सर्व धर्म हिंदू राष्ट्रांमध्ये राज्याचे धर्म म्हणून अपेक्षित नसून आजपर्यंत या पैकी एकही धर्माचा तसा उल्लेख सुद्धा त्यांनी टाळला आहे.राष्ट्र किव्हा Nation शब्द ज्या अर्थाने आज वापरला जातो त्याचा इतिहास फार जुना नसून अलीकडेच त्याला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.परंतु हिंदूवादी मात्र हिंदू राष्ट्र प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्यासारखे सांगून त्याला अर्थ मात्र आधुनिक जोडतात.हा त्यांचा कावेबाजपणाच आहे.प्राचीन काळी हिंदू नावाचे राष्ट्र कधीच नव्हते हे वास्तव असून राष्ट्र शब्दाचा मूळ अर्थ सामाजिक मालकीची जमीन असाच घेतला जात होता आणि त्याचा भावनिक एकीशी काहींचं संबंध नव्हता.आज राष्ट्र म्हणजे विशिष्ट भूमीवर राहणारे लोक ज्यांच्या मध्ये एकतेची भावना असते.त्यांची जीवन जगण्याची पद्धत एक असते यालाच Culture संस्कृती असे म्हणणतात.परंतु आपण त्याला प्राचीन शब्द जोडून अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न होतो.त्याला सभ्यता Civilization म्हणतात. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले एवढेच आम्हाला माहित आहे परंतु ब्रिटिशांनी त्यांच्या अमला खाली असलेल्या भारतातील ५६५ संस्थानिकांना स्वातंत्र्य बहाल केले होते.याचा सोपा अर्थ ते पूर्वी स्वतंत्र संस्थाने होती. मग सर्व एक भारत राष्ट्र होते असे म्हणण्याला तसा अर्थ प्प्राप्त होत नाही.ब्रिटिश राजवट आल्यानंतर हा सर्वामध्ये एकीची भावना निर्माण होत गेली म्हंणून ते सर्व ब्रिटिश राजवटी विरुद्ध उभे राहिले. याला अपवाद होता संघ आणि हिंदूवादी संघटनांचा. म्हणजे ते राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये नव्हते.आजही नाहीत.म्हणून सहज देशद्रोह,द्वेष फैलावणे करतात.स्वातंत्र्य लढा हिंदूवादी सोडून सर्व लोक जात,धर्म विसरून सामील झाले होते. म्हणून हे राष्ट्र बनत गेले हे एक निख्खळ वास्तव आहे.यात सामील ना झालेले आज राष्ट्राची भाषा करून देशात धर्म जातीच्या नावाखाली विभाजनाचा खेळ खेळत आहेत. त्यांना भारत हे राष्ट्र व्हावे अशी इच्छाच नाही.फक्त त्यांचे वर्चस्व राहावे हीच मुख्य भावना असून ते बाकी देशवासीयांची फसवणूक करीत आहेत.ही गोष्ट सर्व भारतीयानॆ आणि त्यातल्या त्यात भक्तांनी लक्षात ठेवावी.त्यांना Elite लोकांचे श्रेष्ठीजनांचे राज्य हवे.बाकीच्यांनी फक्त मोलमजुरी करूनच जगले पाहिजे. त्यांच्या दहा वर्षाच्या राजवटीत भ्रस्टाचार,बलात्कार,महागाई,अन्याय वाढला आहे हे सोसणारे सर्वच हिंदू आहेत.आणि अन्याय करणारे हिंदूच आहेत.मुस्लिम कोणी नाहीत. तरी मुस्लिम द्वेष? त्यांना हिंदूंची दया नाही येत ली.मुस्लिम हे भारताचे नागरिक असून त्यांच्यावर सर्रास अन्याय,अत्याचार करणारे देशप्रेमी कसे असतील?हे भयानक वास्तव लक्षात घेतले तर आपले सर्व हक्क सुरक्षित ठेवणारे धर्मनिरपेक्ष संविधान हे आपली पुढील सुखी जीवनाचे धर्म पुस्तक आहे हे ना विसरता सर्वानी संविधान रक्षणासाठी तयार राहिले पाहिजे. यावर अजून विस्ताराने लिहावयाचे आहे.तो पर्यंत यावर विचार करा. प्रश्न शंका असतील तर जरूर विचारा.
प्रा डी यु पवार

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *